धानुका वनकिल क्विझालोफॉप इथाइल 4% + ऑक्सिफ्लोरफेन 6% EC तणनाशक
धानुका वनकिल क्विझालोफॉप इथाइल 4% + ऑक्सिफ्लोरफेन 6% EC तणनाशक
Dosage | Acre |
---|
वनकिल तणनाशक :
वनकिल (क्विझलोफोप इथाईल 4% + ऑक्सीफ्लोरफेन 6% EC) हे दोन नवीन प्रगत रसायनाचे मिश्रण आहे जे तणाची उगवण झाल्यानंतर, संपर्क आणि आंतरप्रवाही पद्धतीने काम करते, जे अरुंद पानाचे तण तसेच रुंद पानांचे तण (गोल पानाचे) नियंत्रित करते. वनकिल हे तणाची पाने आणि मूळ प्रणालीद्वारे शोषले जाते आणि बहुतेक तणांपासून जास्त काळ नियंत्रण प्रदान करते. शिवाय, वनकिल वापरल्यानंतर 1-2 तासांनी पाऊस पडल्यास रिझल्ट वर परिणाम होणं नाही.
उत्पादनाचे नांव | वनकिल तणनाशक |
उत्पादन सामग्री | क्विझालोफॉप इथाइल 4% + ऑक्सीफ्लोरफेन 6% EC |
क्रियेची पद्धत | आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य |
उत्पादन कंपनी | धानुका |
उत्पादन डोस | 2 मिली/लिटर. 30 मिली/पंप (15 लिटर पंप) 300 मिली/एकर स्प्रे. |
क्रियेची पद्धत :
वनकिल दुहेरी पद्धतीने काम करते आणि उत्कृष्ट प्रकारे वाहन होते. हे पानांमधून शोषले जाते आणि फ्लोममधून खालील दिशेने (पानांपासून ते मूळांपर्यंत ) पसरते. हे मुळांद्वारे देखील शोषले जाते आणि जाइलम मधून वरच्या दिशेने जाते. हे रसायन एसिटाइल-कोए कार्बोक्झिलेझद्वारे फॅटी ऍसिडचे संश्लेषण रोखते आणि लिपिड पेरोक्सिडेशनद्वारे व्यत्यय आणते.
पीक आणि लक्षित तण :
पिकाचे नाव | लक्षित तण | डोस / एकर |
कांदा | इचिनोक्लोआ प्रजाति, एलुसीन इंडिका, डिजिटेरिया प्रजाति। (अरुंद पैनांचे तं); ट्रायनथेमा एसपी., अमरेंथस एसपीपी, पोर्टुलाका एसपी., यूफोरबिया एसपी., एनागैलिस अर्वेन्सिस, चेनोपोडियम एल्बम (ब्रॉड लीफ) | 400 मि.ली |
तणनाशक वापरण्याची वेळ : चांगल्या रिझल्टसाठी तण 3 पानाचे असताना वनकिल वापरावे.
फायदे :
1. वनकिल 10% EC हे तणमुक्त कांदा पीक उत्पादनासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे.
2. वनकिल 10% EC हे दुहेरी पद्धतीने तण उगवणीनंतरचे तणनाशक आहे जे बहुतेक वार्षिक गवत आणि विस्तृत पानांचे तण नियंत्रित करते.
3. वनकिल 10% EC पानांद्वारे आणि मूळ प्रणालीद्वारे शोषले जाते.
4. वनकिल वापरल्यानंतर 1-2 तासांनी पाऊस पडल्यास रिझल्ट वर परिणाम होणं नाही.