शेतकरी मित्रानो, जमिनीमध्ये राहून पिकाची मुळी खाऊन आर्थिक नुकसान करणारी कीड म्हणजे हुमणी. या किडीमुळे प्रामुख्यने ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ह्या किडीचे लवकर नियंत्रण न झाल्यास ३० -७० % नुकसान होऊ शकते. म्हणूनच आपल्याला ह्या किडीचा जीवनक्रम समजून एकात्मिक नियंत्रण करणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात हुमणी white grub in sugarcane या किडी बद्दल.
✅ हुमणीची ओळख : white grub insect
👉 प्रथम अवस्था पांढरीशुभ्र, पिवळे डोके, 7 मी.मी. लांबी. छातीवर पायांच्या तीन जोड्या.
👉 पूर्ण विकसित अळ्या पिवळट-पांढऱ्या, डोक्याचा रंग बदामी व अर्धगोलाकार, अळीची लांबी सुमारे 35 ते 45 मि.मी.
👉 प्रौढ भुंगेरा तपकिरी किंवा बदामी रंगाचे व 17 ते 20 मि.मी. लांब व 8 मि.मी.पर्यंत जाड असतात.
👉 पंखाची प्रथम जोडी ढाली प्रमाणे मजबूत.
👉 पंखाची दुसरी जोडी पातळ व घडी करण्यासाठी लवचिक असून, पहिल्या जोडीखाली सुरक्षित व पंख उघडताना मदत करते.
✅ हुमणी किडीची जीवनसाखळी
👉 पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात.
👉 कडूलिंब, बाभूळ, बोर यासारख्या वृक्षावर मादीसोबत मिलनासाठी जमतात.
👉 त्यानंतर सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत परत जातात.
✅ शेतकरी मित्रानो, वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर रात्रीच्या वेळी प्रकाश सापळे लावून त्यांना आकर्षित करावे. संध्याकाळी व रात्री या झाडांच्या फांद्या जोरात हलवून प्रौढ खाली पाडावेत. ते गोळा करून केरोसीन वा कीटकनाशकमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. हे काम सामुदायिकरीत्या केल्यास किडीचे नियंत्रण होण्यास मदत होते.
✅ जीवनक्रम : white grub life cycle
👉 अंडी घालण्याचा कालावधी जून-जुलै महिन्यात पूर्ण होतो.
👉 जमिनीत साधारणपणे 8 ते 10 सें.मी. खोलपर्यंत साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी घालतात.
👉 एक मादी तिच्या जीवनकाळात 60 ते 70 अंडी देते.
👉 अंड्यातून 9 ते 10 दिवसांत अळी बाहेर येते.
👉 अळी अवस्था- 5 ते 7 महिन्यांची असते.
👉 जमिनीत 10 ते 15 सें.मी. खोल अर्धगोलाकार पडून राहते.
👉 ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अळी जमिनीत खोलवर कोषावस्थेत जाते.
👉 कोषावस्था 20 ते 25 दिवस असून कोष तांबूस तपकिरी रंगाचा व टणक असतो.
👉 कोषातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात.
अशा प्रकारे हुमणीची एका वर्षात एक पिढी पूर्ण होते.
✅ नुकसान
प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.
✅ उस पिकातील हुमणी नियंत्रण insecticide for white grub control
👉 उन्हाळ्यात खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडीच्या सुप्तावस्था नाश पावते.
👉 यजमान झाडांवर सुपर डी ( क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रीन ) 30 मिली फवारणी- ( प्रति 15 लिटर )
👉 पीक लागवडीपूर्वी- कार्बोफुरोन दाणेदार - 7 किलो प्रति एकरी प्रमाणे खतासोबत मिसळून द्यावे.
👉 परोपजीवी बुरशी डॉ. बैक्टोज़ ब्रेव - ब्यूवेरिया बेसियाना Beauveria bassiana किंवा डॉ. बैक्टोज़ मेटा मेटारायझियम ऍनिसोपली metarhizium anisopliae १ ते २ लिटर प्रति एकरी ड्रीप मधून किंवा पाटपाण्याने द्यावे.
👉 उभ्या पिकातउपद्रव आढळल्यास ड्रीप मधून किंवा पाटपाण्याने सुपर डी ( क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रीन ) Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC १ लिटर किंवा लेसेंटा ( फिप्रोनील + इमिडाक्लोप्रिड ) Fipronil 40%+ Imidacloprid 40% WG १७५ ग्राम प्रति एकरी द्यावे.