cauliflower in marathi

cauliflower in marathi: फुलकोबी लागवड माहिती

महाराष्ट्रामध्ये कोबीवर्गीय cauliflower in marathi भाज्यांमध्ये फुलकोबी cauliflower farming ही भाजी अतिशय लोकप्रिय आहे.  तसेच जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. हे  पिके थंड हवामानात होणारे असून सुधारित तसेच संकरित जातीच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते.


जमीन | Soil - 

फुलकोबीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा.


हवामान | Weather - 

फुलकोबी cauliflower in marathi एक थंड हवामानातं येणारी वनस्पती आहे. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते. फूलकोबीच्‍या जाती तापमानाच्‍या बाबतीत अधिक संवेदनशील असल्‍यामुळे त्‍यांची निवड त्‍या त्‍या हवामानाच्‍या गरजेनुसार करावी. अति प्रमाणात दंव फुलकोबी cauliflower farming पिकाचे मोठे नुकसान करते. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान तयार होतो.


बियाण्याचे प्रमाण | Cauliflower seed rate - 

एक एकर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या या जातींचे 240 ते 300 ग्रॅम बी लागते. तर गरम या आणि स्नोबॉल गटातील जातीचे एकरी 150 ग्रॅम बी पुरेसे होते. संकरित वाणांचे बी 120 ग्रॅम लागते.


लागवड । Fulkobi lagwad -

पिकाची रोपे तयार करताना गादी वाफयावर तयार करावी. वाफयाच्‍या रूंदीस समांतर 12  ते 15 सेमी अंतरावर रेषा ओढून बियाणे पातळ पेरावे व बियाणे मातीने अलगद झाकावे. बियांची उगवण होईपर्यंत झारने पाणी द्यावे. बी पेरल्‍यापासून 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीस तयार होतात. लागवडीपूर्वी सरी वरंबे अथवा वाफे यांना खतांचा मात्रा द्यावी. लवकर येणा-या जातींकरीता 45 बाय 45 सेमी वर तर उशिरा येणा-या जातींना 45 बाय 60 सेमी किंवा 60 बाय 60 सेमी अंतरावर लागवड करावी.


जाती | Best cauliflower variety - 

 

1. रेगाल व्हाइट (सिजेंटा) -
हंगाम - रब्बी
वैशिष्ट्ये - रोपे उंच, सरळ वाढतात, गड्डा पांढराशुभ्र असून पाने हिरवी, रुंद गड्ड्याला झाकून ठेवतात. रोप लागवडीपासून 75 ते 80 दिवसांत गड्डा काढणीस येतो.

2. सुहासिनी (सिजेंटा) -
हंगाम - रब्बी
वैशिष्ट्ये - गड्डा घट्ट, मोठा, उभा असून पानांनी गड्डा झाकला जातो. रोप लागवडीपासून 65 ते 70 दिवसांत गड्डा काढणीस येतो. गड्डा साधारण 1.5 ते 2.5 किलोचा असतो.

3. किमया (सिजेंटा) -
हंगाम - खरिफ (उन्हाळी सुद्धा लागवड केली जाते)
वैशिष्ट्ये - गड्डा मोठा गोलाकार. रोप लागवडीपासून 65 ते 70 दिवसांत गड्डा काढणीस येतो. गड्डा साधारण 1 किलोचा असतो.

खत व्यवस्थापन | Cauliflower fertilizer Managment - 

लागवडीच्या वेळी युरिया 25 किलो + 12:32:16 - 50 किलो + मायक्रोनुट्रीएंट 10 किलो + बोरॉन 1 किलो + सल्फर 5 किलो द्यावे. लागवडीनंतर 20 दिवसांनी युरिया 25 किलो + 10:26:26 - 50 किलो + बोरॉन 1 किलो प्रति एकरी द्यावे. 

Boron 20%


पाणी व्यवस्थापन | Cauliflower water managment - 

रब्बी हंगामात जमिनीचा प्रकार आणि हवामानाचा अंदाज घेऊन 7 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे, तर उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावे. फुलकोबीची cauliflower in marathi मुळे उथळ असल्यामुळे फुलकोबीच्या पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फुलकोबीचे उत्पादन आणि मालाचा दर्जा सुधारतो आणी पाण्याची 40 ते 50 % बचत होते.


प्रमुख कीड रोग व्यवस्थापन | Cauliflower Pest & Disease managment - 

1. डायमंड बैक मोथ | Diamondback moth - 

कोबी पिकातील गंभीर कीड. ते पृष्ठभागाच्या पानांच्या खाली अंडी घालतात. शरीरावर केस असलेल्या हिरव्या रंगाच्या अळ्या पाने खातात आणि छिद्र करतात. योग्य नियंत्रण उपायांचा अभाव असल्यास, यामुळे 80-90% पर्यंत नुकसान होते.

किडीच्या नियंत्रणासाठी 10 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत. 

1. ट्रेसर - 6 मिली 

2. किफन 30 मिली 

3. कोराजन - 5 मिली 

या कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

Pheromone TrapTracerPI KeefunCoragen

 

2. मावा | Aphid - 

पानांचा रस शोषून घेतात परिणामी पाने पिवळी पडतात उत्पादनात घट येते.

पिवळे व निळे चिकट सापळे 25 प्रति एकरी लावावेत.

नियंत्रणासाठी -

1. अरेवा - 10 ग्राम 

2. कॉन्फिडोर - 10 मिली 

3. सुपर डी - 30 मिली 

या कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

IFC - Sticky trapsDhanuka ArevaBayer Confidor

Dhanuka Super D Insecticide

 

3. ब्लॅक रॉट / घाण्या रोग | Black rot - 

कोबीवर्गीय पिकांमधील हा एक घातक रोग आहे. रोपाच्या पानांच्या कडांवर इंग्रजीतील V आकाराचे ठिपके आलेले दिसतात. नंतर पान पिवळे पडण्यास सुरुवात होते व हळूहळू हे ठिपके झाडांवर इतरत्र पसरू लागतात. 

रोपाच्या अन्नद्रव्य वाहिन्यांमध्ये या जिवाणूंची वाढ झाल्याने रोपाची पाने, खोड व मुळे काळी पडतात व रोगग्रस्त झाड सडून जाते.

नियंत्रणासाठी - 

1. धानुकोप 30 ग्राम + प्लांटोमाइसिन 10 ग्राम  

2. धानुकोप  30 ग्राम + ओमाइसिन 30 मिली 

या कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

DhanucopPlantomycinOmycin


काढणी व उत्‍पादन | cauliflower harvesting & production - 

जातीपरत्‍वे फुलकोबी 2.5 ते 3 महिन्‍यात तयार होतो. तयार गड्डा हातास टणक लागतो. तयार गडडा जादा काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्‍यावर तो फूटून नुकसान होण्‍याचा संभव असतो. म्‍हणून तो वेळीच काढून घ्‍यावा. फूलकोबी चा गडडा पिवळसर पडण्‍यापूर्वी काढावा. कोबीचे 200 ते 250 क्विंटल तर फूलकोबीचे 100 ते 200 क्विंटल हेक्‍टरी उत्‍पादन घेता येते.


Conclusion | सारांश - 

फुलकोबी हे एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. फुलकोबी थंड हवामानात येणारे पीक असून लागवड करताना हंगामानुसार जातीची निवड करणे गरजेचे आहे. तसेच जातीनुसार लागवडीचे अंतर ठेवावे. योग्य खत नियोजन, कीड रोग व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यास नक्कीच फुलकोबी हे पीक फायदेशीर ठरू शकते.  


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -


1. फुलकोबीच्या लागवड कधी करावी?

ऊत्तर - फुलकोबी थंड हवामानात येणारे पीक असल्याने पावसाळा आणि हिवाळी हंगामध्ये लागवड करू शकतो पण काही संकरित जातीची लागवड उन्हाळ्यामध्ये करू शकतो. 

2. फुलकोबी लागवडीसाठी जमीन कशी असावी?

ऊत्तर - फुलकोबीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा.

3. फुलकोबी लागवडीसाठी एकरी किती बियाणे लागते?

ऊत्तर -  एक एकर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या या जातींचे 240 ते 300 ग्रॅम बी लागते. तर गरम या आणि स्नोबॉल गटातील जातीचे एकरी 150 ग्रॅम बी पुरेसे होते. संकरित वाणांचे बी 120 ग्रॅम लागते.

4. फुलकोबी मधील प्रमुख रोग कोणता? 

ऊत्तर -  घाण्या रोग हा फुलकोबी मधील प्रमुख रोग आहे. 

5. फुलकोबी मधील प्रमुख कीड कोणती? 

ऊत्तर -  डायमंड बैक मोथ हि फुलकोबी मधील प्रमुख कीड आहे. 


People also read | हे देखील वाचा - 

1. फ्लॉवर आणि कोबीमध्ये कीड व रोगांना 100% नियंत्रित करणाऱ्या फवारण्या

2. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

3. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे

4. सोयाबीन वायरस चे संपूर्ण नियंत्रण

5. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा. लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि डॉक्टर

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी