🌱 हळद आणि आले पिकांमधील करपा रोगाचे एकात्मिक नियंत्रण 👍

🌱 हळद आणि आले पिकांमधील करपा रोगाचे एकात्मिक नियंत्रण 👍

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱 हळद आणि आले पिकांमधील करपा रोगाचे एकात्मिक नियंत्रण 👍

हळद आणि आले हे मसाल्याचे पीक असून मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हळद व आले या पिकांची शाकीय वाढ पूर्ण होऊन कंद वाढ होत आहे. शाकीय अवस्थेत पानात अन्न साठविले जाते. सातव्या महिन्यानंतर ते कंदाच्या वाढीसाठी वापरले जाते. मात्र रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास रोग व कीड यांच्याकडूनच अन्नाचा वापर केला जातो. परिणामी उत्पादनात घट येते. सतत पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. हळद आणि आले पिकामध्ये होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपैकी करपा हा महत्वाचा रोग आहे. ह्या रोगाचे वेळीच नियंत्रण न झाल्यास उत्पादनामध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असते.

✅ करपा रोगाची लक्षणे आणि कारणे -
👉 मातीमधील जास्त ओलावा, तसेच २५ डिग्री सेन्टीग्रेड पेक्षा जास्त तापमान या रोगास कारणीभूत असते.
👉 सकाळी पडणारे धुके व दव या रोगास अनुकूल असते.
👉 कॉलेटोटिकम बुरशीमुळे पानांवर अंडाकृतीठीपके पडतात.
👉तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते.
👉 टॅफ्रीना या बुरशीमुळे लहान तांबूस रंगाच्या संख्या गोलाकार ठिपके पानांवर आढळतात पुढे वाढत जाऊन संपूर्ण पान करपते.

✅ करपा रोगाचे एकात्मिक नियंत्रण -
👉 लागवडीपूर्वी कंद कार्बेन्डाझिम २.५ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये कंद १० मिनिटे बुडवून ठेवावीत. नंतर सावलीमध्ये सुकवून लागवडीस वापरावीत.
👉 खताची मात्र शिफारसी प्रमाणे द्यावी. नत्र खताचा वापर जास्त प्रमाणामध्ये करू नये.
👉 धुके पडू लागल्यास ट्रायकोडर्मा व्हिरीडी २.५ ते ३ मिली किंवा प्सुडोमोनास फ्लुरोसन्स २.५ ते ३ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
👉 रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत.
👉 धानुकोप (कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यूपी) - ५०० ग्राम
👉 सिक्सर (कार्बेन्डाजिम 12% + मैनकोजेब 63% डब्ल्यूपी) - ४०० ग्राम
👉 अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68% डब्ल्यूपी) - ४०० ग्राम
👉 ताकत (कैप्टन 70% + हेक्साकोनाज़ोल 5% डब्ल्यूपी) - ४०० ग्राम
👉 एंट्राकोल (प्रोपीनेब 70% डब्लू पी ) - ५०० ग्राम
👉 गोडीवा सुपर (एज़ोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डिफेनोकोनाज़ोल 11.4% एससी) - २०० मिली

( टीप - या पैकी कोणतेही बुरशीनाशके १५ दिवसांच्या अंतराने प्रति एकरी २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.)

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी