best cotton variety in maharashtra

कापूस पिकाच्या जाती (best cotton variety in maharashtra): ज्या देतील तुम्हाला एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. कापूस पे पीक पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. मराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगदी पिक म्हणून कापूस लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येते. लागवड करताना प्रत्येक शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे अधिक उत्पादन देणारी कोणती जात वापरावी best cotton variety in maharashtra. म्हणूनच या लेखामध्ये आपण कापूस पिकाचे विविध सुधारित व जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाबद्दल kapus variety माहिती घेणार आहोत.

कापूस पिकाच्या जाती । bt cotton variety list । cotton variety in maharashtra

1. राशी 659 BG II (राशी सीईड्स)

जमीन - मध्यम ते भारी
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी - 145 - 160 दिवस.

वैशिष्ट्य -
1. वजनदार आणि मोठ्या आकाराचे कापूस बोंड
2. कापूस वेचणीस सोपा
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5 ते 5.5 ग्राम
4. लवकर येणारी जात.

2. जादू (कावेरी सीड्स)

जमीन - हलकी ते माधयम
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी 155 - 170 दिवस.

वैशिष्ट्य -
1. रस शोषक किडीस प्रतिकारक
2. दाट लागवडीसाठी चांगला वाण (4 * 1.5 फूट)
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 6 ते 6.5 ग्राम (मध्यम मोठे बोंड)
4. प्रत्येक फळफांदीस 12 ते 14 बोंडे लागण्याची क्षमता, भरपूर पुनर्बहर क्षमता.
5. कापूस वेचणीस सोपा. 

3. कब्बडी (तुलसी सीड्स)

जमीन - सर्व प्रकारच्या जमिनी मध्ये लागवड करू शकता.
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी 160 - 180 दिवस.

वैशिष्ट्य -
1. अधिक उत्पादन क्षमता,मोठा बोंडाचा आकार
2. कापूस वेचणीस सोपा
3. जास्तीत जास्त 5 पाकळी बोंड
4. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम
5. फरदडी साठी उपयुक्त वाण.

4. सुपरकोट (प्रभात सीड्स)

जमीन - माध्यम ते भारी
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी 160 - 170 दिवस.

वैशिष्ट्य -
1. रस शोषक किडीस व लाल्या रोगास प्रतिकारक
2. कापूस वेचणीस सोपा
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम
4. बोंडे लागण्याची संख्या चांगली.

5. यु.एस. 7067 ( यु.एस. ऍग्रीसीड्स )

जमीन - माध्यम ते भारी
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी - 155 - 160 दिवस.

वैशिष्ट्य -
1. रोग प्रतिकारक चांगली
2. दाट लागवडी योग्य वाण (3 * 2 फूट )
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम
4. मोठी बोंडे, आकार गोल.
5. लवकर येणारे वाण

6. अजित 155 (अजित सीईड्स)

जमीन - हलकी ते माधयम
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी 145 - 160 दिवस.

वैशिष्ट्य -
1. रस शोषक किडीस व लाल्या रोगास प्रतिकारक
2. पाण्याचा ताण सहन करणारे वाण
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5 ते 5.5 ग्राम
4. बोंडे लागण्याची संख्या चांगली.


Conclusion | सारांश -

कापूस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घायचे असल्यास जमीन कशी आहे? पाण्याचे नियोजन कसे आहे ? हे निकष तपासून वाणाची निवड करावी तसेच अधिक उत्पादनासाठी वाणाच्या निवडीसोबतच खत, कीड व रोगाचे नियोजन करणे हे हि अत्यंत महत्वाचे आहे. आशा करतो की Bharatagri krsuhi Dukan वेबसाइट वरील आमचा आजचा “कापूस पिकाच्या जाती (best cotton variety in maharashtra): ज्या देतील तुम्हाला एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन” हा लेख तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर याला तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.


FAQ । सतत विचारले जाणारे प्रश्न -

1. कापसाची दाट लागवड करायची असल्याचं कोणते वाण लावावे ?

उत्तर -कापसाची दाट लागवड करायची असल्याचं कावेरी सीड्सचे - जादू किंवा यु.एस. ऍग्रीसीड्सचे - यु.एस. 7067 हे वाण लावू शकता.

2. पाण्याची कमतरता असल्यास कोणते वाण लावावे ?

उत्तर - पाण्याची कमतरता असल्यास अजित सीईड्सचे - अजित 155 हे वाण लावू शकता. ह्या वाणाची मुळे पाण्याच्या शोधता खोल वर जात असल्याने पाण्याचा ताण पडल्यास तग धरून राहते.

3. पाच पाकळी असलेले कोणते वाण चांगले आहे ?

उत्तर - पाच पाकळी असलेले तलुसी सीड्सचे कब्बडी वाण हे सगळ्यात ऊत्तम वाण आहे.

4. फरदडी साठी कोणते वाण चांगले आहे ?

उत्तर - फरदडी साठी तलुसी सीड्सचे कब्बडी वाण हे सगळ्यात ऊत्तम वाण आहे.

5. कापूस बियाण्यास बीजप्रक्रिया करण्याची आवश्यकता असते का ?

उत्तर - हो, कंपनीने जरी कापूस बियाण्यावर प्रक्रिया केली असली तरी बियाणे पेरणीच्या आधी बुरशीनाशक व कीडनाशकाची प्रक्रिया केल्यास कीड व रोगावर प्रतिबंधात्म नियंत्रण मिळवता येते.


लेखक,
भारतअ‍ॅग्री कृषि एक्स्पर्ट

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी