🌱गहू लागवड 2022 - एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादनाची गॅरंटी👍

🌱गहू लागवड 2022 - एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादनाची गॅरंटी👍

 

✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉https://krushidukan.bharatagri.com/

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱गहू लागवड 2022 - एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादनाची गॅरंटी👍

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांपैकी गहू हे एक महत्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो.

✅ जमीन
बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. जिरायत गव्हासाठी मात्र जास्त पाऊस पडणाऱ्या व जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी अशा जमिनीतच घ्यावा. हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.

✅ मशागत
गहू पिकाच्या मुळया जमिनीत ६५ ते ७५ सें.मी. खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुसीत जमिनीची निवड करावी. जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० सें.मी खोल नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळया देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर ३ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट खत पसरवून टाकावे.

✅ पेरणीची वेळ
बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी व उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ किंवटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे. जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरावड्यात करावी.

✅ पेरणी पद्धत : गव्हाच्या जिरायती आणि बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन ओळींत २२.५ सें.मी. आणि बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. शक्‍यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सेंमी. खोल करावी.

✅ एकरी बियाणे
👉 जिरायत पेरणी 30 ते 40 किलो
👉 बागायत वेळेवर पेरणी 40 किलो
👉 बागायत उशिरा पेरणी 50 ते 60 किलो

✅ सुधारित वाण
एन आय ए डब्ल्यू-३०१ (त्र्यंबक), एन आय ए डब्ल्यू-९१७ (तपोवन), एम ए सी एस-६२२२ हे सरबती वाण व एन आय डी डब्ल्यू-२९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. बागायती उशिरा पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू-३४ आणि एके ए डब्ल्यू-४६२७ या वाणाप्रमाणेच जिरायत पेरणीसाठी एन आय डी डब्ल्यू-१५ (पंचवटी) एकेडी डब्ल्यू-२९९७-१६ (शरद) हे वाण उपयुक्त आहेत. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन.आय.ए.डब्ल्यू-१४१५ (नेत्रावती) व एच.डी. २९८७ (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी. वरीलप्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल.

✅ खत व्यवस्थापन
25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद व 20 किलो पालाश प्रति एकरी पेरणीच्या वेळी व ६० कि. नत्र प्रतिहेक्‍टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे. तसेच मायक्रोनुट्रीएंट १० किलो आणि सल्फर ९०% - ८ किलो प्रति एकरी द्यावे.

✅ पाणी व्यवस्थापन : मध्यम ते भारी जमिनीत २१ दिवसांच्या अंतराने गहू पिकास पाणी द्यावे. एकच पाणी देणे शक्‍य असल्यास ते पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्‍य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी व दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. तीन पाणी देणे देणे शक्‍य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

✅ आंतरमशागत
गहू पिकातील अरूंद पानांचे आणि रूंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी UPL चे वेस्टा तणनाशक १६० ग्राम किंवा डूपॉन्डचे अलग्रीप तणनाशक ८ ग्राम प्रति २०० लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या २ ओळीत फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर १० ते १२ दिवस पाणी देऊ नये.

✅ पीक संरक्षण:
गहू पिकातील प्रमुख किडी - खोडकिडा, मावा आणि वाळवी
गहू पिकातील प्रमुख रोग - तांबेरा, काणी आणि करपा.

✅ कापणी व मळणी
पीक पक्व होण्याच्या २-३ दिवस. अगोदर कापणी करावी. कापणीच्यावेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी, यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापण व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी.

✅ अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी महत्वाच्या बाबी:
👉हायब्रीड वाणांचा वापर करावा.
👉खतांसोबत मायक्रोनुट्रीएंट आणि सल्फर चा वापर करावा.
👉 पाणी व्यवस्थपन दार २० ते २१ दिवसांच्या अंतराने जमिनीच्या प्रकारानुसार करावे.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी