biovita seaweed

biovita seaweed: बायोविटा टॉनिक ची संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. “biovita seaweed: बायोविटा टॉनिक ची संपूर्ण माहिती”  या लेखामध्ये आपण बायोविटा टॉनिक (biovita seaweed extract) बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. बायोविटा हे जैविक टॉनिक पी. आय. या कंपनीचे उत्पाद असून ते आपण कोणत्याही पिकामध्ये, पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये वापरू शकतो, वापरण्याचे प्रमाण, किंमत याविषयी सर्व काही माहिती घेणार आहोत. चला जाणून घेऊयात बायोविटा टॉनिक बद्दल. 

बायोविटा टॉनिक (biovita seaweed extract) काय आहे?

बायोविटा टॉनिकमध्ये (pi biovita) सी वीड एक्सट्रॅक्ट हा घटक आहे. सी वीड म्हणजे समुद्राच्या आत वाढणारे शैवाल. समुद्राच्या खोलीत आढळणारे शैवाल वनस्पतीचा अर्क काढला जातो. सीव्हीडमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे पिकाच्या सर्वागीण वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत. थोडक्यात समुद्रातून मिळणाऱ्या काही विशिष्ट शैवालापासून जो अर्क काढला जातो त्याला सी विड एक्स्ट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क म्हणतात. 

प्रॉडक्ट 

बायोविटा

घटक

सी विड एक्स्ट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क

कंपनी 

पी. आय.

क्रियेची पद्धत

आंतरप्रवाही 

वापर 

फवारणी 

वापरण्याची वेळ 

शाखीय वाढ, फुल, फळ विकास अवस्था

शिफारसीत पिके 

सर्व कडधान्य, तृणधान्य, भाजीपाला आणि फळ पिके 

प्रमाण 

2 मिली/लिटर.  

30 मिली/पंप (15 लिटर पंप)

400 मिली/एकर फवारणीसाठी.    

किंमत 

(biovita fertilizer price)

250 मिली - 308

500 मिली - 598

1 लिटर - 989

 

बायोविटा टॉनिकमध्ये आढळणारे मुख्य घटक

बायोविटा (biovita seaweed extract) टॉनिकमध्ये आढळणाऱ्या सी विड एक्स्ट्रॅक्ट (सी विड एक्सट्रॅक्ट) मध्ये ७० हून अधिक खनिजे, जीवनसत्त्वे आणि एन्झाइम्स असतात जे पिकाच्या वाढीसाठी तसेच माती सुपीक बनवण्यासाठी फायदेशीर असतात. सी विड एक्स्ट्रॅक्ट मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, लोह, झिंक, बोरॉन, कॅल्शियम, आयोडीन, मॉलिब्डेनम आणि ऑक्सीन्स, गिबेरेलिन, प्रतिजैविक इत्यादी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्ये आणि जीवनसत्वे आढळतात. 

 

बायोविटा टॉनिक - एक उत्कृष्ट प्लांट ग्रोवथ प्रोमोटर 

पी. आय. कंपनीचे बायोविटा टॉनिक (biovita seaweed extract) हे नैसर्गिकरित्या प्राप्त केलेले आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वांचे सीव्हीड अर्क असलेले प्रगत जटिल मिश्रण जे सुपर चार्जर म्हणून काम करते. हे पानांच्या वाढीस मदत करते आणि अधिक फुले आणि शेवटी फुलाची सेटिंग करण्यास मदत करते. 

 

बायोविटा टॉनिक (biovita seaweed extract) वापरण्याचे फायदे 

1. बायोविटा टॉनिक (biovita pi) पिकाचे अन्नद्रव्य शोषण सुधारते, ज्यामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते.

2. ड्रेंचिंग/आळवणी केल्यास पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते. 

3. मातीची सुपीकता वाढून सूक्ष्म जीवांची संख्या वाढण्यास मदत होते. 

4. पिकाच्या वाढीसह अधिक फुले आणि शेवटी फळांत रूपांतर करण्यास मदत करते. 

5. एकसमान फळांचा आकार आणि वजन मिळण्यास मदत होते.

6. पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते. 

7. पिकाची गुणवत्ता सुधारते, उत्पादन वाढते.

8. बायोडिग्रेडेबल आणि अवशेष मुक्त. 

9. पर्यावरणीयदृष्ट्या सुरक्षित, पिकावर आणि मातीवर कोणतेही अवशेष नाहीत.

 

Conclusion | सारांश 

बायोविटा (biovita seaweed extract) टॉनिकमधील सी विड एक्स्ट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क हे पूर्ण परिपूर्ण जैविक टॉनिक असून ह्याची ड्रेंचिंग केल्यास पांढऱ्या मुळांची वाढ करते व फवारणीच्या माध्यमातून दिल्यास पिकाची प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढते त्यामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते. फुलांची संख्या जास्त लागून फळाची गुणवत्ता सुधारते. परिणामी उत्पादनामध्ये वाढ होते. 


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

 

1. सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क म्हणजे काय?

ऊत्तर - समुद्रामध्ये वाढणाऱ्या शैवाल वनस्पतीपासून काढलेल्या अर्कास सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क म्हणतात. 

2. बायोविटा टॉनिकचे फायदे काय आहे?

ऊत्तर - पिकाची सर्वागीण वाढ करून फळाची गुणवत्ता सुधारते व उत्पादन वाढीस मदत करते. 

3. बायोविटा टॉनिक कोणत्या रसायनासोबत मिसळू शकतो?

ऊत्तर - कोणत्याही रासायनिक किंवा जैविक कीडनाशक किंवा बुरशीनाशक सोबत मिळसावू शकतो.  

4. बायोविटा टॉनिक कधी वापरावा? 

ऊत्तर -  पिकाची शाखीय अवस्था, फुल अवस्था आणि काढणीच्या 20 दिवस अगोदर वापरावा. 

5. बायोविटा टॉनिकचे रेसिड्यू / अवशेष पिकामध्ये आढळून येतात का?

ऊत्तर - सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क हे पूर्णजैविक असल्याने ह्याचे पिकामध्ये रेसिड्यू / अवशेष आढळून येत नाहीत. 

6. बायोविटा टॉनिक प्राइस/किंमत किती आहे?

ऊत्तर - बायोविटा टॉनिक प्राइस/किंमत जाणून घेण्यासाठी येथे 👉 बायोविटा क्लिक करा.


People also read | हे देखील वाचा - 

1. kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

2. oily spot of pomegranate: डाळिंब पिकातील तेल्या रोग नियंत्रण

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

6. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापन



लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी