एफएमसी रोगोर (डाइमेथोएट 30% EC) कीटनाशक

एफएमसी रोगोर (डाइमेथोएट 30% EC) कीटनाशक
Dosage | Acre |
---|
एफएमसी रोगोर (डायमेथोएट 30% EC) कीडनाशकाचे थोडक्यात वर्णन-
एफएमसी रोगोर हे डायमेथोएट 30% EC घटक असलेले एक शक्तिशाली कीडनाशक आहे, जे पिकामधील किडींच्या विविध प्रजातीचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी तयार केले आहे. हे मावा, पिठ्या ढेकूण, हॉपर, तुडतुडे, शेंडा पोखरणारी अळी, स्केल कीड आणि थ्रीप्स यासह विविध किडींविरुद्ध प्रभावी कीटकनाशक आहे. ह्याची लक्ष्यित कृती किडींपासून पिकांचे संपूर्ण संरक्षण आणि निरोगी उत्पादनास प्रोत्साहन देते. एफएमसी रोगोर हे शाश्वत कीड व्यवस्थापन पद्धतींसाठी एक विश्वासार्ह कीडनाशक आहे.
उत्पादनाचे नाव | रोगोर |
उत्पादन सामग्री | डायमेथोएट 30% EC |
ब्रँड | एफएमसी |
श्रेणी | कीडनाशक |
क्रियाची पद्धत | संपर्क आणि आंतरप्रवाही |
शिफारसीत पिके | सर्व पिके |
उत्पादन डोस | 1.5 मिली/लिटर 25 मिली/पंप (15 लिटर पंप) 250 मिली/एकर फवारणी. |
एफएमसी रोगोर कीडनाशक सामग्री/तांत्रिक सामग्री/रासायनिक रचना -
एफएमसी रोगोर कीडनाशक मध्ये डायमेथोएट 30% EC रासायनिक घटक आहे, हे एक शक्तिशाली रासायनिक संरचना आहे जी विविध प्रकारच्या पिकामधील किडींचे प्रभावीपणे सामना करण्यासाठी, मजबूत पीक संरक्षण आणि उत्पादन वाढ सुनिश्चित करण्यासाठी तयार केलं आहे.
कृतीची पद्धत -
एफएमसी रोगोर (डायमेथोएट 30% EC) एसिटाइलकोलिनेस्टेरेस इनहिबिटर म्हणून कार्य करते, किडीच्या मज्जासंस्थेमध्ये व्यत्यय आणते, शेवटी पक्षाघात होऊन किडीचा मृत्यू होतो. त्याची कार्यपद्धती विविध प्रकारच्या किडींवर प्रभावी नियंत्रण प्रदान करते.
वैशिष्ट्ये आणि फायदे -
➔ प्रभावी सूत्र: किडींच्या विविध प्रजातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफएमसी रोगोर डायमेथोएट 30% EC चांगल्या प्रभावीतेसाठी ओळखले जाते.
➔ ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण: सर्वसमावेशक कीड व्यवस्थापन करते जसे कि, मावा, फुलकिडे, कोळी आणि पांढरी माशी सह विविध किडीना लक्ष्य करते.
➔ आंतरप्रवाही क्रिया: कीड नियंत्रणासाठी वनस्पतींच्या ऊतींमध्ये प्रवेश करून आंतरप्रवाही क्रिया करते.
➔ जलद गतीने काम: शिफारशीत किडींविरुद्ध जलद गतीने काम करते.
➔ दीर्घकाळ क्रियाकलाप: फवारणी केल्यानंतर दीर्घकाळासाठी काम करते.
➔ जास्त पीक उत्पादन: हानीकारक किडींचे प्रभावीपणे नियंत्रण करून, एफएमसी रोगोर पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यात मदत करते.
➔ कमी पीक नुकसान: किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारे उत्पादनाचे नुकसान टळते, त्यामुळे पीक उत्पादकता आणि नफा सुरक्षित राहतो.
➔ पीक आरोग्य: किडींच्या प्रादुर्भावामुळे झाडांवरील ताण कमी करते, निरोगी पीक वाढ आणि विकासाला चालना देते.
एफएमसी रोगोर (डायमेथोएट 30% EC) कीटकनाशकाचा वापर आणि डोस-
कीड नियंत्रणासाठी पिकानुसार कीडनाशकाची वापराबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.
पिकाचे नाव | लक्ष्यित कीड |
डोस / एकर (200 लिटर पाणी)
|
मोसंबी | मावा , सिट्रस सायला | 80 मिली |
सफरचंद, नाशपाती, प्लम आणि पीच | मावा, लोकरी मावा, कोळी | 150 मिली |
भुईमूग, तंबाखू, कापूस, गहू आणि ज्वारी | मावा | 300 मिली |
वाल, कोबी, फुलकोबी, वेलवर्गीय पिके आणि स्ट्रॉबेरी | मावा | 150 मिली |
द्राक्ष | पिठ्या ढेकूण | 150 मिली |
एफएमसी रोगोर (डायमेथोएट 30% EC) कीटकनाशक कसे वापरावे?
➔ लेबल वाचा: डोस, सुरक्षितता खबरदारी आणि प्रथमोपचार यावरील महत्त्वपूर्ण माहितीसाठी उत्पादन लेबल काळजीपूर्वक वापरा.
➔ सुरक्षा किट वापरा: लेबलवर शिफारस केल्यानुसार, हातमोजे आणि मास्क सह योग्य पीपीई किट वापरा.
➔ मिश्रण आणि वापरण्याचा डोस: एफएमसी रोगोर (डायमेथोएट 30% EC) कीटकनाशकाचे
➔ अचूक मोजमाप करून एकसमान द्रावण तयार करा.
➔ वापरण्याची वेळ: लेबलवर दर्शविल्याप्रमाणे लक्ष्य किडीच्या संवेदनाक्षम जीवन अवस्थेत वापर करा.
➔ वापरण्याचा दर: अतिवापर टाळण्यासाठी आणि पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी शिफारस केलेल्या डोस नुसार अनुसरण करा.
➔ स्टिकर वापरण्याचे फायदे: एफएमसी रोगोर (डायमेथोएट 30% EC) कीडनाशकापासून चांगले परिणाम मिळविण्यासाठी आयएफसी सुपर स्टिकरचा वापर करा.
