vermiwash

vermiwash: शेतीमध्ये वर्मीवॉश वापरण्याचे फायदे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण सेंद्रिय शेतीमधील टॉनिक व्हर्मिवॉश (vermiwash) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.  शेतीत शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय किंवा संतुलित खतांकडे वळालेला दिसून येतोय. सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ आणि गांडूळ खताला अनन्यसाधारण महत्व आहे. गांडूळाला तर शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. गांडूळ अर्क हे सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. गांडूळ खतात ओलावा राहावा म्हणून आपल्याला पाणी शिंपडावे लागते. हे पाणी खाली झिरपत जाऊन जे मिळते, त्याला आपण वर्मीवॉश म्हणतो. वर्मीवॉशचा वापर आपण एक सेंद्रिय टॉनिक म्हणून करतो. गांडूळखताप्रमाणेच वर्मीवॉशही पिकाच्या वाढीसाठी उत्तम मानला जातो. गांडूळ अर्कलाच इंग्रजीमध्ये वर्मीवॉश असे म्हणतात. त्यातील अन्नद्रव्ये पिकांना त्वरित उपलब्ध होत असतात. पिकांना योग्य वेळेत अन्नद्रव्ये मिळाल्याने उत्पादनात वाढ होते. वर्मीवॉश नेहमी सावलीत ठेवावे. आवश्यकतेनुसार पिकावर फवारावे. वर्मीवॉशमध्ये पिकांच्या आणि वनस्पतींच्या वाढीसाठीचे प्रमुख संप्रेरक, सूक्ष्म पोषक आणि नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ज्यामुळे पिकाच्या रोग्रतिकारकशक्ती मध्ये वाढ होते. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. गांडूळखत नसल्यास व्हर्मिवॉश मार्केट मध्ये विकत मिळते. आपल्या भागानुसार त्याची किंमत vermi wash price वेगळी असू शकते. 


व्हर्मिवॉश बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

1. दोन माठ - एक लहान एक मोठा, तिपाई ( माठ ठेवण्यासाठी), अर्धवट कुजलेले शेणखत व काही सेंद्रिय पदार्थ, गिरिपुष्प,लुसर्नघास व कडूनिंबाचा कोवळा पाला, पूर्ण वाढ झालेले निरोगी गांडुळे (1000 किंवा अर्धा किलो)

2. गरजेइतके पाणी, अर्क जमा करण्यासाठी चिनीमातीचे भांडे, पोयटा माती


व्हर्मिवॉश बनवण्याची पद्धत -

एक जुना माठ घेऊन त्याच्या तळाला बारीक छिद्र करून त्या छिद्रात कापडाची वात किंवा कापसाची वात टाकावी. तो माठ एका तिपाईवर ठेवावा. माठाच्या तळाशी जाड वाळूचा 5 इंचाचा थर लावावा त्यावर अर्धवट कुजलेल्या शेणखताचा थर लावावा, त्यावरून हलकेसे पाणी मारावे. नंतर त्याच ओलाव्यात अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली निरोगी गांडुळे सोडावीत. गांडूळांना खाद्य म्हणून गिरिपुष्प,लुसर्नघास व कडूनिंबाचा कोवळापाला प्रत्येकी अर्धा किलो शेण स्लरीसह मिसळावा. मोठ्या माठावर लहान माठ पाणी भरून ठेवावा.त्याखाली तळाला छिद्र करून वात बसवावी म्हणजे थेंब थेंब पाणी मोठ्या माठात पडेल. तिपाईच्या खाली वर्मीवाश जमा करण्यास चिनिमातीचे अथवा काचेचे भांडे ठेवावे. पहिल्या सात दिवसांत जमा झालेले पाणी पुन्हा वरील माठात टाकावे.त्यांनतर सात दिवसांनी जमा होणाऱ्या पाण्यास “गांडूळखतपाणी” किंवा “वर्मीवाश” असे म्हणतात. ते पिकांवर फवारण्यास योग्य असते. वर्मीवॉश मधील घटक - सामू- 6.8, सेंद्रिय कर्ब 0.03 %, नत्र 0.005 %, स्फुरद 0.0025 %, पालाश- 0.063 %, कॅल्शियम 786 मिलीग्रॅम प्रति लिटर आहे. 


वर्मीवॉश कसे वापरावे -

1. कोणत्याही रोपांची पुर्नलागवड करण्याआधी रोपांची मुळे वर्मीवॉश 1 भाग आणि पाणी 5 भाग या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवावीत.

2. वर्मीवॉशचे पाण्यासोबत 1:5 असे द्रावण करून म्हणजेच १ लिटर व्हर्मिवॉश ५ लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारणी करावी. त्यामुळे पिकाची वाढ होऊन उत्पादन वाढते.

वर्मीवॉश वापरण्याचे फायदे (vermi wash uses) -

1. मातीच्या आरोग्यात सुधारणा होते : वर्मी वॉश मद्ये काही फायदेशीर सूक्ष्मजीव असतात. जे की मातीचा पोत, मातीची रचना, मातीमध्ये हवेचे प्रमाण आणि पाण्याचा निचरा हे सुधारण्यासाठी मदत करतात.

2. पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त : वर्मीवॉशमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सूक्ष्म पोषक घटकद्रेयासह विविध प्रकारचे वनस्पती पोषक असतात. हे पोषक अशा स्वरूपात असतात जे वनस्पतींद्वारे सहजपणे शोषले जातात. वर्मीवॉशमध्ये पिके आणि वनस्पती च्या वाढीचे संप्रेरक देखील असतात, जे वनस्पतींची आणि पिकांची वाढ आणि विकास सुधारण्यास मदतगार ठरतात.

3. वनस्पती आणि पिकांची रोग्रतिकारकशक्ती वाढण्यास उपयोगी : वर्मी वॉश मध्ये असे काही सूक्ष्मजीव असतात जे पिकांवरील रोग आणि किटकांपासून प्रतिकारशक्ती पुरवते. 

4. पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास उपयोगी : वर्मीवॉश फळे, भाज्या आणि फुलांसह विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयोगी पडते आहे. वर्मीवॉश सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यासाठी हे सुरक्षित आणि प्रभावी खत असे उत्तम खत आहे.

 

Conclusions | सारांश -

वर्मी वाश हे एक प्रकारचे द्रव खत आहे यालाच वर्म लीचेट किंवा गांडूळ पाणी असे देखील म्हणेल जाते. हे पाणी गांडूळ आणि शेणखत यांच्या पासून बनवले जाते. हे एक प्रकारचे सेंद्रिय खत आहे. हे पिकांच्या वाढीसाठीचे प्रमुख संप्रेरक, सूक्ष्म पोषक तत्व आणि नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ज्यामुळे पिकाच्या रोग्रतिकारकशक्ती मध्ये वाढ होते. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होऊन पिकाचे उत्पादन वाढते. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. वर्मीवॉश म्हणजे काय?

उत्तर - गांडूळ खतात ओलावा राहावा म्हणून आपल्याला पाणी शिंपडावे लागते. हे पाणी खाली झिरपत जाऊन जे मिळते, त्याला आपण वर्मीवॉश म्हणतो.

2. व्हर्मिवॉशमध्ये कोण कोणते घटक आहेत?

उत्तर- वर्मीवॉश मधील घटक-  सामू- 6.8, सेंद्रिय कर्ब 0.03 %, नत्र 0.005 %, स्फुरद 0.0025 %, पालाश- 0.063 %, कॅल्शियम 786 मिलीग्रॅम प्रति लिटर आहे. 

3. व्हर्मिवॉशचा वापर कोणत्या पिकामध्ये करू शकतो?

उत्तर - व्हर्मिवॉशचा वापर सर्व तृणधन्य, कडधान्य, भाजीपाला तसेच फळ पिकामध्ये करू शकतो

4. व्हर्मिवॉशचा फवारणीसाठी वापर कसा करावा ?

उत्तर- वर्मीवॉशचे पाण्यासोबत 1:5 असे द्रावण करून म्हणजेच 1 लिटर व्हर्मिवॉश 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारणी करावी. 


People also read | हे देखील वाचा - 


1. भाजीपाला पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण

2. ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन

3. स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. कुसुम सोलर पंप योजना 2024 ची संपूर्ण माहिती
लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी