🌱टोमॅटो पिकातील तिरंगा, भुरी आणि फळ सड नियंत्रण | Tomato Pest Management👍

🌱टोमॅटो पिकातील तिरंगा, भुरी आणि फळ सड नियंत्रण | Tomato Pest Management👍

 

✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉https://krushidukan.bharatagri.com/

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱टोमॅटो पिकातील तिरंगा, भुरी आणि फळ सड नियंत्रण | Tomato Pest Management👍

✅ टोमॅटोवरील तिरंगा व्हायरस

रोग फुलकिड्यांमार्फत पसरतो. फुलकिडे टोमॅटोची पाने कुरतडतात आणि पाझरणारा रस शोषून घेतात. हंगामाच्या अगदी सुरुवातीला या रोगाची लागण झाली तर फळधारणा होत नाही व फळधारणा झाल्यानंतर लागण झाली तर फळांवर हिरव्या बांगडी च्या आकाराचे ठिपके दिसतात. एवढेच नाही तर नवीन पानांवर तपकिरी रंगाच्या रिंगा देखील पडतात. जर उशिरा लागण झाली असेल तर रोपांना डागाळलेली फळे लागतात.

✅ उपाय:
👉टोमॅटो रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ ते ८ दिवसानंतर २५ पिवळे व निळे चिकट सापळे प्रति एकरी लावावेत. तसेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुलकिड्यांचा प्रधुरभाव झाल्यास -

1️⃣ डॉ. बैक्टो वर्टिगो (वर्टिसिलियम लेकानी) - ४५ मिली
2️⃣ झपॅक (थियामेथोक्सम 12.6% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 9.5% जेडसी) - ८ मिली
3️⃣ अरेवा (थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी) - ८ ग्राम

👉या पैकी कोणत्याही एका कीडनाशकांची प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तसेच व्हायरसची लक्षणे दिसू लागताच पुढील फवारणी घ्यावी.
👉कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल) ८ मिली + नो व्हायरस (बोटॅनिकल एक्सट्रॅक्ट) ४५ मिली + आनंद वेट गोल्ड (स्टिकर) २ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

✅ भुरी रोग
थंड आणि कोरड्याहवामानात हा रोग प्रामुख्याने येतो. पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे चट्टे पडतात आणि पानाचा वरचा भाग फिकट पिवळसर होतो. भुरीचे प्रमाण फार वाढल्यास पानांची गळ होते. भुरीचे ठिपके फांद्या फुले आणि फळे यांवरही येतात.

✅ उपाय:
1️⃣ रैलिस ईशान (क्लोरोथालोनिल 75% डब्लू. पी.) - ३० ग्राम
2️⃣ कोंटाफ प्लस (हेक्साकोनाजोल 5% एससी) - २५ मिली
3️⃣ अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68% डब्लू. पी.) - ३० ग्राम
4️⃣ गोडिवा सुपर (एज़ोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डिफेनोकोनाज़ोल 11.4% एससी) - १५ मिली
5️⃣या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

✅ फळ सडणे (ब्लॉसम एन्ड रॉट)
कॅल्शिअम या अन्नद्रव्याच्या कमतरते मूळे हि विकृती दिसून येते. या विकृतीमध्ये सुरवातीच्या काळात फळाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगाचा ठिपका दिसून येतो. ठिपक्याचा आकार वाढत जाऊन नंतर तो भाग कुजतो.

✅उपाय :
👉 खतांचा संतुलित वापर करावा.
👉 आवश्यकतेनुसार चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.
👉 रोको बुरशीनाशक (थायफेनेट मिथाईल 70% डब्ल्यू) ८ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी