earthing up in sugarcane

earthing up in sugarcane: ऊस बाळ भरणी आणि मोठी बांधणी खत व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे. ऊसाची बाराही  महिने एकसारखी व जोमदार वाढ होण्यासाठी पिकांच्या मुळयांची वाढ, विस्तार आणि अन्नपाणी शोषणाची कार्यक्षमता सतत उत्तम राहायला हवी यामुळेच आज आपण ऊस पिकांमधील बाळ बांधणी आणि मोठी बांधणी या बद्दल माहिती पाहणार आहोत, या मध्ये ऊस पिकाबद्दल थोडक्यात माहिती, बांधणी कधी करावी, बांधणी करताना खते कोणती वापरावी आणि बांधणी केल्यावर काय फायदा होतो या विषयावरती माहिती घेणार आहोत. 


ऊस पिकाबद्दल थोडक्यात माहिती। Information About sugarcane - 

महाराष्ट्र राज्य ऊस पिकवण्यात अग्रेसर आहे कारण हे नगदी पिक असल्यामुळे महाराष्ट्रात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ऊस पिकास फार महत्व आहे. या मध्ये पहिले असता ऊस तीन हंगामात लावला जातो. आडसाली, ऊसाची लागवड खरीप मध्ये 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान केली जाते, पूर्व हंगामी उसाची लागवड रब्बीमध्ये 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान केली जाते आणि सुरु उसाची लागवड उन्हाळ्यामध्ये 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान केली जाते.


ऊस पिकाच्या  बांधणी बद्दल माहिती । Information About sugarcane earthing up -

खलील पॉईंट मध्ये earthing up in sugarcane या बद्दल माहिती  दिलेली आहे.

अ. बाळ बांधणी - 

ऊस लागवडी नंतर 2 महिन्यांनी किंवा ऊस उगवल्यानंतर 1.5 महिन्याने ऊस रोपापासून ९ इंच बैलाच्या किंवा कुदळीच्या साह्याने माती भुसभुशीत करून उसाच्या बुंध्याला हलकीशी भर दिली जाते त्याला बाळ बांधणी म्हणतात. 

ब. मोठी बांधणी - 

ऊस लागवडी नंतर ३ ते ३.५ महिन्यांनी उसाला १ ते २ कंड्या किंवा पेर तयार झाल्यानंतर रासायनिक खतांचा शेवटचा डोस देऊन रेजरच्या साह्याने उसाच्या बुंध्यास मोठी चांगली भर दिली जाते त्यास मोठी बांधणी म्हणतात. 


ऊस पिकाची बांधणी करताना खत व्यवस्थापन - 

खालील पॉईंट मध्ये बाळ बांधणी आणि मोठी बांधणी खात व्यवस्थापन दिलेले आहे. 

👉बाळ बांधणी खत व्यवस्थापन - 18:46:00 - 100 किलो + मॅग्नेशियम सल्फेट -5 किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो / एकर

👉मोठी बांधणी खत व्यवस्थापन - कडुनिंब केक - 100  किलो + युरिया  130 किलो + एमओपी 50 किलो + 10:26:26 - 100 किलो + फेरस सल्फेट 5 किलो + सल्फर 90 % - 10 किलो + फिप्रोनिल 0.3 % -5 किलोग्रॅम + समुद्र शेवाळी अर्क दानेदार- 4 किलो / एकर


ऊस पिकात बांधणीचे फायदे - 

खालील मुद्द्या मध्ये आपण earthing up in sugarcane चे फायदे पाहणार आहोत. 

1. बाळबांधणीमुळे ऊसाच्या फुटव्यांची संख्या वाढते. 
2. उसाच्या तळाजवळील कांड्यांना नवीन पांढऱ्या मुळ्या फुटतात व या मुळ्या जोमाने वाढतात.
3. खोडअळीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
4. मोठ्या बांधणी मुळे उसाचा बुडखा आणि कांड्या चांगल्या प्रकारे मातीने झाकले जातात.
5. मोठ्या बांधणी मुळे अधिक पांढऱ्या मुळ्या वाढून त्या जमिनीला घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे ऊस लोळण्याचे प्रमाण कमी होते.
6. बांधणीमुळे ऊस पिकास पाणी देणे एकदम सोपे होते.
7. ऊस पिकात गारवा टिकून राहतो. 


Conclusion / सारंश -

शेतकरी मित्रांनो, आमचा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतऍग्री कृषी दुकानाच्या वेबसाईटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ - 


1. ऊस बाळ भरणी कधी केली पाहिजे?

उत्तर - ऊस पहिली बाळ बांधणी दीड ते दोन महिन्याच्या आसपास केली जाते. 

2. उसाला मोठी बांधणी कधी केली पाहिजे?

ऊत्तर - उसाला मोठी बांधणी तीन ते साडेतीन महिन्यात करावी. 

3. ऊस पिकाची लागवड कधी केली जाते?

उत्तर -ऊसाची लागवड खरीप मध्ये 15 जुलै ते 15 ऑगस्ट, पूर्व हंगामी - 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर आणि सुरु ऊस - 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या तीन हंगामात लागवड केली जाते. 

4. बाळ भरणीला कोणती खते वापरावी?

उत्तर - बाळ भारणीला 18:46:00 (DAP)+ मॅग्नेशिअम सल्फेट+ सूक्ष्म अन्नद्रव्ये हि खते वापरावी. 


हे पण एकदा वाचा | People also read - 

1. Tomato leafminer: टोमॅटो पिकातील नागअळी (टूटा) नियंत्रण

2. टोमॅटो पिकावरील मोझॅक व्हायरस नियंत्रण

3. ऊस पिकातील हुमणी नियंत्रण

4. सिलिकॉन चे पिकातील कार्य आणि फायदे

5. दोडका आणि कारले पिकातील फळमाशी नियंत्रण



लेखक | Author

BharatAgri Krushi Doctor
Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी