120 tonnes of sugarcane harvest per acre.

टेलर चे काम सोडून सुरू केली शेती, एकरी काढले 120 टन ऊस उत्पादन.

उसापासून एकरी 120 टनाच उत्पादन मारुती कदम यांनी घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो आपण मारुती कदम यांची ऊस उत्पादनाची यशोगाथा पाहणार आहोत ( ऊस लागवड माहिती मराठी ). या लेखामध्ये श्री. मारुती कदम यांनी उत्पादन वाढीसाठी नेमकं काय केले,  कोणत्या उसाच्या जातीच्या बियाणं वारले, कोणती अशी वेगवेगळी खत टाकली की जेणेकरून एकरामध्ये त्यांना 120 ऊस उत्पादन भेटले us lagwad या विषयी माहिती बघणार आहोत. 

श्री. मारुती केरबा कदम राहणार - न्हावरे,  तालुका - शिरूर,  जिल्हा - पुणे हे त्यांच्या मामाची ६ एकर शेती करतात. पूर्वी ते टेलरिंगचा (कपडे शिवण्याचा) व्यवसाय करायचे तसेच त्यांना शेतीतला कुठल्या कामाचा अनुभव नव्हता. मारुतीराव याना शेतीची आवड असल्याने २००६ साली मामाची जमीन वाट्याने करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हापासून कांदा, गहू, हरभरा, मिरची आणि डाळिंब अशी पिके ते घेत होते. नंतर २०२० साली त्यांनी ऊस पीक घेण्याचा ठरवले. प्रथमच ऊस पीक घेत असल्याने त्यांना मार्गदर्शनाची गरज होती तेव्हा मित्राकडून भारतअ‍ॅग्रीची माहिती भेटली. भारतअ‍ॅग्री ग्रुपच्या मार्गदर्शन खाली ऊसाचे अपेक्षित उत्पादन घेण्याचे ठरवले. सध्या ५ एकर मध्ये ऊस हे पीक असते तसेच अर्धा एकर शेततळे व अर्धा एकर जनावरांसाठी चारा पिकाची लागवड ते करतात.     

माणूस मेहनती असेल तर शेतीचे नियोजन चांगल्या पद्धतीने होते. नांगरणी, काकर पाळी, लागणीचे नियोजन, बेणे निवड करणे, ऊस पिकांमधील अंतर, खत आणि  पाणी व्यवस्थापन, ऊस उगवण झाल्यावर मुळी, शाखीय वाढ आणि फुटवे चांगले येण्यासाठी नियोजन, तण व्यवस्थापन ह्या गोष्टी व्यवस्थित केल्यानंतर १०० टनांच्या वर आपण जाऊ असे त्यांनी सांगितले. 

ऊस पिकासाठी पाण्याचे नियोजन ड्रीपच्या मध्यातून केले. ड्रीप मुळे युरिया, फॉस्फरिक ऍसिड, १२:६१:००, पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट इ. रासायनिक खते व स्लरी हे ड्रीप मधून देणे सोपे झाले. ड्रीप मधून विद्राव्य खते दिल्यामुळे ती पिकाला चांगली लागू झाली. विद्राव्य खतामुळे उसाच्या फुटव्यांची चांगली वाढ झाली. एका फुटव्यांची वजन सरासरी ५ किलो होते.  मारुतीराव सांगतात ऊस हे आळशी लोकांचे पीक आहे असं बऱ्याच जणांचं वाटत कारण त्यांचा समज आहे कि ऊस पिकाला पाणी आणि खात दिले कि झालं पण तस नाही जेवढी मेहनत आपण इतर दुसऱ्या पिकामध्ये घेतो तेवढीच मेहनत जर आपण ऊस पिकामध्ये घेतल्यास निश्चित १२० टन पेक्षा अधिक उत्पादन घेऊ शकतो. शेती व्यवसायामध्ये मेहनत मनापासून केली तर नक्कीच १०० % रिझल्ट मिळतो. 

ऊस पिकाचे नियोजन करताना मशागत केल्यानंतर ५० बॅग कोंबडी खत टाकले कारण चांगले शेणखत लवकर उपलब्ध होत नाही आणि झालेच तर ते परवडत नाही. कोंबडी खतासाठी त्यांना ६५०० ते ७००० रुपयांपर्यंत खर्च आला. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त पाणी आहे त्यांनी नक्कीच ऊस पिकासाठी कोंबडी खत टाकावे ज्यामुळे ऊस पिकास सेंद्रिय पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता होते असा त्यांचा अनुभव आहे. लागवडीसाठी ८६०३२ या जातीचा वापर, लागवडी पासून ते बांधणी पर्यंतचे खत व्यवस्थापन, पाणी नियोजन हे त्यांनी भारतअ‍ॅग्रीच्या मार्गदर्शनाखाली केले. या साठी त्यांना एकरी ४५ ते ५० हजार पर्यंत खर्च आला. 

भारतअ‍ॅग्रीच्या मदतीने ऊस पिकाचे नियोजन व लागणारी खते, कीडनाशके आणि बुरशीनाशके  भारतअ‍ॅग्रीच्या कृषी दुकानातून ऑनलाईन खरेदी केल्याने व सोबतच मारुती कदम यांची मेहनत या मुळे एकरी १२० टनाच टप्पा गाठता आला. 

 

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी