🌱सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढीवणारी प्रमुख खते | बनवण्याची पद्धत आणि उपयोग 👍

🌱सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढीवणारी प्रमुख खते | बनवण्याची पद्धत आणि उपयोग 👍

 

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढीवणारी प्रमुख खते | बनवण्याची पद्धत आणि उपयोग 👍

✅ जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेंद्रिय खते महत्वाची ठरतात.जमिनीची सुपीकता जैविक व भौतिक गोष्टीवर अवलंबून असते. लागवड करताना रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते.

1️⃣ ह्यूमिक ऍसिड :
👉 २० लिटर पाण्यात ५ ते ७ किलो देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाका, त्यामध्ये १ किलो दही, १ किलो गुळ, २०० ग्राम बेसन पीठ मिसळून घ्या.
👉 राहिलेले पाणी त्यामध्ये मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
👉 हा ड्रम सावलीमध्ये १०-१५ दिवसापर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
👉 १०-१५ दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या साहाय्याने गाळून तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता.
✅वापरण्याच्या पद्धती - १-२ लिटर प्रति एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किंवा पाटाच्या पाण्यावाटे पिकाला द्यावे.

2️⃣ जीवामृत:
👉 जिवामृत तयार करण्यासाठी २०० लीटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरलमध्ये १७० लीटर स्वच्छ पाणी घ्यावे.
👉 १० किलो शेण, १० लीटर गोमूत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती व २५० मिली उपलब्ध जिवाणू संवर्धके मिसळावी.
👉 डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे. ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते.
👉 एका एकराला २०० लीटर जिवामृत पुरेसे होते.
✅ वापरण्याची पद्धत: २०० लिटर जीवामृत पाटपाण्याने किंवा कपड्याने गाळून ड्रीप ने २० दिवसांच्या अंतराने पीक काढणी पर्यंत द्यावे.
फवारणीसाठी २० लिटर जीवामृत २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

✅शेतामध्ये सेंद्रिय खते वापरण्याचे फायदे -
👉 पांढऱ्या मुळांची संख्या व आकार वाढतो.
👉 जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
👉 जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
👉 शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते.
👉 सेंद्रीय पदार्थांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.
👉 शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
👉 कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी