best medicine for red spider – dhanuka omit

हे आहे लाल कोळी साठी बेस्ट औषध - omite

शेतकरी मित्रानो, भाजीपाला आणि फळपिकांमध्ये ऊदा. मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो, गुलाब, वेलवर्गीय पिके, कापूस, द्राक्षे, नारळ, डाळिंब, लिंबूवर्गीय फळपीक तसेच फुल व फळ पिकांमध्ये कोळी या किडीचा जास्त प्रधुरभाव होतो. रसशोषक किडींपैकी कोळी हि एक महत्वाची कीड आहे. कोरडे हवामान आणि वातावरणात ६० टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता ह्या दोन गोष्टींमुळे किडीची संख्या वाढते. कोळी या किडीमुळे उत्पादनामध्ये ३० ते ४० % पर्यंत घट येऊ शकते. चला जाणून घेऊयात कोळी या किडीबद्दल आणि त्याचे प्रभावीपणे नियंत्रण करणाऱ्या ओमाइट omite dhanuka या कोळीनाशकाबद्दल. 

Dhanuka Omite Insecticide

लक्षणे : 

  1. कीड पानांच्या खालील बाजूस जमावाने आढळते. 
  2. पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. 
  3. झाडाची पाने खालच्या बाजूने झुकून चुरगळली जातात व पानांना उलट्या होडीचा आकार येतो.
  4. झाडाची वाढ खुंटली जाते, फुलगळ होते व फळांच्या देठावर आणि पानांवर लालसर तपकिरी रंगाचे डाग पडतात व नंतर गळ होते.
  5. कधीकधी झाडावरील पिकणार्‍या फळांच्या पृष्टभागावर ही कीड आढळते. त्यामुळे फळाची साल खडबडीत व अनैसर्गिक तपकिरी रंगाची दिसते. कीड इतकी लहान असते की, ती केवळ भिंगातून दिसते.

किडींची संख्या ठराविक मर्यादेत असतानाच कोळीनाशकाचा वापर झाल्यास फवारण्याची संख्या कमी करता येते. या साठी तुम्ही धानुका कंपनीचे ओमाइट हे कोळीनाशक वापरू शकता. 

ओमाइट (Propargite 57% EC)   omite insecticide content

ओमाइट (Propargite 57% EC) हे सल्फाईट एस्टर गटाचे कोळीनाशक (अ‍ॅकेरिसाइड) आहे, जे स्पर्शजन्य पद्धतीने काम करते आणि वाफेच्या माध्यमातून कोळीचे प्रभावी नियंत्रण करते. कोळीच्या 36 प्रजातींच्या नियंत्रणासाठी 72 देशांमध्ये ओमाइटची नोंदणी आहे. ज्या कोळीकिडींमध्ये इतर कोळीनाशक वापरून प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे अशावेळी ओमाइट हे पिकांना त्वरित संरक्षण प्रदान करते कारण किडीची खाद्य क्रिया ओमाइटच्या वापरानंतर लगेचच बंद होते.

लाल कोळीचे नियंत्रण omite insecticide uses in marathi 

  • ही कीड तिच्या वसाहतीभोवती जाळे तयार करते.
  • त्यामुळे एकरी 400 ते 500 लिटर कीडनाशकाचे द्रावण फवारूनही किडीपर्यंत ते पोचत नाही व प्रभावी नियंत्रण मिळत नाही. त्यासाठी हे जाळे तुटणे गरजेचे असते.
  • एकरी एक हजार ते दोन हजार लिटर पाणी जोरदार प्रेशरने फवारले तर वसाहती भोवतालचे जाळे फाटते.
  • काही प्रमाणात अंडी पाण्याने धुऊन जमिनीवर पडतात व किडीची संख्या कमी होते.
  • पाणी फवारणी प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी ओमाइटची फवारणी केल्यास कमीत कमी फवारण्यांमध्ये किडीचे यशस्वी नियंत्रण होण्यास मदत होते.

प्रोडक्ट 

ओमाइट Omite

कंपनी 

धानुका 

घटक 

प्रॉपरगाईट ५७%  इ.सी.   omite propargite       omite chemical

कीड नियंत्रण 

कोळी ( लाल कोळी , पिवळा कोळी )

प्रमाण

३० मिली प्रति १५ लिटर पंप 

पिके 

मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो, गुलाब, वेलवर्गीय पिके, कापूस, द्राक्षे, नारळ, डाळिंब, लिंबूवर्गीय फळपीक

कार्य

स्पर्शजन्य आणि गॅस पॉइझन कोळीनाशक 

किंमत

५०० मिली - ७५०  ते ८०० रुपये

 

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी