soybean tan nashak fawarni

सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. सोयाबीन हे खरिफ हंगामधील प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रामध्ये सोयबीनची लागवड मराठवाडा विभागामध्ये जास्त प्रमाणामध्ये होते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये लागवडी खालील क्षेत्र कमी आहे. सोयाबीन पिकाची लागवड करताना बियाणे, पेरणीमधील अंतर, खत - पाणी व कीड - रोग व्यवस्थापन या बाबींव्यतिरिक्त तण व्यवस्थापन  soybean tan nashak हा महत्वाचा मुद्दा आहे. तण व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्यास मुख्य पिकामध्ये आणि तनामध्ये हवा, अन्नद्रव्ये,सूर्यप्रकाश, जागा इ. मध्ये प्रतिस्पर्धा तयार होते परिणामी उत्पादनामध्ये घट येते म्हणूनच योग्य वेळी योग्य पद्धतीने तण नियंत्रण soybean herbicide करणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात सोयाबीन तन नाशक माहिती best herbicide for soybean बद्दल. 


सोयाबीन पिकामध्ये दोन पद्धतीने तण नियंत्रण करता येते. । सोयाबीन तन नाशक औषध

अ. उगवणीपूर्व सोयाबीन तन नाशक

ब. उगवणींनंतर सोयाबीन तन नाशक  


अ. उगवणीपूर्व तणनाशक । pre emergence herbicide for soybean -

उगवणीपूर्वचे तणनाशक हे पेरणीनंतर ४८ तासाच्या आता फवारणी करणे गरजेचे आहे. तणनाशक फवारणी करताना बियाणे हे मातीमध्ये झाकलेले असावे तसेच जमीन ओलसर असावी. 


1. पेंडिमेथालिन 38.7% CS 

व्यापारी नाव - दोस्त सुपर (यु.पी.एल.), धनुटोप सुपर (धानुका)

प्रमाण - 700 मिली प्रति एकरी 

कधी वापरावे - पेरणीनंतर 48 तासाच्या आता

2. डायक्लोसुलाम 84% WDG

व्यापारी नाव - स्ट्रॉंग आर्म (कोर्टेवा एग्रीसाइंस)

प्रमाण - 12.4 ग्राम प्रति एकरी 

कधी वापरावे - पेरणीनंतर 48 तासाच्या आता

3. पेंडीमेथिलिन 30% + इमाझेथापीर 2% EC

व्यापारी नाव -  वेलर 32 (सिजेंटा) 

प्रमाण -  1 लिटर प्रति एकर 

कधी वापरावे - पेरणी नंतर लगेच किंवा 72 तासाच्या आत.

4. सुलफेंट्रझोन 28 % + क्लोमेझॉन 30 % WP 

व्यापारी नाव -  ऑथॉरिटी नेक्स्ट (FMC) 

प्रमाण -  500 ग्राम प्रति एकर 

कधी वापरावे - पेरणीनंतर लगेचच किंवा पेरणीनंतर 48 तासाच्या आत. 


ब. उगवणींनंतर तणनाशक -

उगवणींनंतरचे तणनाशक हे तण 3 ते 4 पानाचे असताना म्हणजेच पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी फवारणी करावी . 


1. प्रोपॅक्वीझ्याफोप 10% EC 

व्यापारी नाव - अजिल (आदामा) 

प्रमाण - 300 मिली प्रति एकरी  

कधी वापरावे - तण 3 ते 4 पानांचे असताना किंवा पीक 20 दिवसांचे असताना. 

2. फ्लूझीफोप पी बूटील 

व्यापारी नाव - फूजीफ्लेक्स (सिजेंटा) 

प्रमाण - 400 मिली प्रति एकरी  

कधी वापरावे - तण 3 ते 4 पानांचे असताना. 

3. इमेजेथापायर 35% + इमाज़मॉक्स 35% डब्ल्यूजी

व्यापारी नाव - ओडिसी (बी ए एस एफ)  

प्रमाण - 40 ग्राम प्रति एकरी  

कधी वापरावे - तण 3 ते 4 पानांचे असताना किंवा पीक 20 दिवसांचे असताना. 

4. प्रोपॅक्यूझाफॉप 2.5 % + इमेझाथापर 3.75 % E.C.

व्यापारी नाव - शाकेड  (आदामा) 

प्रमाण - 800 मिली  प्रति एकरी  

कधी वापरावे - तण 3 ते 4 पानांचे असताना किंवा पीक 20 दिवसांचे असताना. 

5. इमेझाथापर 10 % SL 

व्यापारी नाव - परसूट (बी ए एस एफ)

प्रमाण - 400 मिली  प्रति एकरी  

कधी वापरावे - तण 3 ते 4 पानांचे असताना किंवा पीक 20 दिवसांचे असताना. 


तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी 

1. ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना फवारणी करू नये. 

2. वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणीपूर्वी फवारणी करावी. स्वच्छ पाणी वापरावे. 

3. जमिनीवर फवारावयाचे तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित जमिनीवर फवारावे. 

4. तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणांपर्यंत पोचू शकत नाही. पर्यायाने पूर्णपणे नियंत्रण होत नाही. 

5. उगवणीपूर्व फवारणी पेरणीदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये. उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी. 

6. फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल. असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते. त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा जात नाही. 

7. फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.


Conclusion | सारांश -

सोयाबीन पिकातील तन नियंत्रण करताना उगवणीपूर्व आणि उगवणीनंतर काही निवडक तणनाशक वापरल्यास तणांचे नियंत्रण होऊन उत्पादनामध्ये २० - २५ % पर्यंत वाढ होते. आशा करतो की Bharatagri krsuhi Dukan वेबसाइट वरील आमचा आजचा “जाणून घ्या सोयाबीन पिकामध्ये कोणते तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?” हा लेख तुम्हाला आवडला असेल तर याला तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.


FAQ । सतत विचारले जाणारे प्रश्न -

1. उगवणीपूर्व तणनाशक कधी वापरावे?

उत्तर - उगवणीपूर्व तणनाशक हे पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत वापरावे. 

2. उगवणीपूर्व तणनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी?

उत्तर - उगवणीपूर्व तणनाशक फवारणी करताना जमीन ओली असावी तसेच जमीन हि ढेकळे विरहित असावी. 

3. उगवणीनंतरचे तणनाशक कधी वापरावे?

उत्तर - उगवणीनंतरचे तणनाशक तण हे 2 ते 3 पानांचे म्हणजेच पेरणीनंतर 20 दिवसांनी फवारणी करावी. 

4. तणनाशकाची फवारणी करताना कोणता नोझल वापरला पाहिजे? 

उत्तर - फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल. असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते. त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा जात नाही. 

5. तणनाशकांमध्ये कीडनाशक किंवा बुरशीनाशक मिसळावे का?

उत्तर - नाही, तणनाशकांमध्ये इतर कोणतेही रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशक मिसळू नये. 
लेखक,

भारतअ‍ॅग्री कृषि एक्स्पर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी