Control brown and downy mildew now with taqat fungicide

भुरी आणि डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण करा आता taqat fungicide च्या मदतीने

शेतकरी मित्रांनो, भुरी powdery mildew आणि डाऊनी मिल्ड्यू downy mildew हा जास्त करून द्राक्ष, कारली, भोपळा, दोडका इ. वेलवर्गीय पिकांवर होणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण न झाल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा येऊन उत्पादनामध्ये घट येते. भुरी आणि डावणी मिल्ड्यू या रोगामुळे उत्पादनामध्ये ६०- ७० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे आढळून आले आहे.

भुरी रोग powdery mildew disease

अनुकूल हवामान - 13 अंश सेल्सिअस तापमान व 50 टक्के आर्द्रता या वातावरणात भुरीची सुरवात होते. 22 ते 30 अंश सेल्सिअस तापमान व 60 ते 70 टक्के आर्द्रता या हवामानात भुरी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र आलेली भुरी ढगाळ हवामानात कोणत्याही तापमानाला वाढते, तसेच 36 व त्यापुढील तापमानामध्ये व आर्द्रता 98 टक्‍क्‍यांच्या पुढे व 40 टक्‍क्‍यांच्या आत असल्यास भुरी येत नाही.

Tata Rallis Taqat (Captan 70% + Hexaconazole 5% WP)

रोगाची लक्षणे - Symptoms of powdery mildew

  1. पानांच्या खालील बाजूस काळसर रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला पानावर पिवळसर पांढरट ठिपके व नंतर ते भुरकट होऊन संपूर्ण पान काळपट दिसते. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
  2. रोगाचा प्रादुर्भाव वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढतात.
  3. रोगग्रस्त वेलीची वाढ खुंटून पानात विकृती येते.
  4. पावसाळ्याच्या दिवसांत कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्यामार्फत भुरी रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो.
  5. फुलोरा अवस्थेत रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही. फळ धारणेच्या वेळी प्रादुर्भाव असल्यास मणी अनियमित आकाराचे होतात. काही मणी अपक्वच राहतात. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर मण्यांवर येऊन मणी तडकतात व फुटतात.

डाउनी मिल्ड्यू रोग  downy mildew disease

अनुकूल हवामान - हवेतील सकाळची आर्द्रता 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 टक्‍क्‍यांवर असतेअशा प्रकारची स्थिती जेव्हा 72 तास अथवा त्याहून अधिक काळ टिकते तेव्हा या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. पावसाळ्यात अशा प्रकारचे आर्द्रता प्रमाण राहण्याचा कालावधी अधिक असतो. हिवाळी हंगामातही पावसाळा संपल्यानंतर काही काळ अशा प्रकारे हवेत आर्द्रता टिकून राहते. पिकांच्या दृष्टीने हवेतील अधिक आर्द्रता उपयुक्त ठरते; परंतु त्याबरोबरच पिकांवरील रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीवांचे प्रमाण झपाट्याने वाढण्यास, रोग पसरण्यास आणि फैलावण्यास ती अधिक वेगाने कारणीभूत ठरते.

रोगाची लक्षणे  Symptoms of downy mildew  

  1. पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवट ते पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.
  2. ढगाळ वातावरणात या ठिपक्यांच्या खालील बाजूला जांभळट रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे - काळे किंवा राखाडी होतात.
  3. पूर्ण वाढ झालेल्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.  प्रादुर्भाव झालेली पाने करपतात व गळून पडतात. 
  4. रोगाचा प्राधुरभाव पानाचे देठ आणि फांद्यावरही आढळून येतो. 
  5. रोगग्रस्त वेलींना फुले-फळे कमी प्रमाणात व लहान आकाराची लागतात. त्यांचा दर्जा कमी आणि बेचव असतो. वेली लवकर सुकतात.

 चला जाणून घेऊयात भुरी रोग आणि डाऊनी मिल्ड्यू रोगाचे प्रभावी पाने नियंत्रण करणाऱ्या टाटा रॅलीस कंपनीचे ताकत ( कैप्टन 70% + हेक्साकोनाज़ोल 5% डब्ल्यूपी ) या बुरशीनाशकबद्दल. 

 Tata Taqat fungicide ( Captan 70% + Hexaconazole 5% WP ) या बुरशीनाशकाची वैशिष्ट्ये - 

टाटा टाकत हे एक  broad spectrum fungicide बुरशीनाशक आहे. 

  1. हे बुरशीनाशक स्पर्शजन्य contact आणि आंतरप्रवाही systemic  पद्धतीने काम करते.
  2. स्पर्शजन्य contact बुरशीनाशक असल्यामुळे पानाच्या पृष्ठभागावर असलेल्या बुरशीचे नियंत्रण करते. 
  3. आंतरप्रवाही systemic बुरशीनाशक असल्यामुळे औषध पर्णरन्ध्रतुन प्रवेश करून रुजलेल्या बुरशीच्या बीजाणूंचे नियंत्रण करते. 
  4. माती मधून आणि बियांमार्फत पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करते.

ताकत बुरशीनाशक बद्दल थोडक्यात माहिती ।  Taqat fungicide information

प्रोडक्ट 

ताकत 

कंपनी 

टाटा रैलिस 

घटक 

हेक्साकोनाज़ोल 5% + कैप्टान 70% WP

रोग नियंत्रण tata taqat fungicide uses

डाउनी मिल्ड्यू , पाउडरी मिल्ड्यू, एन्थ्रेक्नोज, करपा आणि ग्रे मिल्ड्यू 

प्रमाण taqat fungicide dose

2 ग्राम / प्रति लीटर पाणी 

पिके 

भात, ऊस, कापूस, कोबी, टोमॅटो, वांगे, मिरची, सोयाबीन, कार्ले, भेंडी, मका इ. सर्व फळ व भाजीपाला पिके 

कार्य

स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक 

किंमत tata taqat fungicide price

५०० ग्राम - ८०० ते ८५० रुपये


शेतकरी मित्रानो, टाटा रॅलिस कंपनीचे ताकत बुरशीनाशक तुमच्या जवळच्या कृषी दुकानात उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला ते खरेदी करता येत नसेल, तर तुम्ही ते भारतअ‍ॅग्री कृषी दुकानातून मोफत होम डिलिव्हरीसह आणि चांगल्या सवलतीत खरेदी करू शकता.  

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी