आयएफसी नीम 10000 पीपीएम (नीम तेल 1% ईसी) जैविक कीडनाशक (1+1 कॉम्बो)
आयएफसी नीम 10000 पीपीएम (नीम तेल 1% ईसी) जैविक कीडनाशक (1+1 कॉम्बो)
Dosage | Acre |
---|
आयएफसी निम 10000 पीपीएम (निम तेल) जैविक कीडनाशक -
आयएफसी निम हे 10,000 पीपीएम अझाडिरॅक्टिन आणि कडुनिंब तेलाचे मिश्रण असलेले कडुनिंब आधारित जैव कीडनाशक आहे, हे अनेक पद्धतीने काम करते जसे की, परतवून लावणे (रिपेलंट), किडीचे खाणे बंद करणे, किडीची वाढ थांबवणे, पिकावर अंडी घालण्यास आणि उबवण्यास प्रतिबंधित करते.
उत्पादनाचे नांव | निम 10000 पीपीएम |
उत्पादन सामग्री |
अझाडिरॅक्टिन 10000 पीपीएम किंवा 1% EC
|
श्रेणी | जैविक कीडनाशक |
उत्पादन कंपनी | इंडियन फार्मर कंपनी (आयएफसी) |
क्रियेची पद्धत | स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही |
शिफारसीत पिके | सर्व पिके |
उत्पादन डोस | 1.5 मिली / लिटर. 25 मिली / पंप (15 लिटर पंप) 250 मिली / एकर फवारणी.. |
क्रियेची पद्धत-
पिकामध्ये आंतरप्रवाही आणि संपर्क क्रिया केल्यामुळे, ते पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत किडीचे अन्नग्रहण थांबवते, ज्यामुळे किडीच्या शरीरात पाणी आणि अन्नाची कमतरता होते, ज्यामुळे सर्व किडीना अर्धांगवायू होऊन कीड लगेच मरते. हे सर्व कीटकनाशकांवरील किडींचा प्रतिकार त्वरित नष्ट करते.
पीक आणि लक्षित कीड -
पिकांचे नाव | लक्षित कीड | डोस / एकर |
सर्व भाजीपाला आणि फळ पिके | सर्व अळ्या, फळ पोखरणारी अळी आणि रस शोषक किडींच्या सुरुवातीच्या अवस्था. | 250 मिली |
फायदे-
➔ आयएफसी निम 10000 पीपीएम हे ब्रॉड-स्पेक्ट्रम कीडनाशक आहे.
➔ पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, कोळी आणि इतर रस शोषक कीड आणि अळी नियंत्रित करते.
➔ आयएफसी निम 10000 पीपीएम वापरल्याने सर्व किडींची अंडी नष्ट होतात, तसेच अळ्या देखील लहान अवस्थेतच नष्ट होतात.
➔ हे पर्यावरणास अनुकूल आणि सेंद्रिय शेतीसाठी फायदेशीर आहे.