🌱कारले आणि दोडका पिकातील भुरी नियंत्रण - रिजल्टची 100% गॅरंटी 👍

🌱कारले आणि दोडका पिकातील भुरी नियंत्रण - रिजल्टची 100% गॅरंटी 👍

 

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱कारले आणि दोडका पिकातील भुरी नियंत्रण - रिजल्टची 100% गॅरंटी 👍

कारली व दोडका या सारख्‍या वेलभाज्‍यांना मांडव बांबू इत्‍यादी प्रकारांचा आधार दयावा लागतो. कार्ली व दोडका यांच्‍या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत. कार्ल्‍याला मोठया शहरात तर दोडक्‍याला स्‍थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते. दोन्ही पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख रोगांपैकी भुरी म्हणजेच पावडरी मिल्ड्यू ह्या रोगाबद्दल जाणून घेऊ.

👉 भुरी रोगाच्या वाढीसाठी थंड आणि कोरडे वातावरण पोषक आहे.
👉 रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जुन्या पानांवर किंवा बुंध्याजवळील पानांवर होतो
👉 प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या पानांवर, फुलकळी तसेच देठावर भुरकट रंगाचे बुरशीचे ठिपके दिसून येतात. 👉 कालांतराने झाडाची पाने पिवळी पडून गळून जातात. तसेच प्रकाशसंश्लेषन क्रियेमध्ये मंदावते.
👉 त्यामुळे भुरी रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

✅पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे -
👉 भुरी रोगास सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करावी.
👉 पिकांची फेरपालट करावी व पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करावे तसेच .
👉 पिकामध्ये पोटॅश या अन्नद्रव्यची कमतरता झाल्यास पीक भुरी रोगाला बळी पडते त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर शिफारसी प्रमाणे करून पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही.
👉 भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला जैविक पद्धतीचा अवलंब करावा यासाठी बॅसिलस सबस्टीलीस @ 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा पिकात फवारणी करावी.
👉 रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन @ १ ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेपूर्वी २ वेळा फवारणी करावी
👉 शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा.

1️⃣ रोको - १० ग्रॅम
2️⃣ कोंटाफ प्लस - ३० मिली
3️⃣ अवतार - ३० ग्रॅम

या पैकी कोणतेही एक बुरशीनाशक घेऊन १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा आलटून पालटून बुरशीनाशकाची फवारणी करावी.वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी