नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण सर्व रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी सर्वात बेस्ट एक्टारा कीडनाशका actara insecticide बद्दल सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. फुलकिडे (थ्रिप्स), पांढरी माशी, मावा (ऍफिड) आणि तुडतुडे या सारख्या रस शोषक किडी मिरची, टोमॅटो, काकडी यासारख्या भाजीपाला पिके आणि पपई, केळी, संत्री, मोसंबी या सारख्या फळ पिकांमधील पानाचा रस शोषून पिकास नुकसान पोहचवतात. तसेच हे व्हायरस ग्रस्त रोपातून निरोगी रोपांमध्ये व्हायरसचे वहन करून संपूर्ण प्लॉट मध्ये व्हायरस पसरवतात. म्हणून यासारख्या रस शोषक किडींचे वेळीच नियंत्रण होणे गरजेचे आहे.
फुलकिडे (थ्रिप्स) | Thrips -
फुलकिडे ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत बारीक असते. त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ असतात. सर्वसाधारणपणे हे किडे पानाच्या मागच्या बाजूस आढळतात. पानाचा वरचा पापुद्रा खरवडून अन्नरस शोषतात. परिणामी पाने निस्तेज होतात. पांढुरके व नंतर तपकिरी डाग दिसू लागतात. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये पानाची गळ होते. दिर्घकाळ कोरडे व उष्ण हवामान राहिल्यास व पावसाने दांडी मारल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. जोराच्या व सततच्या पावसाने संख्या कमी होते.
पांढरी माशी | White fly -
पांढरी माशी १ ते २ मिमी लांब, रंगाने पिवळसर, पांढरट असून पंख पांढऱ्या किवा करड्या रंगांची असते. या किडीचे पिल्ले, प्रौढ पानाच्या खालील बाजूस राहून पानातील रस शोषतात. पाने कोमेजतात. माशीच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या चिकट पदार्थांमुळे पानावर काळी बुरशी चढते. पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबली गेल्याने कपाशीच्या उत्पादन, प्रत यावरही अनिष्ट परिणाम होतो. ह्या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर महिन्यापासून ते नोव्हेंबर अखेर जास्त आढळतो. कमी पर्जन्यमान व अधिक तापमान ह्या किडीच्या वाढीस पोषक आहे. अधिक पाऊस व ढगाळ वातावरणात किडीची संख्या कमी होते.
मावा (ऍफिडस्) | Aphid -
मावा या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव वेलवर्गीय, संत्रावर्गीय तसेच इतर फुल, फळ आणि भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. कीड पानांमधील तसेच कोवळ्या फुटव्यामधील रस शोषण करते हा रस शोषत असतांनाच हि किड मधासारखा गोड द्रव देखील स्रवत असते. या चिकट द्रवावर सुटी मोल्ड ही बुरशी वाढते ज्यामुळे पान काळसर दिसते. यामुळे पिकाचे साधारणतः ४०-५०% नुकसान होते.
तुडतुडे | Jassid -
1. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे असून रंग फिक्कट हिरवा असतो. तुडतुडे तिरकस चालतात.
2. प्रौढ तुडतुडे आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषतात त्यामुळे सुरुवातीस पानांच्या कडा पिवळसर पडतात. पाने आतल्या बाजूने वळतात. कालांतराने पानांच्या कडा लालसर होतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पूर्ण झाडाची पाने लाल होतात आणि जळल्यासारखी दिसतात. याला ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात.
3. रिमझिम पाऊस, अधूनमधून तापणारे उन, ढगाळ वातावरण तुडतुडयांच्या वाढीस पोषक असते
4. सर्व रसशोषक किडींचे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियंत्रण करण्यासाठी सर्वात बेस्ट कीडनाशक म्हणजे actara syngenta सिंजेंटा कंपनीचे एक्टारा actara insecticide. हे कीडनाशक आंतरप्रवाही, स्पर्शजन्य आणि ट्रांस्लामीनार पद्धतीने काम करत असल्यामुळे रस शोषक किडीचे तात्काळ नियत्रंण होते.
सिंजेंटा एक्टारा कीडनाशक | Actara insecticide content & price -
एक्टारा ( actara insecticide technical name - थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी ) हे निओनिकोटिनॉइड गटाचे दाणेदार विद्रव्य कीडनाशक आहे. हे रस शोषक किडींपासून दीर्घकाळ संरक्षण देते.
प्रॉडक्ट |
एक्टारा कीडनाशक |
रासायनिक संरचना |
थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी actara insecticide content |
कार्य करण्याची पद्धत |
आंतरप्रवाही, स्पर्शजन्य आणि ट्रांस्लामीनार |
कंपनी |
सिजेंटा |
प्रमाण actara dosage per litre |
0.5 ग्रॅम /लिटर. 8 ग्रॅम /पंप (15 लिटर पंप) 80 ग्रॅम /एकर फवारणीसाठी. 200 ग्राम ड्रेंचिंगसाठी |
वापर |
फवारणी आणि ड्रेंचिंग actara how to use |
किंमत actara insecticide price |
100 ग्रॅम - ₹ 339 250 ग्रॅम - ₹ 619 500 ग्रॅम - ₹ 1109 |
क्रियेची पद्धत | Actara insecticide work mothod -
हे किडीच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कार्य करते, संपर्कात आल्यावर/खाल्ल्यानंतर लगेचच थायमेथोक्सम मूळे कीड अन्न खाणे थांबवते.
पिकाचे नाव |
लक्षित किडactara insecticide use |
प्रमाण / एकरactara dosage per acre |
भात |
खोड कीड, गाल मिज, पाने गुंडाळणारी अळी, पांढरा तुडतुडे, तपकिरी तुडतुडे, हिरवा तुडतुडे, थ्रिप्स |
40 ग्रॅम |
कापूस |
तुडतुडे, मावा, थ्रिप्स, पांढरी माशी |
80 ग्रॅम |
भेंडी |
तुडतुडे, मावा, पांढरी माशी |
40 ग्रॅम |
आंबा |
तुडतुडे |
50 ग्रॅम |
गहू |
मावा |
20 ग्रॅम |
मोहरी |
मावा |
40 ग्रॅम |
टोमॅटो |
पांढरी माशी |
80 ग्रॅम |
वांगे |
पांढरी माशी, तुडतुडे |
80 ग्रॅम |
बटाटा |
मावा |
80 ग्रॅम |
लिंबूवर्गीय पिके |
सायला |
40 ग्रॅम |
जिरे |
मावा |
40 ग्रॅम |
एक्टारा कीडनाशक वापरण्याचे फायदे - Benefits of actara insecticide use -
1. अनेक पिकांमधील विविध रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी हे एक नवीन कीडनाशक आहे.
2. विविध रस शोषक किडींमध्ये पारंपारिक कीडनाशकामुळे प्रतिरोधक क्षमता विकसित झाली आहे अशा किडींसाठी हे खूप चांगले कीडनाशक आहे.
3. हे सहजपणे शोषले जाते आणि संपूर्ण वनस्पतीमध्ये स्थानांतरीत होते म्हणून लपलेल्या किडींचे प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.
4. पिकांमध्ये झपाट्याने घेतले जाते आणि रस वाहिन्यांमधून वरच्या दिशेने पसरले जाते.
5. जलद आणि दीर्घ कालावधी पर्यंत नियंत्रण मिळते.
6. पाऊसाने धुवून जात नाही.
Conclusions | सारांश -
फुलकिडे (थ्रिप्स), पांढरी माशी, मावा (ऍफिड) आणि तुडतुडे या सारख्या रस शोषक किडी भाजीपाला आणि फळपिकांमध्ये पानांमधील रस शोषण करून व्हायरस पसरवण्याचे काम करतात. याचा परिणाम उत्पादनावरून होऊन ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक्टारा कीडनाशकाचा actara insecticide वापर केल्यास किडीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न -
1. एक्टारा काय आहे?
उत्तर - एक्टारा (थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी) हे निओनिकोटिनॉइड गटाचे दाणेदार विद्रव्य कीडनाशक आहे.
2. एक्टारा कसे कार्य करते?
उत्तर- एक्टारा आंतरप्रवाही, स्पर्शजन्य आणि ट्रांस्लामीनार पद्धतीने काम करते.
3. एक्टारा रस शोषक किडीस कसे मारते?
उत्तर - एक्टारा हे किडीच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कार्य करते, संपर्कात आल्यावर/खाल्ल्यानंतर लगेचच थायमेथोक्सम मूळे कीड अन्न खाणे थांबवते.
4. एक्टारा कोण कोणत्या किडींना नियंत्रित करते?
उत्तर- एक्टारा तुडतुडे, मावा, थ्रिप्स, पांढरी माशी या महत्वाच्या किडींचा नियंत्रित करते.
People also read | हे देखील वाचा -
1. गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न
2. ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण
3. डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत
4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !
5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण
लेखक | Author -
भारतअॅग्री कृषि एक्सपर्ट