नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आपण कृषी दिन बद्दल माहिती घेणार आहोत. दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्रात कृषी दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आपल्या कृषिप्रधान देशातील महाराष्ट्र राज्य प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्याला अन्न मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाचे खुप महत्व आहे. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण हा दिवस राज्यातील शेतकर्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
कोण होते वसंतराव नाईक?
वसंतराव नाईक हे महाराष्ट राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते याचसोबत ते एक कुशल शेतीतज्ञ आणि शेतकरी देखील होते.म्हणुनच वसंतराव नाईक यांच्या मनात शेती आणि शेतकरी बांधव यांच्याविषयी खुप कळकळ होती. त्यांना महाराष्टातील हरित क्रांतीचे जनक म्हणुन ओळखले जाते.
जन्म कधी अणि कोठे झाला?
वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्हयामधील पुसद नावाच्या एका छोटयाशा खेडेगावात एका शेतकरी कुटुंबामध्ये 1 जुलै रोजी 1913 रोजी झाला.
शिक्षण
वसंतराव नाईक यांचे सुरुवातीचे शिक्षण वेगवेगळया खेडेगावांत झाले. विठोली आणि अमरावती शहरात त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. नागपुरमधील एका काँलेजातुन बीए ची डिग्री प्राप्त केली. याचसोबत त्यांनी एल एलबी देखील केले होते. काही काळ वकिली केल्यानंतर ते पुसद येथील कृषी मंडळाचे अध्यक्ष बनले. यानंतर कृषीमंत्री महसुलमंत्री मुख्यमंत्री अशी अनेक पदे त्यांना प्राप्त झाली.
वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात कृषीशी संबंधित विविध संस्थांची आणि कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. राज्यात 1972 साली ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणं उपलब्ध करून दिली तसेच जलसंधारणाची कामं वाढवली. नंतरच्या काळात त्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जातं. शेतकऱ्यांचे कैवारी व शेतीवर निस्सीम भक्ती असणारे महानायक वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे कि, "मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर जरी बसून असलो तरीदेखील माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो."
शासकीय कार्यालय , गाव शहरात अनेक जयंती साजरी केली जाते. परंतु त्याचबरोबर थेट बांधावर, शेत शिवारातही मोठ्या प्रमाणात 'कृषी दिवस' साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शेती व शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून ''थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रवर्तक एकनाथ पवार यांनी सन २०११ पासून कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव मोहीम सर्वप्रथम सुरू केली. तसेच १ जुलै ते ७ जुलै हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
Conclusion | सारांश -
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या जन्म दिवशी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी संकरित बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले तसेच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर केली. कृषी क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. आशा करतो की Bharatagri krsuhi Dukan वेबसाइट वरील आमचा आजचा “कृषी दिन विशेष” हा लेख तुम्हाला आवडला असेल तर याला तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.
FAQ । सतत विचारले जाणारे प्रश्न -
1. कृषी दिन कधी साजरी केला जातो?
उत्तर - कृषी दिन हा १ जुलै रोजी साजरी केला जातो.
2. कृषी दिन का साजरी केला जातो?
उत्तर - महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
3. वसंतराव नाईक कोण होते?
उत्तर - वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कृषिमंत्री होते. कृषी क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
4. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रात कोणती महत्वाची कामे केली?
उत्तर - संकरित बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले तसेच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर केली.
लेखक
भारतअॅग्री कृषि एक्स्पर्ट