watermelon varieties

watermelon varieties: टॉप 10 कलिंगड जातींची माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण कलिंगड पिकाच्या प्रमुख 10 जातींबद्दल watermelon varieties माहिती जाणून घेणार आहोत. कलिंगड watermelon seeds for planting हे कमी वेळेत जास्त उत्पादन देणारी पीक आहे. कलिंगड पिकाची लागवड करताना जमिनीची मशागत, लागवडीचे अंतर, बियाणे, खत, पाणी, कीड रोग नियोजन करणे महत्वाचे असते. बियाणे निरोगी आणि शुद्ध असले तर उत्पादन चांगले निघते. 


कलिंगडाचे प्रकार | Types of watermelon -

कलिगडाचे आकार आणि रंगावरून ३ प्रकार आहेत. 

1. आइस बॉक्स - या प्रकारातील कलिंगड best watermelon seeds काळपट गर्द हिरव्या रंगांचे आणि लंबगोलाकार असते. उदा . शुगर किंग, शुगर क्वीन, सिम्बा

2. शुगरबेबी - या प्रकारातील कलिंगड फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे पट्टे असतात. उदा . अगस्टा ,शुगर पैक, जेंटेक्स ब्लैक एवेन्यू, अमृत

3. जुबलीओवल - या प्रकारातील कलिंगड फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी त्यावर फिकट हिरवे पट्टे असतात. उदा . मधु, सुपर ड्रॅगन, बादशाह. 


कलिगड जाती | watermelon varieties | hybrid watermelon seeds -

👉शुगर किंग | sugar king watermelon seeds -

1. शुगर किंग हि जात अतिशय जोमाने वाढणारी असून वेल मजबूत असतात. 

2. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. 

3. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. 

4. ही जात फ्युजॅरियम मर रोगास प्रतिकारक आहे.

5. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.


👉ऑगस्टा | augusta watermelon seeds -

1. ऑगस्टा जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. 

2. फळाचा आकार गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. 

3. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. 

4. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे

5. फळाचे सरासरी वजन ६-१० किलो आहे.. 

6. टिकवणं क्षमता चांगली असल्याने दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.


👉शुगर पैक | sugar pack watermelon -

1. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या जातीची लागवड केली जाते. 

2. फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे पट्टे असतात. 

3. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. 

4. फळाचे सरासरी वजन ६ ते ७ किलो भरते. 


👉शुगर क्वीन | sugar queen watermelon seeds -

1. या जातीचा फळांची साल गडद हिरव्या रंगाची, गर लाल आणि कुरकुरीत असतो. 

2. फळांमध्ये साखरेचे प्रमाण १२ ते १४ टक्के असते. तसेच या जातीमध्ये चांगली फळधारणा होते. 

3. लांब वाहतुकीसाठी उपयुक्त आहे आणि फळांची टिकवणक्षमता पण जास्त आहे.


👉सिम्बा | simba watermelon seed -

1. ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे.

2. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. 

3. फळाचे सरासरी वजन 3.5 ते 4 किलो आहे. 

4. टिकवणं क्षमता चांगली असल्याने दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.


👉जेंटेक्स ब्लैक एवेन्यू | zentex black watermelon seed  -

1. अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. 

2. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. 

3. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. 

4. ही जात फ्युजॅरियम मर रोगास प्रतिकारक आहे.

5. फळाचे सरासरी वजन 8 किलो आहे.


👉मधु | madhu watermelon seed -

1. संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी त्यावर फिकट हिरवे पट्टे असतात. 

2. साखरेचे प्रमाण 12%, परिपक्वता 68-75 दिवस.

3. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. 

4. टिकवणं क्षमता चांगली असल्याने लांब वाहतुकीसाठी चांगली


👉अमृत | amrut watermelon seeds -

1. महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असतात. 

2. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.

3. फळे सरासरी ५ ते ७ किलो वजनाची असतात.


👉सुपर ड्रॅगन | super dragon watermelon seeds -

1. ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. 

2. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८-१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. 

3. टिकवणं क्षमता चांगली असल्याने दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण. 

4. ही जात मरफक्युजॅरियम रोगास सहनशील आहे.


👉बादशाह | badshaha watermelon seeds - 

1. जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. 

2. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असतात. 

3. फळाचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते.

4. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. 

5. टिकवणं क्षमता चांगली असल्याने दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य आहे.

 

Conclusions | सारांश -

कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. कलिंगड पिकाची लागवड करताना बियाणे शुद्ध आणि निरोगी असले तरच आपल्याला जास्त उत्पादन घेता येते. watermelon varieties बियाणे शुद्ध नसल्यास मर रोग व इतर कीड रोगांचा प्रधुरभाव वाढतो. 

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

 

1. कलिंगडाची लागवड कधी करावी?

उत्तर - लागवड शक्यतो जानेवारी-मार्च महिन्यात करावी. काही ठिकाणी कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तयार होतात.

2. कलिंगड लागवडीसाठी एकरी किती बियाणे वापरावे?

उत्तर- कलिंगड लागवडीसाठी एकरी 350 ग्राम ते 500 ग्राम बियाणे वापरावे. 

3. कलिंगड पिकाची लागवड किती अंतरावर करावी?

उत्तर - कलिंगड पिकाची लागवड करताना दोन ओळीतील अंतर 6 फूट आणि दोन रोपांतील अंतर 2 फूट ठेवावे. 

4. कलिंगड पिकासाठी किती मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरावा?

उत्तर- कलिंगड पिकासाठी 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरावा



People also read | हे देखील वाचा - 

1. kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

2. oily spot of pomegranate: डाळिंब पिकातील तेल्या रोग नियंत्रण

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

6. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापन



लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी