turmeric seed storage in marathi

turmeric seed storage: हळद साठवणूक कशी करावी?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण हळद बियाणे साठवणूक कसे करावे? (halad biyane sathavnuk in marathi) या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हळद कंदाची गुणवत्ता दीर्घकाळ टिकविण्यासाठी पिकाची योग्यवेळी काढणी आवश्‍यक असते. त्याचबरोबरीने काढणीपश्‍चात योग्यपद्धतीने साठवणही (turmeric seed storage) महत्त्वाची आहे, अन्यथा कंदांना कीडरोगांचा प्रादुर्भाव होऊन ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. हळद कंद दीर्घकाळ सुस्थितीत राहावेत, यासाठी काढणी करतानाही योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर काढणीपश्‍चात व्यवस्थापन (turmeric seed storage in marathi) ही बाबही  महत्त्वाची आहे.

 

हळद कंद काढणीपश्‍चात व्यवस्थापन -

हळदीचे कंद काढताना पूर्ण कालावधी झालेले परिपक्व साधारण नऊ महिने पूर्ण झालेले कंद काढावेत.

कंद काढतेवेळी 75 टक्के पाण्याचा अंश असतो तो साठवणुकीमध्ये 50 टक्केपेक्षा कमी झाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो.

हळद काढणी झाल्यानंतर बियाण्यासाठीचे कंद लगेच किंवा शक्‍य तेवढ्या लवकर सावलीत ठेवावेत.

व्यापारी दृष्टिकोनातून लागवडीसाठी मातृकंद किंवा बंडा वापरावा. बेणे साठवणुकीसाठी हळदीचा पाला, पाचट, गव्हाचे काड, वाळलेले गवत यांचा वापर करावा. 

वापरापूर्वी हे सर्व घटक क्विनॉलफॉस 2 मिलि अधिक कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणाने फवारून निर्जंतुक करून घ्यावेत. निर्जंतुकीकरणानंतर हे घटक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावेत. बेणे सावलीमध्ये हवेशीर ठिकाणी साठवावे. 

 

हळद साठवणूक कशी करावी (halad sathavnuk in marathi) -

1. जमिनीवर बियाणे साठवणे (turmeric seed storage) -

बियाण्यांची सुप्तावस्था संपण्यासाठी 2.5 महिने बेणे साठवावे लागते.

त्यासाठी निर्जंतुक केलेल्या पाल्याची 6 ते 8 इंच जाडीची गादी तयार करावी.

त्यावर सावलीत ठेवलेले बेणे टाकावे. एक फूट उंचीचा थर झाला की कार्बेन्डाझिम पावडर 1 किलो या प्रमाणात धुरळावी.

अशा पद्धतीने तीन फूट उंचीचा ढीग करावा.

त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा 6 ते 8 इंचाचा थर टाकावा. त्या

वर दोन दिवसांतून एकदा गोणपाट ओले करून टाकावे.

आले गोणपाट टाकताना ढिगामध्ये थंडावा राहील अशा पद्धतीने टाकावे.

 

2. जमिनीत खड्डा करून बियाणे साठवणे (turmeric seed storage) -

ज्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची पातळी 1 मीटरपेक्षा खोल आहे अशा सावलीच्या ठिकाणी  3 ते 3.5 फूट खोलीचा व जरुरीप्रमाणे लांबी रुंदीचा खड्डा खोदावा.

खड्याच्या तळाला ढाळ किंवा उतार द्यावा. खड्डयाच्या तळाशी 3 ते 4 इंच जाडीचा विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा. त्या वर कार्बेन्डाझिम पावडर 1 किलो या प्रमाणात धुरळावी.

त्यावर निर्जुतक केलेल्या पाल्याचा अर्धा फूट जाडीचा थर द्यावा. तसेच खड्डयाच्या बाजूलाही तेवढ्याच जाडीचा पाल्याचा थर द्यावा.

एक फूट उंचीचा थर झाला की पुन्हा थरावर कार्बेन्डाझिम पावडर 1 किलो याप्रमाणात धुरळावी.

खड्डा 3 फूट इतक्या उंचीचा भरुन घ्यावा. त्यानंतर त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा थर टाकावा.

तसेच खड्डयामध्ये 1 मीटर अंतरावर छिद्र पाडलेले पोकळ बांबू किंवा 2.5 ते 3 इंच व्यासाचे छिद्र पाडलेले पी. व्ही. सी. पाइप टाकावेत.

त्यानंतर खड्डा लाकडी फळी किंवा गोणपाटाने झाकून घ्यावा.

पाऊस आल्यास तेवढ्या वेळे पुरता खड्डा प्लॅस्टिक कागदाने झाकून घ्यावा.

 

Conclusions | सारांश -

हळद हे भारतातील महत्त्वाचे तसेच बहुउपयोगी मसाला पीक म्हणून प्रचलित आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता हळद पिकासाठी उत्तम आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रिया, बियाणे साठवणूक (turmeric seed storage) करण्यापर्यंत हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. कच्च्या मालाची योग्य पद्धतीने प्रतवारी करून त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी वरील कोणत्याही दोन पद्धतीने साठवणूक करावी साठवणूक करावी.

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

1. हळद साठवणूक साठी किती दिवसाचे कंद वापरावे?

उत्तर - हळद साठवणुकीसाठी 9 महिने पूर्ण झालेले कंद काढावेत.

2. साठवण करण्यासाठी वापरण्यांत येणारा पाला निर्जंतुक कसा करावा?

उत्तर- वापरापूर्वी क्विनॉलफॉस 2 मिलि अधिक कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणाने फवारून निर्जंतुक करून घ्यावेत

3. हळद साठवणूक कशी करावी?

उत्तर - हळद साठवणूक जमिनीवर बियाणे साठवून आणि जमिनीमध्ये खड्डा करून अशा दोन पद्धतीने साठवता येतात. 

4. हळद साठवणूक योग्य पद्धतीने केले नाही तर काय होते?

उत्तर - हळद साठवणूक यौग्य पद्धतीने केले नाही तर बियाण्यास कीड व रोगाची लागण होते.  

 

People also read | हे देखील वाचा - 

1. भाजीपाला पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण

2. ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन

3. स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. कुसुम सोलर पंप योजना 2024 ची संपूर्ण माहिती

 

लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी