व्हीप सुपर - फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9 ईसी (9.3%)
व्हीप सुपर - फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9 ईसी (9.3%)
Dosage | Acre |
---|
बायर व्हिप सुपर तणनाशक (फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% EC) -
व्हीप सुपर तणनाशक हे निवडक तणनाशक आहे जे सोयाबीन, भात, कापूस, उडीद, कांदा आणि भुईमूग या पिकांमध्ये वाढणाऱ्या सर्व प्रकारच्या गवताळ किंवा अरुंद पानांच्या तणांवर आंतरप्रवाही कृतीद्वारे नियंत्रण ठेवते ज्यामुळे पीक तणमुक्त राहते. व्हीप सुपर तणनाशकामध्ये फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% EC फॉर्म्युलेशन हे रसायन आहे जे तण लवकर नष्ट करते.
उत्पादनाचे नांव | व्हीप सुपर |
रासायनिक संरचना | फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% EC |
कंपनीचे नाव | बायर |
श्रेणी | तणनाशक |
उत्पादन कार्य | आंतरप्रवाही |
तण नियंत्रण | गवताळ आणि अरुंद पाने असलेले तण |
पिकांमध्ये वापरा |
सोयाबीन, भात, कापूस, उडीद, कांदा, आणि भुईमूग
|
वापर वेळ |
पेरणी/लावणीनंतर 21 दिवसांनी किंवा तणांच्या 3 पानांच्या अवस्थेत वापरा.
|
वापराचे प्रमाण | 1.5 मिली/लिटर. 25 मिली/पंप (15 लिटर पंप) 250 मिली/एकर फवारणी करावी. |
उत्पादनाची कार्यपद्धती -
व्हीप सुपर तणनाशक गवत वर्गीय तणांच्या मेरिस्टेमॅटिक ऊतकांमध्ये फॅटी ऍसिड संश्लेषण रोखून कार्य करते. सक्रिय घटक, फेनोक्साप्रॉप-पी-इथिल, पाने आणि देठांमधून शोषले जाते, तणांच्या वाढीस लक्ष्य करते आणि व्यत्यय आणते.
वैशिष्ट्ये आणि फायदे-
➔ सक्रिय घटक: फेनोक्साप्रॉप-पी-इथिल, एक निवडक तणनाशक आहे.
➔ क्रियेची पद्धत: गवताळ तणांच्या पानांद्वारे आणि देठाद्वारे शोषून कार्य करते.
➔ वापरण्यास सोपे : तण दोन ते तीन पाने अवस्था असताना फवारणी असल्यामुळे वापरण्यास सोपे.
➔ ब्रॉड-स्पेक्ट्रम नियंत्रण: गवताळ तणांच्या विविध प्रजातींविरूद्ध प्रभावी.
➔ उच्च नियंत्रण कार्यक्षमता: कमी डोसमध्ये वार्षिक गवताळ तणांवर उत्कृष्ट नियंत्रण प्रदान करते.
➔ नो रेसिड्यू: जमिनीत जलद विघटन, नंतरच्या पिकांचे नुकसान टाळते.
➔ पर्यावरणीय प्रभाव: मातीमध्ये रेसिड्यू राहत नसल्यामुळे पर्यावरणावरील परिणाम कमी होतो.
पीक व प्रमाण -
पिकाचे नाव | वापर वेळ | तण नियंत्रण | प्रमाण/एकर |
सोयाबीन | पीक पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी आणि तणांच्या 2 ते 4 पानांच्या अवस्थेत. | गवत वर्गीय / अरुंद पानाचे तण | 445 मिली |
भात | लावणी नंतर 10 ते 15 दिवसांनी आणि 2 ते 3 पानांच्या अवस्थेत तण | गवत वर्गीय / अरुंद पानाचे तण | 250 मिली |
कापूस | पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी आणि तणांच्या 2 ते 3 पानांच्या अवस्थेत | गवत वर्गीय / अरुंद पानाचे तण | 300 मिली |
उडीद | पीक पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी आणि तणांच्या 2 ते 4 पानांच्या अवस्थेत. | गवत वर्गीय / अरुंद पानाचे तण | 250 मिली |
कांदा | पुनर्लागवड 20 ते 25 दिवसांनी आणि 2 ते 3 पानांच्या अवस्थेत तण. | गवत वर्गीय / अरुंद पानाचे तण | 350 मिली |
भुईमूग | पीक पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी आणि तणांच्या 2 ते 4 पानांच्या अवस्थेत. | गवत वर्गीय / अरुंद पानाचे तण | 350 मिली |
उत्पादन कसे वापरावे?
➔ सूचना वाचा: वापरण्यापूर्वी लेबल सूचनांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.
➔ संरक्षक किट: फवारणी करताना हातमोजे आणि गॉगलसह योग्य संरक्षणात्मक किट वापरा.
➔ अचूक मिश्रण: तणनाशक तंतोतंत शिफारस केलेल्या डोसनुसार मिसळा.
➔ हवामानाचा विचार: वादळ किंवा पाऊसाचे वातावरण असल्यास फवारणी टाळा.
➔ उपकरणे देखभाल: फवारणी केल्यानंतर पंप स्वछ धुवून ठेवा.
➔ IFC सुपर स्टिकरसह परिणाम वाढवा: तणनाशकाचा रिझल्ट वाढवण्यासाठी IFC सुपर स्टिकर वापरा.
एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू) कीडनाशक
BharatAgri Price 150 मिलीधनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीधानुका अरेवा ( थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी ) कीडनाशक
BharatAgri Price 500 ग्रॅमबायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक
BharatAgri Price 200 ml; 100 ml x 2 | | प्रति 13 पंपनागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 मिली X 2नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिलीधानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके
BharatAgri Price 160 मिलीधानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीUPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकरधानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकरआनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम
BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 ml X 2View All