sugarcane herbicide uses

sugarcane herbicide: ऊस तणनाशक फवारणीबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतअग्रि कृषी दुकान वेबसाईटवर आपले स्वागत आहे.आज आपण ऊस तणनाशक या बद्दल संपूर्ण माहिती पाहाणार आहोत. या लेखा मध्ये आपण 

महाराष्ट्रामध्ये तणांमुळे सरासरी 35 ते 40 % इतक्या मोठ्या प्रमाणात पीकच्या  उत्पादनात घट येते. तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे. परंतु, मजुरांची कमतरता व मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्न शेतकऱ्यांना खिशाला फटका देणारा आहे. sugarcane weed पहिले असता हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, आणि केना ही एकदल पानांची गतवर्गीय तणे आणि घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, आणि गोखरू ही द्विदल पानांची गवतवर्गीय तणे आढळतात.


ऊस तणनाशक फवारणी ।sugarcane herbicide -

1. लागवडी नंतर 4  दिवसांनी पहिले असता - 

👉मेट्रीब्युझीन ७०% डब्ल्यू.पी हा घटक असलेले एक सिलेक्टिव स्पर्शजन्य व आंतरप्रवाही पद्धतीने काम करणारे ट्रियाझिनॉन वर्गातील तणनाशक आहे. 

👉हे टाटा मेट्री, सेंकोर या नावाने मार्केट मध्ये मिळते. 

👉याचा 600 ग्रॅम / एकर डोस आहे. 


2. लागवडी नंतर 35 ते 40 दिवसांनी पहिले असता - 

👉2,4-डी अमाइन सॉल्ट 58% SL हे फेनोक्सायसेटिक गटाची निवडक, आंतरप्रवाही तणनाशक आहे. 

👉हे आपल्याला मार्केट मध्ये वीडमार सुपर, सीनियर या नांवाने मिळते. 

👉याचा एकरी डोस 1 लिटर आहे . 

👉2,4-डी अमाइन सॉल्ट 58% SL हे मेट्रीब्युझीन ७०% डब्ल्यू.पी मध्ये मिक्स केल्यास रिजल्ट येतो. 

👉डोस बघितल्या असल्यास - मेट्रीब्युझीन ७०% डब्ल्यू.पी - 300 ग्रॅम + 2,4-डी अमाइन सॉल्ट 58% SL 1 लिटर प्रति एकरी फवारणी करावी. 

👉अमेट्रिन 80 % डब्ल्यूडीजी हे घटक असलेले अदामा तमर तणनाशक 1 किलो एकरी फवारणी करू शकता.

गवत आणि रुंद पाने असलेल्या तणांवर ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणून काम करते. 

👉2,4-डी सोडियम साल्ट 440 मेट्रीबुझिन 350 पायराझोसल्फुरॉन-इथिल 10 डब्ल्यूजी हे घटक असलेले तणनाशक यूपीएल त्रिस्केले या नावाने मिळते. 

👉त्रिस्केले हे आंतरप्रवाही म्हणुन काम करते याचा डोस 1.200 ग्रॅम /एकर आहे. 


खालील चार्ट मध्ये ऊस तणनाशक औषध नावे दिलेली आहेत -

घटक /कंटेन्ट 

तणनाशक नाव 

२,४-डी अमाइन साल्ट 58 % एसएल

सीनियर, वीडमार सुपर, अतुल ज़ुरा 

2,4-डी सोडियम साल्ट 80% डब्ल्यूपी

वीडमार 

मेट्रिबुज़िन 70% डब्ल्यूपी 

अदामा मेट्रिआगन, बायर सेन्कोर, क्रॉप केअर मेटाकेयर, इंदोरामा शक्तिमान मेट्रिमैन

टाटा रॅलिस टाटा मेट्री,धानुका बॅरियर

मेसोट्रिओन 2.27% + ॲट्राझिन 22.7% एससी 

सिंजेंटा कैलारिस एक्स्ट्रा

अमेट्रीन 80% डब्ल्यूडीजी 

अदमा तमर, बेस्ट ॲग्रोलाइफ अमिटो

टोप्रामेज़ोन जी/एल + एट्राज़िन 300 एससी

बीएएसएफ वेसनिट कंप्लीट 

2,4-डी सोडियम साल्ट 440 मेट्रीबुझिन 350 पायराझोसल्फुरॉन-इथिल 10 डब्ल्यूजी

यूपीएल त्रिस्केले

सल्फेंट्राझोन 28 %+ क्लोमाझोन 30 % डब्ल्यूपी

एफएमसी अथॉरिटी® एनएक्सटी 

हेलोसल्फ्यूरॉन मिथाइल 75% डब्ल्यूजी

धानुका सेम्प्रा, गोदरेज ब्लॉक्सिट . 

 

तणनाशके फवारताना खालील गोष्टीं कडे लक्ष द्या -

1. तणनाशकाचा वापर करताना शिफारशीनुसार व वेळेवर वापर करावा. 

2. तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे. संपूर्ण क्षेत्रावर तणनाशक एकसारखे फवारावे..

3. तणनाशकाची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी. 

4. तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये. 

5. तणनाशकची  फवारणी करताना हुडीचा वापर करा.

6. अदामा तमर हे -10001, 8005 या जातीच्या उसामध्ये फवारणी करता येत नाही. 

 

Conclusion / सारांश

शेतकरी मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या  भारतअॅग्री कृषी दुकान वेबसाईटला भेट द्या. पुढच्या वेळी एका नवीन विषय आणि माहितीसह नक्की भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न । FAQ 


1. उसासाठी सर्वोत्तम तणनाशक कोणते आहे?

उत्तर - यूपीएल त्रिस्केले सर्वोत्तम तणनाशक आहे. 

2. तणनाशक सेम्प्रा कशासाठी वापरला जातो?

उत्तर - सेम्प्रा तणनाशक लव्हाळा तणासाठी वापरतात. 

3. उसासाठी कोणते तणनाशक चांगले आहे?

उत्तर - सिंजेंटा कैलारिस एक्स्ट्रा, वीडमार सुपर, टाटा मेट्री आणि अदमा तमर चांगले आहे 

4. उसावर ॲट्राझीनची फवारणी करता येईल का?

उत्तर - हो, करता येते. 

5. तमरचा  डोस काय आहे?

उत्तर - 1 किलो / एकर फवारणी. 


हे पण एकदा वाचा । FAQ 

1. poultry manure: कोंबडी खत - घटक, वापर, किंमत आणि फायदे

2. conika fungicide: कोनिका बुरशीनाशक A to Z माहिती

3. sucking pest: असे करा भाजीपाला पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण

4. cultar syngenta: सिंजेन्टा कल्टर उपयोग, फायदे आणि किंमत

5. sencor herbicide: सेन्कोर तन नाशकची A to Z माहिती



लेखक - 

भारतअग्रि कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी