jowar fertilizer dose

jowar fertilizer dose: यंदा तुमच्या ज्वारी पिकाला ही खते नक्की द्या.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण रब्बी ज्वारी पिकातील खत व्यवस्थापनाबद्दल jowar fertilizer dose सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड होत नाही. पावसाच्या ओलीवर 5 सें.मी. खोल रब्बी ज्वारीची लागवड करतात. मराठवाड्यात दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते. रब्बी ज्वारीसाठी 1 ते 15 ऑक्‍टोबर हा कालावधी सर्वांत चांगला असून, या काळात पेरणी केल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळते.


रब्बी ज्वारी खत व्यवस्थापन | Jowar fertilizer dose -


1. हलकी जमीन व कमी पर्जन्यमान क्षेत्र - 

ज्या ठिकाणी हलकी जमीन आणि कमी पर्जन्यमान क्षेत्र आहे अशा ठिकाणी बागायती जमिनीसाठी शिफारसीत असलेल्या खत मात्रे पेक्षा थोडे कमी खत दिले जाते. हलक्या जमिनीसाठी शिफारसीत डोस - 23 किलो नत्र, 12 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश प्रति एकर द्यावे. हि मात्र खतांमधून fertilizer for jowar देण्याची असल्यास खालील प्रकारे द्यावी. 

👉युरिया 50 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो 

👉युरिया 40 किलो + डायअमोनिअम फॉस्फेट (डी.ए.पी) 25 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो 

👉युरिया 40 किलो + 10:26:26 - 50 किलो 

(सूचना - रब्बी ज्वारी खत व्यवस्थापनमध्ये (jowar khat niyojan) वरील पैकी कोणत्याही एका पद्धतीचा प्रति एकर खत देण्यासाठी वापर करावा. सर्व पद्धतीमध्ये युरियाची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी आणि अर्धी मात्रा पेरणीपासून 30 दिवसानी द्यावी.)


2. काळी जमीन व मध्य ते उच्चं पर्जन्यमान क्षेत्र -

ज्या ठिकाणी काळी जमीन आणि मध्य ते उच्चं पर्जन्यमान क्षेत्र आहे अशा ठिकाणी बागायती जमिनीसाठी शिफारसीत असलेल्या खत fertilizer for jowar  मात्रा द्यावी. काळ्या जमिनीसाठी शिफारसीत डोस - 32 किलो नत्र, 16 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाश प्रति एकर द्यावे. हि मात्र खतांमधून देण्याची असल्यास खालील प्रकारे द्यावी. 

👉युरिया 75 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो 

👉युरिया 50 किलो + डायअमोनिअम फॉस्फेट (डी. ए.पी) 40 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो 

👉युरिया 50 किलो + 10:26:26 - 65 किलो 

(सूचना - रब्बी ज्वारी खत व्यवस्थापनमध्ये (jowar khat niyojan) वरील पैकी कोणत्याही एका पद्धतीचा प्रति एकर खत देण्यासाठी वापर करावा. सर्व पद्धतीमध्ये युरियाची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी आणि अर्धी मात्रा पेरणीपासून 30 दिवसानी द्यावी.)

मातीपरीक्षण केले असल्यास अहवालानुसार मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे. किंवा मुख्य खतांसोबत मायक्रोनुट्रीएंट खत 10 किलो + सल्फर 3 किलो प्रति एकरी द्यावे. 


Conclusions | सारांश -

रब्बी हंगामातील ज्वारी पिकामध्ये अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी सुधारित वाणांचा वापर तसेच कीड रोग नियोजन सोबत योग्य खत व्यवस्थापन  jowar fertilizer dose असल्यास अपेक्षित उत्पादन गाठता येते. या लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे विविध प्रकारे खताच्या मार्फत अन्नद्रव्य व्यव्थापन करू शकतो. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. कोरडवाहू ज्वारी पिकास प्रति एकरी किती खत द्यावे?

उत्तर- कोरडवाहू ज्वारीस 23 किलो नत्र, 12 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश प्रति एकर द्यावे.

2. बागायती ज्वारी पिकास प्रति एकरी किती खत द्यावे?

उत्तर- बागायती ज्वारीस ३२ किलो नत्र, १६ किलो स्फुरद आणि १६ किलो पालाश प्रति एकर द्यावे.  

3. ज्वारी पिकास मुख्य अन्नद्रव्यांसोबत कोणते खत द्यावे?

उत्तर- मुख्य अन्नद्रव्यांसोबत मायक्रोनुट्रीएंट खत १० किलो + सल्फर ३ किलो प्रति एकरी द्यावे. . 


People also read | हे देखील वाचा - 

1. गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न

2. रब्बी हंगामात ज्वारीच्या या वाणांची पेरणी करा आणि मिळवा भरगोस उत्पादन

3. डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रणलेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी