score syngenta

score syngenta: स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण सिजेंटा स्कोर बुरशीनाशका (score syngenta)बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आजकल कृषी उत्पादनात वाढ होऊन पिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उन्नत आणि प्रभावी बुरशीनाशकांचा वापर करणे महत्वाचं आहे. चला तर आज आपण या लेखात स्कोर बुरशीनाशकाची सुटसुटीत माहिती देणार आहोत. याचा उपयोग कसा करावा? आणि काय फायदे होतील ही सर्व माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

Score fungicide बद्दल थोडक्यात माहिती - 

स्कोर बूरशीनाशक हे पिकांच्या वनस्पतिजन्य आणि पुनरुत्पादन अवस्थेतील अनेक रोगांचे नियंत्रण करते. हे दीर्घ कालावधीसाठी कोणत्याही प्रकारच्या बुरशीच्या वाढीवर सतत नियंत्रण ठेवते. हे एक सुसंगत आणि विश्वासार्ह उत्पादन आहे जे सर्व परिस्थितीत वितरित करते.खालील चार्ट मध्ये आपण एकदम सुटसुटीत बुरशीनाशका बद्दल माहिती दिलेली आहे . 

प्रॉडक्ट चे नाव 

स्कोर 

रासायनिक संरचना 

डायफेनोकोनाझोल 25%ईसी  

कंपनी नाव 

सिजेंटा 

क्रियेची पद्धत

आंतरप्रवाही 

वापर 

फवारणी 

शिफारसीत पिके 

सफरचंद,मिरची, कांदा, जिरा, भुईमूग, भात डाळिंब, द्राक्ष 

नियंत्रित रोग

स्कॅब,टिक्का ,करपा,पावडरी मिल्ड्यू ,फळ सड,शीथ ब्लाइट,शेंडा मर ,अन्थ्रॅकनोज

सुसंगतता

किटकनाशक  आणि बुरशीनाशक 

प्रमाण 

150 -200 मिली / एकर 

किंमत 

250 /RS 1200 - 1300

मार्केट मधील उपलब्ध पॅकेज 

50 मिली, 100 मिली, 250 मिली, 500 मिली, 1 मिली .


खालील चार्ट मध्ये पिकानुसार  score syngenta uses & dose - 

पिकाचे नाव 

शिफारीत रोग 

मात्रा / एकर 

सफरचंद 

स्कॅब 

30 मिली 

मिरची

शेंडे मर ,फळ सड 

100 मिली 

कांदा 

जांभळा करपा 

200 मिली 

जिरा 

करपा ,पावडरी मिल्ड्यू 

100 मिली 

भात 

शीथ ब्लाइट

100 मिली 

डाळिंब 

फळ सड 

200 मिली 

द्राक्ष 

अँथ्रॅकनोज, पावडरी मिल्ड्यू  

60 मिली 

भुईमूग 

टिक्का ,तांबेरा 

200 मिली 


score fungicide syngenta चे फायदे - 

1. सिंजेंटा स्कोर फंगस रोगांच्या विस्तृत श्रेणीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते. 

2. पिकावरती फवारणी केल्यानंतर पिकाचे संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यात मदत होते.

3. हे बुरशीनाशक जवळ-जवळ सर्व रोगा काम करते उदारणार्थ स्कॅब,टिक्का ,करपा,भुरी,फळ सड,शीथ ब्लाइट,शेंडा मर ,अँथ्रॅकनोज. 

4. आंतरप्रवाही असल्यामुळे हे पिकावरती प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक दोन्ही पद्धतीने पिकांचे संरक्षण करते. 

5. रोगांपासून पिकांचे दीर्घकाळ संरक्षण करते. 


Conclusion / सारंश -

शेतकरी मित्रांनो, आमचा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतऍग्री कृषी दुकानाच्या वेबसाइटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ - 


1.स्कोर Syngenta चा उपयोग काय आहे? 

उत्तर -  स्कोर बुरशीनाशका चा उपयोग पिकावरील बुरशी च्या नियंत्रणासाठी आहे . 

2.स्कोर बुरशीनाशका मध्ये कोणते कंटेंट आहे?

उत्तर - डायफेनोकोनाझोल 25%ईसी. 

3.स्कोर बुरशीनाशकाचा 15 लिटर पंप साठी किती डोज आहे?

उत्तर - 15 - 20 मिलि / 15 लिटर पंप .

4.स्कोर बुरशीनाशक कोणत्या पिकासाठी वापरतात?

उत्तर - सफरचंद, मिरची, कांदा, जिरा, भुईमूग, भात डाळिंब आणि द्राक्ष या पिकासाठी शिफारशीत आहे.

5.स्कोर कोणत्या कंपनी चे बुरशीनाशक आहे?

उत्तर - स्कोर सिंजेंटा कंपनीचे बुरशीनाशक आहे. 


हे पण एकदा वाचा | People also read - 

1. biovita seaweed: बायोविटा टॉनिक ची संपूर्ण माहिती

2. unhali mug lagwad: उन्हाळी मूग लागवड संपूर्ण माहिती

3. sugarcane trash: ऊस पाचट व्यवस्थापन

4. isabion syngenta: फुलांची संख्या वाढवण्यासाठी मार्केट मधील 1 नंबर औषध

5. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापन


लेखक | Author

BharatAgri Krushi Doctor

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी