द्राक्ष पिकातील उडद्या नियंत्रण

द्राक्ष पिकातील उडद्या नियंत्रण

हे द्राक्ष सुरक्षा किट आताच खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3Db8xdv

----------------------------------------------------------------------------------------------------------

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱 द्राक्ष पिकातील उडद्याचे नियंत्रण कसे करावे हे जाणून घेणार आहोत 👍

द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पूर्वी उडद्या किडीचा प्रादुर्भाव फक्त कोवळ्या फुटी वर दिसत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उडद्या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटींसोबतच, तो आता द्राक्ष घड व मण्यांवर दिसू लागला आहे. यामुळे या किडीच्या नियंत्रण व्यवस्थापनाच्या दृष्टीने संपूर्ण फळछाटणी हंगामाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

✅ नुकसान
👉 छाटणीच्या वेळी साधारणतः या किडीचे प्रमाण जास्त असते. ही कीड सकाळी-संध्याकाळी व रात्रीच्या वेळी नवीन येणाऱ्या कोवळ्या फुटीवर अगदी तुटून पडते.
👉 डोळ्यातून फुटणारे बारीक कोंब, बाळ्या, कोवळी फूट, पाने तसेच घड खातात. नवीन फूट वाळते, गळते. पानांवर गोल-लंबोळी छिद्रे पडतात.
👉प्रादुर्भाव अधिक असल्यास पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. मुळ्यावर अळ्या उदरनिर्वाह करतात. त्यामुळे वेलीची पाने पिवळी होतात, गळतात.
👉 किडीच्या प्रादुर्भावाने द्राक्ष बागेचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची नोंद आहे.

✅ प्रतिबंधात्मक नियंत्रण

👉अळ्या व कोष सूर्यप्रकाशामध्ये येण्याकरिता वेळोवेळी जमीन चाळून घ्यावी.
👉छाटणी दरम्यान बाग स्वच्छ ठेवावी. बोदावर गवत वाढू देऊ नये. खाली पडलेली, वाळलेली पाने गोळा करून बागेबाहेर नष्ट करावीत.
👉ऑक्टोबर छाटणीनंतर वेलीच्या खोडावरील व ओलांड्यावरील सुटलेली साल काढून घ्यावी.
👉जमिनीमध्ये जैविक नियंत्रणासाठी ईपीएन यांचे ड्रेंचिग करावे. त्यानंतर पुन्हा परत बागेला पाणी द्यावे.

✅ रासायनिक नियंत्रण :
फळछाटणीनंतर डोळे फुगण्याची अवस्था किंवा फुटी फुटत असतानाच्या अवस्थेत लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ टक्के सीएस) १०० मि.लि.प्रति एकर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. या फवारणीमुळे उडद्याबतच पिठ्या ढेकूण, फुलकिडे व तुडतुडे यांच्या नियंत्रणासही मदत होते.

ह्या शिवाय उडद्याचे नियंत्रण साठी भारत ऍग्रीचे द्राक्ष सुरक्षा किट हि वापरू शकता.

✅ द्राक्ष सुरक्षा किट (याच्यामधील सामाविष्ट घटक 👇)

1️⃣कॉन्फिडोर 100 मिलि (बायर )
2️⃣स्टिकर- 25 मिलि ( आनंद ऍग्रो केअर )

✅किंमत आणि सूट -

⚡MRP - 615/-
⚡खरेदी किंमत - 599/-
⚡एकूण बचत - 16 /-
⚡एकूण सूट - 2.60%

घरबसल्या आजच हे किट खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा -

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी