bij prakriya

bij prakriya: रब्बी हंगामात अशी करा पेरणीपूर्व बीज प्रक्रिया

नमस्कार शेतकरी मित्रानो,  bharatagri krsuhidukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आपण रब्बी हंगामातील पिकांसाठी बीज प्रक्रिया bij prakriya करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत आणि बीजप्रक्रिया केल्यास काय फायदे होतात या बद्दल जाणून घेणार आहोत. सध्या काही ठिकाणी रब्बीची पूर्व तयारी चालू आहे. कोणतेही पीक लावताना आपण जसे जमिनीची पूर्व मशागत करतो तसेच पिकामध्ये येणाऱ्या कीडीचे व रोगाचे प्रतिबंधात्मक नियोजन करणे फायदेशीर ठरते. यासाठी बियाण्यांची बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पीक संरक्षणामध्ये जेवढे महत्व फवारणी मधून कीड रोग नियंत्रसाठी दिले जाते तेवढे महत्व बीजप्रक्रीयेस दिले जात नाही. बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करीत नाहीत, बीज प्रक्रिया केल्यामुळे खूप फायदे होतात.


बिजप्रक्रिया म्हणजे काय? What is bij prakriya marathi -

बियाणे जमिनीत पेरणीपुर्वी जमिनीतुन किंवा बियाण्यातुन पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढवीण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रसायनिक औषधांची seed treatment chemicals प्रक्रिया केली जाते. याला बिजप्रक्रिया असे म्हणतात.


बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती | Seed treatment methods in marathi -


अ) मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया -

मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करण्यासाठी मिठाचे २ टक्क्याचे द्रावण तयार करुन घ्यावे. त्यासाठी २० ग्रॅम मीठ १ लीटर पाण्यात विरघळून घ्यावे. पेरणीसाठी वापरण्यात येणार्‍या बियाण्याच्या प्रमाणानुसार मीठ आणि पाणी यांचे प्रमाण कमी अधिक करावे. द्रवणात पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे पुर्णपणे बुडऊन ढवळून घ्यावे हलके आणि रोगयूक्त बियाणे पाण्यावरती तरंगु लागतात. ते बियाणे काढून टाकावेत, आणि तळाशी असलेले बियाणे २४ तास सावली मध्ये सुकवून पेरणीसाठी वापर करावा. या बीजप्रक्रियेचा उपयोग ज्वारी आणि बाजरी मधील अरगट रोग आणि भातामधील करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी होतो. 


ब) बुरशीनाशक आणि कीडनाशकाची प्रक्रिया -


👉बियाण्याची बीजप्रक्रिया -

1. बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशक हलक्या हातानं चोळून प्रक्रिया केली जाते.

2. अशी बीजप्रक्रिया हरभरा, गहू, मूग, मका, वाटाणा भाजीपाला पिके याना केली जाते. 

3. रासायनिक बुरशीनाशक किंवा कीडनाशकाची प्रक्रिया करताना शिफारशींनुसार १ किलो बियाण्यास बाविस्टीन (कार्बेन्डाझिम ५०% WP) २ ग्राम + कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७.८ % SL) १ मिली १ किलो बियाण्यास चोळावे. 

4. कॉन्फिडोरच्या ऐवजी आपण बायर गौचो gaucho insecticide ५ मिली प्रति किलो बियाणे gaucho seed treatment हे सुद्धा घेऊ शकतो. 

5. तत्पूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओले करून घ्यावे. 

6. अशी प्रक्रिया करताना, हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत व प्रक्रिया हलक्या हाताने करावी.

7. सांगितलेली बीजप्रक्रिया तुम्ही गहू, ज्वारी अशा पिकांसाठी करू शकता. 

8. हरभरा पिकासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 2.5% + थायोफेनेट मिथाइल 11.25% हे बुरशीनाशक आणि  थायामेथोक्सम 25% एफएस यांचे संयुक्त मिश्रण असलेले बेस्ट एग्रोलाइफचे वॉर्डन हे ५ मिली प्रति किलो बियाण्यास वापरावे. 

9. याचे रिझल्ट सर्वोत्तम असून हरभरा पिकामध्ये मर येत नाही. 

10. जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरीडी (डॉ बॅक्टोस डरमस) १० मिली हे प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने चोळून जैविक बीजप्रक्रिया करू शकता. 


👉भाजीपाला रोप प्रक्रिया -

1. बरेच शेतकरी भाजीपालापिके जसे कि टोमॅटो, मिरची, वांगे इ. पिकाचे बियाणे न वापरता नर्सरी मधून रोपे विकत घेतात अशा वेळी हि प्रक्रिया तुम्ही करू शकता. 

2. भाजीपाला रोपांची प्रक्रिया करण्यासाठी बाविस्टीन ४० ग्राम + कॉन्फिडोर  १० मिली हे १० लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावे व रोपांची मूळे १० मिनिटे द्रावणामध्ये बुडवून मगच लागवडी साठी वापरावे. 


👉जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया -

1. जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया केल्याने उगवण क्षमता वाढते व पिकाची जोमदार वाढ होते. 

2. तसेच मुख्य अन्नद्रव्ये पुरवणाऱ्या खतामध्ये २५ % बचत होते. 

3. अर्धा लिटर गरम पाण्यामध्ये ५० ग्राम गूळ मिक्स करावा. 

4. द्रावण थंड झाल्यानंतर त्यामध्ये जीवाणू संवर्धक IFC NPK बॅक्टेरिया १०० ग्रॅम मिसळावे

5. नंतर बियांवर शिंपडून हलक्या हाताने चोळावे. 

6. ते द्रावण १० ते १५ किलो बियाण्यास पुरते. 


👉बिजप्रक्रिया करण्याचा क्रम | Bij prakriya steps -

1. सर्वप्रथम रासायनिक कीडनाशक व बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. 

2. त्यानंतर ३ ते ४  तासांनी जीवाणू संवर्धकाची बिजप्रक्रिया करावी.


बिजप्रक्रियेचे फायदे | Bij prakriya benefits -

1. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा उदा. मर रोग आणि मूळ कूज इ. प्रादुर्भाव टाळता येतो. 

2. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. 

3. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. 

4. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. 

5. बिजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड/रोग नियंत्रणाची किफायतशीर पध्दत आहे.


Conclusions | सारांश -

बीजप्रक्रिया केल्याने मर रोग आणि मूळ कूज इ. रोगाचे प्रतिबंधात्मक नियंत्रण होते तसेच उगवण क्षमता सुधारून खतामध्ये २५ ते ३० % बचत होते. शेतकरी मित्रांनो तुम्हाला BharatAgri Krushi Dukan वेबसाइट वरील आमचा बीजप्रक्रिया bij prakriya करण्याच्या पद्धती आणि फायदे  हा लेख तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. बिजप्रक्रिया म्हणजे काय?

उत्तर- बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास रोग किडीचा प्रधुरभाव होऊ नये म्हणून त्यावर बुररशीनाशक व कीडनाशक हलक्या हाताने चोळून लावले जाते त्यास बीजप्रक्रिया असे म्हणतात. 

2. बीजप्रक्रिया का करावी?

उत्तर- जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा उदा. मर रोग आणि मूळ कूज इ. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीज प्रक्रिया करावी. 

3. जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया करता येते का?

उत्तर- हो, जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया करायची असल्यास ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक ५ ते १० मिली प्रति किलो बियाण्यास चोळावे. 

4. बीजप्रक्रिया केल्याने उगवणक्षमता सुधारते का?

उत्तर- हो, जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यास  उगवणक्षमता सुधारते तसेच खतामध्ये २५ - ३० % पर्यंत बचत होते. 

5. रासायनिक बीजप्रक्रिया केल्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करू शकतो का?

उत्तर- हो, रासायनिक बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे १ ते २ तास सावली मध्ये सुकवून जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करू शकतो. 


People also read | हे देखील वाचा - 

1. गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न

2. रब्बी हंगामात ज्वारीच्या या वाणांची पेरणी करा आणि मिळवा भरगोस उत्पादन

3. डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रणलेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी