Control shoot borer a major pest of sugar cane cultivation.

ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख किडींपैकी खोड कीड early shoot borer in sugarcane हि अत्यंत महत्वाची कीड आहे.

शेतकरी मित्रानो, या लेखामध्ये आपण ऊस पिकामध्ये येणाऱ्या खोड किडी बद्दल जाणून घेणार आहोत. ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख किडींपैकी खोड कीड early shoot borer in sugarcane हि अत्यंत महत्वाची कीड आहे. तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत जातो. खोडकीडीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादनात २० ते ३० टक्के व साखर उताऱ्यात १० ते १.५ टक्के घट येते. खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे साखरेच्या व्यापारी उत्पादनात २ टक्के पर्यंत घट येते. प्रादुर्भावाची तीव्रता २० टक्के असताना ऊस उत्पादनात एकरी २ ते ३ टन घट येते.

 

किडीस पोषक वातावरण : 

  1. हलकी जमीन, कमी पाणी व जास्त तापमान (३७-४१ अंश सेल्सिअस), कमी आर्द्रता (४०-५० टक्के) या बाबी कीड वाढीला पोषक आहेत.
  2. महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव आडसाली हंगामामध्ये जुलै ते ऑगस्ट आणि सुरू हंगामामध्ये  फेब्रुवारी नंतर आढळतो. 
  3. खोड किडीचा प्रादुर्भाव ऊस लागवडीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत (कांडी तयार होईपर्यंत) आढळून येतो. 

किडीची ओळख : sugarcane early shoot borer

अळी :  

  1. अळीच्या अंगावर नारंगी रंगाचे पट्टे असतात. 
  2. अळी रात्रीच्या वेळी उसाच्या कोवळ्या पानावर उपजीविका करते. परिणामी उसात पोंगा मर आढळतो.
  3. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेमध्ये जाण्याआधी खोडाच्या आतून जमिनीच्या वरील भागावर ४ ते १० सें.मी. अंतरावर पतंगाला बाहेर पडणे शक्य व्हावे, यासाठी छिद्र करून ठेवते. नंतर चंदेरी आवरणामध्ये पोंग्याच्या आत कोषावस्थेत जाते. 
  4. अळी अवस्थआ २२ ते ३१ दिवस राहते.

पतंग : 

  1. किडीचा पतंग शक्‍यतो सूर्योदयापूर्वी बाहेर पडतो. प्रौढ अवस्था ५-९ दिवस राहते.
  2. अन्य यजमान वनस्पती - ज्वारी, भात, बाजरी, मका, गिन्नी गवत इ.
  3. खोड किडीचा नुकसान कालावधी - साधारणतः ४ महिने -  ऊस उगवणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

खोडकिडीची लक्षणे : early shoot borer

पोंगा मर : अळी रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत उसाच्या खोडाजवळ येते. अळी खोडावरील मऊ पेशीवर उपजीविका करते. नंतर ती अळी खोडाच्या आत शिरुन उगवणाऱ्या कोंबाला ७ दिवसांत खाऊन टाकते. त्यामुळे १२-१८ दिवसांत पोंगा मर दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव फुटव्यावर व लागवडीपेक्षा खोडवा पिकात अधिक प्रमाणात दिसून येतो. सदरील पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो व त्याचा उग्र वास येतो. किडीमुळे नुकसान झालेले उसाचे पीक विरळ दिसते.

नियंत्रण पद्धती आणि ऊपाय : ऊस खोड कीड नियंत्रण । us khod kid niyantran

    1. खोल सरीमध्ये लागण - खोल सरीमध्ये लागण केल्यास खोडकीचा प्रादुर्भाव कमी आढळतो.
    2. लागण वेळेमध्ये बदल - सुरू ऊसात खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. कारण जास्त तापमानामुळे उपयुक्त परोपजीवी किटक कमी वाढतात व किड वाढते. फेब्रुवारी नंतर ऊसाची लागण टाळावी, पुर्व हंगामी ऊसात खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी असतो.
    3. पाचट आच्छादन - पाचट आच्छादनामुळे ऊसामधील सुक्ष्म हवामान बदलते व पाण्याचे बाष्पीभवनही कमी होते. खोडकिडीच्या अळीला ऊसाच्या बुडख्या जवळ पोहचण्यास अडथळा होतो. उभ्या ऊसाची फक्त कोरडी पाने काढावीत खोडव्यात सरी आड सरी पद्धतीने पाचट ठेवावे. 
    4. बाळ बांधणी - ऊस लागणीनंतर सहा आठवड्यांनी बाळ बांधणी केल्यास खोड किडीचे प्रमाण कमी होते. बाळ बांधणी केल्यामुळे ऊसाच्या खोडाच्या आतील अळीने खोडाला केलेले छिद्रे ओल्या मातीमुळे बंद होते परिणामी प्रौढ किडीला बाहेर निघता येत नाही व ते खोडातच मरतात व पुढील पिढी तयार होत नाही. बाळ बांधणीमुळे साधारपणे ३०-४० टक्के खोड किड कमी होते.
    5. दोन पाण्याच्या पाळीतील अंतर कमी करणे - मार्च ते मे महिन्यात पाण्याची कमतरता हा खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा - महत्वाचा घटक आहे. तथापी रूंद सरी पध्दत, ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दत, एक आड एक सरीला पाणी देणे, पाचट आच्छादन, कांदा, कोथिंबीर आंतरपीक वापरून खोडकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवता येतो.
  • कामगंध सापळे Trap for sugarcane early shoot borer - ऊस लागवड करून एक महिन्याचा झाल्यावर प्रति एकरी खोडकीड नियंत्रित करणारे ५ कामगंध सापळे लावावेत.
  • रासायनिक पद्धत : रासायनिक कीटनाशकाचा वापर करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पद्धतीने कीड नियंत्रण करू शकतो.  

  • रासायनिक पद्धत : 

  • बेणे प्रकिया : लागणीच्या आधी उसाची टिपरी धानुका कंपनीचे सुपर डी कीटनाशक ( Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC ) २०० मिली प्रति १०० लिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे बुडवून लागण केल्यास किडीचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त होतो. 

  • खतासोबत जमिनीमधून कीडनाशक : ऊस पिकामध्ये बेसल डोस देत असताना खतासोबत बायर कंपनीचे रिजंट अल्ट्रा ( Fipronil 0.6 GR ) ८ किलो प्रति एकरी दिल्यास किडीचे प्रतिबंधात्मक नियंत्रण होते. 

  • आळवणी / ड्रेंचिंग : किडीचा प्रधुरभाव दिसू लागताच धानुका कंपनीचे सुपर डी कीटनाशक ( Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC )  ७५ मिली प्रति १५ लिटर पाणी आळवणी करावी 
  • किंवा FMC कंपनीचे कोराजन ( क्लोरैंट्रानिलिप्रोल 18.5% SC । Chlorantraniliprole 18.5% SC ) २० ते १५० मिली प्रति एकरी ४०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रीप वाटे द्यावे किंवा आळवणी करावी. 


  • फवारणी : किडीचा प्रधुरभाव दिसू लागताच धानुका कंपनीचे फॅक्स ( Fipronil 5% SC ) ४० मिली किंवा FMC कंपनीचे कोराजन ( क्लोरैंट्रानिलिप्रोल 18.5% SC Chlorantraniliprole 18.5% SC ) ६ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 

  •  

    Back to blog

    होम

    वीडियो कॉल

    VIP

    फसल जानकारी

    केटेगरी