best variety of soybean_Bharatagri

सोयाबीन सुधारित वाण | सोयाबीन सुधारित जाती | best variety of soybean

नमस्कार शेतकरी मित्रानो, आपण या लेखामध्ये सोयाबीन सुधारित जाती best soybean variety 2023 तसेच सुधारित लागवड पद्धत यांची माहिती घेणार आहोत. सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असते. जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची निवड करतात.

सोयाबीन पेरणी करत असताना बीजप्रक्रिया करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रति किलो बियाण्यास आदाम कंपनीचे तालिहा कीटनाशक ३ मिली + बाविस्टीन बुरशीनाशक २.५ ग्राम + पाणी ३ ते ५ मिली मिक्स करून हलक्या हाताने बीजप्रक्रिया करावी आणि नंतर नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची ५ मिली प्रति किलो बियाण्यास चोळून प्रक्रिया करावी. बीजप्रकिया केल्यानंतर बियाणे सावलीमध्ये १ तास सुकवून मगच लागवडी साठी वापरावे. 


सोयाबीनचे सुधारित वाण : soybean best variety

वाण soybean top variety

परिपक्वता कालावधी (दिवस)

वैशिष्ट्ये 

केडीएस - 992 (फुले दुर्वा) 

100 ते 105 दिवस

 1. तांबेरा रोग, जांभळे दाणे, जिवाणूजन्य ठिपके मध्यम प्रतिकारक्षम
 2. दाणे मोठ्या आकाराचे 
 3. हार्वेस्टर ने काढता येण्यासारखे वाण

सोयाबीन गोल्ड - 3344 

100 ते 105 दिवस

 1. पानांचा पसारा कमी व निमुळते पान
 2. शेतात दाटोळा न झाल्यामुळे बुढापासून शेंड्या पर्यंत शेंगाच शेंगा
 3. तब्बल 60 टक्के शेंगा 4 दाण्यांच्या. 
 4. कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या.

फुले संगम

(के डी एस 726)

100 ते 105 दिवस

 1. तांबेरा रोगास कमी बळी पडणारा 
 2. खोडमाशी किडीस, मूळकूज आणि खोडकूज रोगास माध्यम प्रतिकारक
 3. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा
 4. खूप फांद्या व गोल आकाराचे पान
 5. परिपक्वता कालावधी तेलाचा उतारा 18. 42 टक्के एवढा आहे

फुले किमया (के डी एस 753) 

95 ते 100 दिवस 

 1. तांबेरा व मूळकूज रोगास कमी बळी पडतो 
 2. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा
 3. तेलाचा उतारा 18.25 %

जेएस 335 
95 ते 110 दिवस

 1. तांबेरा रोगास आणि चक्रीभुंगा व खोड किडीस प्रतिकारक
 2. कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या.
 3. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा
 4. तेलाचा उतारा 17-19  %

MAUS 612

93 ते 98 दिवस

 1. विविध हवामानात तग धरणारा वाण 
 2. परिपक्वतेनंतर 10-12 दिवस शेंगा तडकण्यास सहनशील 
 3. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा

MAUS 162

100 ते 105 दिवस

 1. सिंचनाची उपलब्धता असल्यास या वाणाची नोवाद करावी 
 2. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा
 3. रिपक्वतेनंतर 12 - 15  दिवस शेंगा तडकण्यास सहनशील 
 4. मूळकूज आणि खोडकूज रोगास प्रतिकारक
 5. मशीन द्वारे कंपनीस योग्य


लागवड पद्धती : 

 1. भारी जमिन: दोन ओळीत अंत 45 से.मी. आणि दोन रोपांतील अंतर 5 सें.मी. 
 2. मध्यम जमिन: दोन ओळीत अंतर 30 से.मी. आणि दोन रोपांतील अंतर 10 सें.मी.
 3. टोकन पद्धत: 3 फुटी सरी काढून वरंब्याच्या दोन्ही बाजूस टोकन करावी व दोन रोपातील अंतर 1 फूट ठेवावे. 

 

बियाणे दर: 

 • सलग पेरणी साठी: 30-35 किलो प्रती एकरी बीज वापरावे.
 • टोकन पेरणी साठी: 18-20 किलो प्रती एकरी बीज वापरावे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला भारतअ‍ॅग्रीचा सोयाबीन सुधारित वाण (best variety of soybean) हा लेख कसा वाटला हे आम्हाला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हा लेख तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. 

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी