foost bayer herbicide for maize crop

मक्यामधील सर्वोत्तम तणनाशक - बायर फूस्ट तणनाशक

तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो.  पीक कोणतेही असले तरी तण प्रमाणापेक्षा जास्त उगवल्यास उत्पादनात घट होते. इतर पिकांप्रमाणेच मका पिकालाही तणांमुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. तणांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मक्याची लागवड करत असाल तर तुमच्या शेतात अनेक प्रकारचे तण असू शकतात. तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी याबाबतीत स्पर्धा करण्याचा कालावधी पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंतचा असल्याने तणांचा या कालावधीत बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळते. तण पिकासाठी लागणारी पोषक तत्वे शोषण करून पिकाचे नुकसान तर करतातच, शिवाय कीड व रोगांच्या प्रादुर्भावास देखील कारणीभूत ठरतात.

चला जाणून घेऊयात मका पिकातील तण नियंत्रित करणाऱ्या बायर कंपनीचे तणनाशक maize herbicide  फुस्ट बद्दल. 

फुस्ट ( ऍट्राझीन ५०% डब्लू.बी. )  foost bayer herbicide for maize crop

काम करण्याची पद्धत : हे क्लोरो-ट्रायझिन गटाचे निवडक आणि आंतरप्रवाही पद्धतीने काम करणारे तणनाशक आहे. हे प्रकाशसंश्लेषण क्रियेमधील DI प्रोटीन साइटची कार्यपद्धती बंद करते त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. हे तणांमधील एंजाइमॅटिक क्रियाकलाप देखील प्रतिबंधित करते. प्रकाशसंश्लेषणाच्या अभावामुळे तणाचे नियंत्रण होते.

वैशिष्ट्ये : 

  1. फुस्ट हे एक विस्तृत स्पेक्ट्रम आणि निवडक तणनाशक selective herbicide for maize आहे.
  2. हे एक आंतरप्रवाही तणनाशक आहे जे प्रकाशसंश्लेषण आणि एन्झाइमॅटिक क्रियाकलाप रोखून तण नष्ट करते.
  3. ऊस आणि मक्यातील गवत आणि रुंद पाने असलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी हे एक उगवणीपूर्व आणि उगवणीनंतरचे तणनाशक आहे.
  4. हे क्लोरो-ट्रायझिन गटाशी संबंधित आहे.
  5. फवारणी केल्यानंतर तणांच्या  पानांद्वारे आणि मुळांद्वारे वेगाने शोषले जाते.

वापरण्याची पद्धत आणि वेळ : 

तण उगवणीपूर्व आणि उगवणीनंतरचे तणनाशक म्हणून तण 2-3 पानांच्या अवस्थेत असताना वापरावे. 

तणनाशकाचे नाव 

फुस्ट 

कंपनी 

बायर

घटक  

ऍट्राझीन ५०% डब्लू.बी. 

काम करण्याची पद्धत

आंतरप्रवाही 

पिके 

मका आणि ऊस 

तण नियंत्रण 

सर्व लांब व रुंद पानाचे तण 

प्रमाण 

३०० ते ४०० ग्राम प्रति एकरी 

किंमत 

५०० ग्राम - ६०० रुपये


तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी 

  1. ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना फवारणी करू नये. 
  2. वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणीपूर्वी फवारणी करावी. स्वच्छ पाणी वापरावे. 
  3. जमिनीवर फवारावयाचे तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित जमिनीवर फवारावे. 
  4. तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणांपर्यंत पोचू शकत नाही. पर्यायाने पूर्णपणे नियंत्रण होत नाही. 
  5. उगवणीपूर्व फवारणी पेरणीदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये. उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी. 
  6. फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल. असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते. त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा जात नाही. 
  7. फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी

 

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी