poultry manure: कोंबडी खत - घटक, वापर, किंमत आणि फायदे

poultry manure: कोंबडी खत - घटक, वापर, किंमत आणि फायदे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण कोंबडी खत (poultry manure) - घटक, वापर, किंमत आणि फायदे बद्दल सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. सध्या जमिनीमध्ये रासायनिक खतांच्या जास्त प्रमाणामध्ये वापर होत असल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे खूपच कमी होत चालले आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. शेतामध्ये वापरण्यासाठी विविध प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते. कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो. ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात. 

 

कोंबडी खत म्हणजे काय ?

कोंबड्यांच्या लिटरसाठी वापरलेला लाकडाचा भुस्सा, कोंबड्यांची विष्ठा, साळीचा भुस्सा, शेंगाची टरफले इ. सर्व घटक कुजल्यानंतर तयार झालेला पदार्थ म्हणजे कोंबडी खत (poultry khat). कोंबडी खताची प्रत ही कोंबडीची जात, वापरण्यात आलेले लिटरचे साहित्य, कोंबडी खाद्य, जागा, पाण्याचा वापर यांसारख्या घटकांवर अवलंबून असते.

 

कोंबडी खत घटक (kombadi khat content)

कोंबडी खतामध्ये (chicken manure fertilizer) तेरा अन्नद्रव्ये असतात. त्यामध्ये नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असतं. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट, यूरिक ॲसिडया प्रमाणात आढळते. मुख्य अन्नद्रव्य व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सोडियम, बोरन, झिंक, कॉपर, इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सुकवलेल्या एक टन "केज पोल्ट्री खता'चे मूल्य हे 100 किलो युरिया, 150 किलो सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश, 125 किलो कॅल्शिअम कार्बोनेट, 30 किलो गंधक, दहा किलो मॅग्नेशिअम सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट एक किलो मॅंगेनीज सल्फेट, झिंक सल्फेट आदी व अन्य अंशात्मक घटकांएवढे असते.

 

चांगल्या खताचे गुणधर्म (poultry manure)

1. खताचा रंग भुरकट, तपकिरी, काळपट असावा. वास मातकट असावा
2. खताचा सामू 6.5 - 7.5 दरम्यान असावा.
3. कणांचा आकार 5 ते 10 मिमी असावा.
4. कर्ब नत्र गुणोत्तर 1:10 ते 1:20 दरम्यान असावे.
5. जलधारणाशक्ती 30 टक्क्यांपेक्षा जास्त असावी.

 

खत तयार करण्याची पद्धत

1. पोल्ट्री शेडमधील लिटर शेडच्या बाहेर काढल्यानंतर त्याचे व्यवस्थित थर लावावेत.
एक टन कोंबडी लिटरसाठी दोन किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धक मिसळावे.
पुरेसा ओलावा (30 ते 40 टक्के) राहील एवढे पाणी शिंपडावे.

2. खताच्या ढिगाची एक महिन्याच्या अंतराने 2 ते 3 वेळा नियमित चाळणी करावी.

3. खताच्या ढिगाचे तापमान 40 ते 50 अंश सेल्सिअस एवढे राखावे.

4. चांगल्या गुणवत्तेचे कोंबडी खत तयार होण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागतो.

5. सध्या कोंबडी खत हे व्यावसायिक स्वरूपात ही तयार करतात. कोंबडी खताच्या पॅलेट 5 ते 25 किलोच्या बॅगेत मिळतात.

 

कोंबडी खत केव्हा वापरावे (poultry manure uses)

1. पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर मशागतीच्या वेळी कोंबडीखत (kombadi khat) जमिनीत मिसळावे. जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी 5 ते 20 टन खताचा वापर करावा. 

2. मशागत झाल्यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकांत जमिनीत मिसळू नये.

3. उभ्या पिकांत कोंबडीखत जमिनीत मिसळण्यापूर्वी प्रथम त्यावर एक महिना पाणी मारून रापून किंवा थंड होऊ द्यावे म्हणजे कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर कमी होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.

4. कोंबड्यांची विष्ठा, मूत्र, गव्हांडा किंवा भाताच्या तुसावर पडून खत तयार होते, त्यामुळे ताज्या कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर जास्त असते. असे खत उभ्या पिकांत जमिनीत मिसळताना ओलावा असला पाहिजे.

5. जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक पिवळे पडते, त्यामुळे ताजे कोंबडीखत (kombadi khat) थेट पिकांसाठी वापरू नये. उभ्या पिकांत पूर्ण कुजलेले कोंबडीखत वापरावे.

6. हलक्‍या, जास्त निचऱ्याच्या, लालसर तांबड्या जमिनीत कोंबडीखतातील (poultry manure) नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सोडिअमचे प्रमाण जमिनीत मिसळले जाऊन पिकांना उपलब्ध होतात. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. शेणखतासारखा तणांचा प्रादुर्भाव कोंबडीखतातून होत नाही. 

 

कोंबडी खत किंमत (kombadi khat price)

कोंबडी खताची किंमत (poultry manure price) आपल्या भागानुसार वेगवेगळी असू शकते. गावरान कोंबडी खत हे 150 रुपये प्रति 40 किलो बॅग मिळते तर हायब्रड कोंबडी खत 110 रुपये प्रति 40 किलो बॅग मिळते. 

 

Conclusions | सारांश -

रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्रब कमी होत चालेले आहे परिणामी पिकाची उत्पादन कमी होते. जमिनीचा पोत सुधारून जमिनीची सुपीकता तसेच पिकाचे उत्पादन वाढवण्याची सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत (poultry manure) वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. या मध्ये मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यामुळे पिकाचे उत्पादन वाढते. 

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

 

1. कोंबडी खत म्हणजे काय?

उत्तर - कोंबड्यांच्या लिटरसाठी वापरलेला लाकडाचा भुस्सा, कोंबड्यांची विष्ठा, साळीचा भुस्सा, शेंगाची टरफले इ. सर्व घटक कुजल्यानंतर तयार झालेला पदार्थ म्हणजे कोंबडी खत.

2. कोंबडी किती खत तयार करते?

उत्तर- एक कोंबडी वर्षाला २० किलो पर्यंत कोरडे खत तयार करते. 

3. कोंबडी खत वापरताना एक एकरासाठी किती खत द्यावे?

उत्तर - जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी 5 ते 20 टन खताचा वापर करावा. . 

4. कोंबडी खत कधी द्यावे?

उत्तर- पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर मशागतीच्या वेळी कोंबडीखत (kombadi khat) जमिनीत मिसळावे. 

 

People also read | हे देखील वाचा - 

1. भाजीपाला पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण

2. ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन

3. स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. कुसुम सोलर पंप योजना 2024 ची संपूर्ण माहिती

 

लेखक | Author

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी