ratoon sugarcane

ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण ऊस पिकातील खोडवा नियोजनाबद्दल ratoon sugarcane सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात ऊस लागवडचे पूर्व हंगाम, सुरु, आडसाली असे तीन हंगाम आहेत. या तीनही हंगामात ऊस तुटून घेल्यानंतर त्या पासून खोडवा धरला जातो. खोडवा पीक घेणे शेतकरी आणि कारखाना या दोघांनाही आर्थिक दृष्ट्या फायदा करून देते. ऊस लागवडसाठी जेवढ लक्ष आपण देतो तेवढ लक्ष खोडवा उसाला दिल्यास, नक्की उत्पादन ऊस लागवडी ऊसापेक्षा खोडव्या ऊसाचे  मिळते.


खोडवा पिकाचे उत्पादन कमी येण्याची कारणे | Reasons behind low production in ratoon sugarcane -

1. १५ फेब्रुवारी नंतर खोडवा शक्यतो धरू नये .
ऊसाचे पाचट जाळणे. 

2. पाणी आणि खत नियोजन नसणे. 

3. कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव.  


खोडवा पीक घेण्याचे फायदे | Benefits of khodwa sugarcane -

1. खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करू शकते 

2. लागवड ,बेणेप्रक्रिया, मशागती वरील खर्च वाचतो, 

3. फुटवा लवकर येतो

4. पाचट आसल्यामुळे जैविक खत मिळते आणि तणांचा बंदोबस्त होतो .


खोडवा ऊस राखण्याची योग्य वेळ | Right time for ratoon sugarcane -

ऑक्टोबर पासून मे पर्यंत तोडणी चालते परंतु 15 फेब्रुवारी नंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास उत्पादनांत घट येते कारण फेब्रुवारी नंतरच्या अधिक तापमानामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि पाण्याचा ताण पडल्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते .


खोडवा पीक घेताना काय काळजी घ्यावी | Sugarcane ratoon crop management -

 

👉जाती - 

1. अधिक उत्पादनक्षम, रोग, किडींना कमी बळी पडणारी व फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची खोडव्यासाठी निवड करावी. 

2. उदा. को-86032, को-एम-265, को-8040, को-7219, को-8014, को-युएआय 9805 इ. जाती खोडव्यासाठी उत्तम.  


👉खोडवा पिकातील पाचट व्यवस्थापन - 

1. यंत्राच्या साहयाने पाचट बारीक करून घ्यावे किंवा सरीत दाबून द्यावे. 

2. एक हेक्टर मधून 8 ते 10 टन पाचट मिळते. या पाचट मध्ये - नत्र - 40 ते 50 किलो, स्फुरद - 20 ते 30 किलो, पालाश - 75 ते 100 किलो आणि सेंद्रिय कर्ब - 3 ते 4 किलोग्रॅम. पाचट कुजवण्यासाठी - युरिया - 80 किलो ,सिंगल सुपर फास्फेट - 100 किलो सम प्रमाणात पसरून पाणी घ्यावे. 

3. पाणी देण्याच्या अगोदर फास्ट डी - पाचट कुजवणारे जिवाणू 1 ते 2 लिटर प्रति एकरी पाचटावर फवारणी करावी. 


👉बडख्याची छाटणी व काळजी - 

1. बुडख्या वरील पाचट बाजूला ओळीत घ्यावे 

2. त्यामुळे बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून कोंब जोमदार फुटण्यास मदत होते 

3. जरी एकदा बुडखा मोठा राहिला असेल तर धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत किंवा यंत्राच्या साहयाने सुद्धा पाचट बारीक आणि बुडखे एकसमान कट करून घेऊ शकतो . 

4. छाटणी नंतर 15 ग्राम बाविस्टीन बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यावी. 


👉बगला फोडणे - 

1. ऊस लागणीवेळी मोकळी व सच्छिद्र असणारी जमीन घट्ट व टणक बनते. 

2. अशी घट्ट व टणक झालेली जमीन मोकळी करण्यासाठी सरीच्या बगला फोडणे गरजेचे असते. 

3. त्यामुळे हवा खेळती राहते, खोडव्याच्या नको असलेल्या मुळ्या तुटून जातात. 

4. नवीन मुळ्याची वाढ होते. 


👉खत व्यवस्थापन | Fertilizer management in ratoon sugarcane -

1. खोडवा उसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि हलके पाणी अतिशय महत्त्वाचे असते. 

2. त्यासाठी ऊस तुटल्यावर 15 दिवसांच्या आत फोडलेल्या बगलात एकूण शिफारशीच्या खतांपैकी एकरी 75 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फास्फेट व 50 किलो पोटॅश किंवा 100 किलो 10:26:26, 50 किलो युरियाची मात्रा सरीच्या बगलेत द्यावी.

3. खते माती आड करून पाणी द्यावे.

4. पहिल्या मात्रेनंतर 6 आठवड्यांनी युरियाची दुसरी मात्रा एकरी 75 किलो द्यावी.

5. उर्वरित मात्रा एकरी 100 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फास्फेट व 50 किलो पोटॅश किंवा 100 किलो 10:26:26 व 75 किलो युरियाची मात्रा भरणीवेळी द्यावी. 

6. ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास शिफारशीत मात्रेपैकी 60 टक्के स्फुरद जमिनीतून द्यावा. 

7. उरलेली सर्व मात्रा ठिबकमधून फर्टिगेशन तंत्राने द्यावी.


(टीप - दर 15 दिवसांनी एकरी 8 किलो मॅग्नेशियम सल्फेट व 250 ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार द्यावीत.)


👉पाणी नियोजन | Water management in ratoon sugarcane -

1. खोडवा व्यवस्थापनामध्ये ratoon management in sugarcane 26 ते 28 पाण्याचा फळ्या पुरेश्या आहे. 

2. आधुनिक तंत्रज्ञानामुळे 13 ते 15 पाण्यात ऊस निघतोकारण नवीन तंत्रज्ञान पाचट आच्छादनामुळे 40 ते 45 दिवस पीक पाण्याचा  तग दारू शकते. 

3. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होते. 

4. जास्तीचे क्षेत्र ओलिताखाली आणता येते. 


संजीवकांची फवारणी | Use of PGR in  ratoon sugarcane -

1. उसाची वाढ होत असताना संजीवकाची फवारणी केल्यास उसाच्या फुटव्यांमध्ये वाढ होते. 

2. उसाची लांबी आणि दोन पेऱ्यांमधील अंतर वाढते. 

3. उसामध्ये शक्यतो 6BA आणि जिब्रालिक ऍसिड या दोन संजीवकाचा जास्त वापर केला जातो. 

4. संजीवकांच्या फवारण्या कधी व किती प्रमाणात घ्यावा 

5. या साठी पुढील लिंक वर क्लिक करा - 6BA आणि जिब्रालिक ऍसिड


ऊस पक्वता व तोडणी - 

1. खोडवा पीक ratoon management in sugarcane 12 महिन्यात पक्व होते. 

2. ऊस तोडणी पूर्वी 12 ते 15 दिवस अगोदर पाणी देऊ नये, उसाची तोडणी जमिनी लागत करावी आणि तुटलेला ऊस २४ तासाचा आत ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात घट येत नाही. 

3. खोडवा ऊसाचे असेच नवीन तंत्रज्ञान वापरून नियोजन केल्यास 140 ते 150 टन उत्पादन निश्चित मिळते. 

4. खोडव्यात पाचट ठेवणे ही काळाची नितांत गरज आहे, हे एक शेतकऱ्या साठी वरदान ठरलेले आहे. 


Conclusions | सारांश -

ऊस पिकांमधील खोडवा नियोजन ratoon sugarcane केल्यास वेळ, मशागती साठी लागणारी मेहनत आणि पैसा वाचतो.  खोडव्याचे नियोजन करताना बुडखा छाटणी पासून ते संजीवकांची फवारणी खत, पाणी आणि कीड रोग नियोजन योग्य पद्धतीनं केल्यास नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होऊन चांगला आर्थिक नफा होऊ शकतो. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. खोडवा ऊस म्हणजे काय?

उत्तर - पहिल्या तोडणीनंतर नवीन बियाणे न वापरता वाढवलेले उसाचे पीक 

2. उसाचा खोडवा घेण्यासाठी उसाच्या कोणत्या जातीं उत्तम आहेत?

उत्तर- को-86032, को-एम-265, को-8040, को-7219, को-8014, को-युएआय 9805 इ. जाती खोडव्यासाठी उत्तम.  

3. उसाचा खोडवा कधी धरू नये?

उत्तर - १५ फेब्रुवारी नंतर खोडवा शक्यतो धरू नये . 

4. खोडवा उसाचे फुटवे वाढवण्यासाठी काय करावे?

उत्तर- खोडवा उसाचे फुटवे वाढवण्यासाठी 6BA आणि जिब्रालिक ऍसिड या संजीवकांचा फवारणी करावी. 


People also read | हे देखील वाचा - 


1. हायड्रोपोनिक चारा निर्मिती

2. ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रणलेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी