tomato leafminer control

Tomato leafminer: टोमॅटो पिकातील नागअळी (टूटा) नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतअॅग्री कृषी दुकान वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण या लेखा मध्ये टोमॅटो पिकांमधील सर्वात हानिकारक कीड म्हणजे नागअळी बद्दल माहिती पाहणार आहोत. या मध्ये नागअळीचे जीवनचक्र, लक्षणे, नुकसान, आणि उपाय अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

टोमॅटोमधील नागअळी(tuta absoluta) मुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते, या किडीमुळे सुमारे 80-90% टोमॅटो पिकाचे नुकसान होते. जेव्हा प्लॉटमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा कोणतेही कीटकनाशक त्यावर चांगले काम करू शकत नाही, जर तुम्हाला टोमॅटो नागअळी नियंत्रण करायचे असेल तर प्रतिबंधात्मक उपचारांकडे चांगले लक्ष दिले पाहिजे. जेव्हा वातावरणातील तापमान 20-25 अंश सेल्सिअस दरम्यान असते तेव्हा ट्युटा नागआळी टोमॅटो पिकाचे अधिक नुकसान करते. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवाळी म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान खूप जास्त प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल.


टोमॅटो नागअळीचे जीवनचक्र समजून घेऊ -

जर आपण नागअळीचे जीवनचक्र पहिले असता तर त्यात चार अवस्था असतात अंडी, अळ्या, प्यूपा आणि प्रौढ, एका वर्षात या किडीचे 10-12 पिढ्या तयार होतात आणि एक जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी अंदाजे 30-35 दिवस लागतात. यामध्ये प्रौढ पतंग तपकिरी रंगाचे असून पानांवर पिवळी अंडी घालतात. त्या अंड्यातून 4-5 दिवसांत अळी बाहेर पडते आणि हि आली 13-15 दिवसांनी प्युपा अवस्थेत जाते. त्यानंतर या प्युपा अवस्थेतून 9-11 दिवसांत प्रौढ(पतंग)बाहेर पडतो आणि नंतर हा पतंग पानांवर अंडी घालतो.अशा पद्धतीने नागअळीचे जीवनचक्र पूर्ण होते. 


नागअळीचे लक्षणे जाणून घेऊयात - 

खालील पॉईंट मध्ये Tomato leafminer चे लक्षणे दिलेली आहेत. 

1. नागअळी पानांच्या वरील पृष्ठभाग मध्ये सापाप्रमाणे फिरत आपला उदरनिर्वाह करते जसे जसे अळी पुढे खात जाते तसे तसे  पाठीमागचा भाग धाग्यासारखा  पांढऱ्या रंगाचा दिसतो. 

2. ज्या पानावर प्रादुर्भाव झाला आहे त्या पानावर काळी  विष्टा सुद्धा दिसते तसेच ते पण नंतर पूर्णपणे वाळले जाते.

3. आपण  पान किंवा फळ कापून तपासले असता आत मध्ये पिवळ्या रंगाची अळी दिसून येईल तसेच फळा वरती सुद्धा ३ ते ४ प्रकारची छोटी छोटी ज्वारीच्या दाण्याच्या आकारासारखी ओल किंवा छिद्र दिसतील.


खालील मुद्द्यांमध्ये टोमॅटो नागअळीचे  एकात्मिक नियंत्रण जाणून घ्या -

1. जमिनीची खोल नांगरणी करावी म्हणजे जमिनीत राहणारे कोष उन्हाने मारून जातील. 

2. नागरलेली जमीन २ ते ३ महिने चांगल्या सूर्यप्रकाशात तापवून द्यावी. 

3. ट्युटा नागआळी प्रतिरोधक व्हरायटीची किंवा वाणाची निवड करावी.

4. टोमॅटो नागअळी नियंत्रणासाठी १० ते १५ ट्युटा एब्सोल्युटा ल्यूर आणि डेल्टा ट्रॅप प्रति एकरी लावावे. 

5. प्रादुर्भाव ग्रस्त पाने तोडून एका जागेवर जमा करून जाळून टाकावी. 

6. अळीने खाल्लेली फळे प्लॉटमध्ये ठेवू नका. ही फळे प्लॉट बाहेर काढा आणि जमिनीखाली खड्ड्यात गाडून टाका. 

7. बेसल डोस टाकत असताना त्याबरोबर निंबोळी पेंडचा २०० किलो प्रति एकरी वापर करावा. 

8. खाली दिलेला चार्ट control of leaf miner in tomato काही शिफारस केलेल्या औषधांची माहिती दिलेली आहे. 

उत्पादन आणि कंपनी

15 लिटर पाण्यासाठी

नीम तेल (आयएफसी)

30 मिली / 15 लिटर पाणी

बेनेव्हिया (आयएफसी)

30 मिली/15 लिटर

कोराजन (एफएमसी)

6 मिली/15 लिटर

ग्रासिया (गोदरेज)

15 मिली / 15 लिटर


टीप: औषधाची फवारणी नागअळीच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.


Conclusion / सारांश -

शेतकरी मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या  भारतअॅग्री कृषी दुकान वेबसाईटला भेट द्या. पुढच्या वेळी एका नवीन विषय आणि माहितीसह नक्की भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न । FAQ 


1. टोमॅटोमध्ये टूटा ऍब्सोल्युटा कसे नियंत्रित करावे?

उत्तर - नागअळी नियंत्रणासाठी ग्रासिया 15 मिली / 15 लिटर पंप साठी फवारणी करावी. 

2. नागअळी साठी कोणते ट्रॅप लावले पाहिजे?

उत्तर - नागअळी साठी 10 ते 15 टूटा ऍब्सोल्युटा ल्यूर आणि डेल्टा ट्रॅप प्रति एकरी लावावे.

3. टोमॅटो टुटा नागअळी वैज्ञानिक नाव काय आहे?

उत्तर - टोमॅटो टूटा नागअळी वैज्ञानिक नाव फथोरिमा एब्सोल्यूटा आहे. 

4. नागअळीचा सर्वात जास्त प्रादुर्भाव कोणत्या महिन्यात दिसून येते?

उत्तर - नागअळीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सर्वात अधिक दिसून येतो. 


हे पण एकदा वाचा । FAQ 

1. kothimbir lagwad: कोथिंबीर लागवड कशी करावी A to Z माहिती

2. ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन

3. स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. कुसुम सोलर पंप योजना 2024 ची संपूर्ण माहिती



लेखक - 

भारतअग्रि कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी