progibb sumitomo

progibb sumitomo: जिब्रेलिक एसिड 90% बद्दल संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतीमध्ये बदलत्या वातावरणामुळे पिकांच्या वाढीमध्ये खूप बदल होत असतात त्यामुळे पिकांमधील हा चढउत्तार कमी करण्यासाठी आपण बऱ्याच टॉनिक चा वापर करतो त्यामध्ये असे एक सुमिटोमो प्रोजिब या टॉनिक ओळख, याचा वापर पिकांमध्ये कसा करावा, याचे फायदे आणि वापरताना काय काळजी घ्यावी हे आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. 

 

सुमिटोमो प्रोजिब बद्दल थोडक्यात माहिती। Information About Sumitomo Progibb - 

सुमिटोमो प्रोजिब एक अत्यंत प्रभावी वनस्पती वाढ नियामक आहे ज्यामध्ये पावडर स्वरूपात Gibberellic acid 90% आहे. याचा उपयोग रोपांची वाढ आणि दर्जेदार उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो.

 

खालील चार्ट मध्ये सुमिटोमो प्रोजिब बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे -

नाव 

प्रोजिब

कंपनी 

सुमिटोमो केमिकल इंडिया प्रा. लि

कंटेन्ट 

जिब्रेलिक एसिड 90%

श्रेणी

वनस्पती वाढ प्रवर्तक (पीजीआर)

क्रियचे पद्धत 

आंतरप्रवाही 

शिफारशीत पिके

सर्व प्रकारची फळे, फुले आणि भाज्या.

फॉर्म्युलेशन 

वेटेबल पाउडर

वापरण्याची पद्धत 

फवारणी 

साधारण डोस 

2 ग्रॅम/ एकर 

सुसंगत 

इतर कीटकनाशके 


सुमिटोमो प्रोजिबचा वापर आणि डोस - 

खाली सुमिटोमो प्रोजिब जिब्रेलिक एसिड 90 % WSG विविध पिकांसाठी वापर आणि डोस दिला आहे. 

पीक

फवारणीची वेळ

डोस / 200 L पाणी प्रति एकर

सर्व भाज्या आणि फळ पिके

प्रथम फवारणी फुल येण्याअगोदर 

दुसरी फवारणी फळ सेटिंग काळात 

2 ग्रॅम प्रति एकर.

 

सुमिटोमो प्रोजिबचे फायदे - 

sumitomo progibb च्या फायद्यांचा सारांश येथे आहे. 

1. फळाचा दर्जा शेवट पर्यन्त राखला जातो.
2. तणावाच्या काळात झाडांची  वाढ राखण्यास मदत होते.
3. झाडाची उंची आणि उत्पादन वाढते.
4. फळांचा आकार, दृढता आणि गुणवत्ता वाढवते.
5. अधिक सुव्यवस्थित कापणीसाठी परिपक्वता विलंब करते.
6. फळांचा संच आणि उत्पन्न वाढवते.
7. द्राक्षांमध्ये, ते हवेचे परिसंचरण आणि प्रकाश प्रवेश वाढविण्यासाठी क्लस्टर्स लांब करते आणि सैल करते.
8. पातळ होण्याचा खर्च कमी करण्यासाठी बेरी सेट कमी करते.

 

sumitomo progibb फवारणी करताना काय काळजी घ्यावी?

खालील पॉईंट मध्ये progibb sumitomo चे वापरताना काय काळजी घेतली पाहिजे हे दिलेले आहे. 

1. अन्नपदार्थ, रिकामे खाद्यपदार्थाच्या वस्तु आणि प्राण्यांच्या चाऱ्यापासून दूर ठेवा.

2. तोंड, डोळे आणि त्वचेचा संपर्क टाळा.

3. धुके असताना फवारणी करू नये. 

4. वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. 

5. फवारणीनंतर दूषित कपडे चांगले स्वच्छ धुवा. 

6. फवारणी पूर्ण झाल्यानंतर शक्यतो साबण लावून स्वच्छ अंघोळ करावी. 


Conclusion / सारंश -

शेतकरी मित्रांनो, आमचा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतऍग्री कृषी दुकानाच्या वेबसाइटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ - 

 

1. progibb कसे वापरावे?

उत्तर - 2 ते 4 ग्रॅम प्रति एकरसाठी पिकांच्या अवस्थेनुसार 200 -300 लीटर पाण्याबरोबर फवारणी करता वापरावे. 

2. जिब्रेलिक ऍसिडचा वनस्पतींच्या वाढीवर कसा परिणाम होतो?

उत्तर - जिब्रेलिक ऍसिड पिकांच्या वाढीबरोबर फळांचा आकार, दृढता आणि गुणवत्ता वाढते. 

3. सुमिटोमो प्रोजिब किंमत (progibb sumitomo price) किती आहे?

उत्तर - साधारण 5 ग्रॅमची किंमत - 350 - 390RS आहे. 

4. सुमिटोमो प्रोजिब कंटेन्ट(progibb sumitomo technical) काय आहे?

उत्तर - सुमिटोमो प्रोजिब कंटेन्ट Gibberellic acid 90% WP हे आहे. 

5. sumitomo progibb कोणत्या पिकासाठी शिफारशीत आहे?

उत्तर - सर्व प्रकारची फळे, फुले आणि भाज्यासाठी शिफारसीत आहे. 


हे पण एकदा वाचा | People also read - 

sugarcane herbicide: ऊस तणनाशक फवारणीबद्दल संपूर्ण माहिती

असे करा🌱टोमॅटो पिकावरील करपा रोगाचे संपूर्ण नियंत्रण

हळद आणि 🌱 आदरक पिकातील कंदकुज नियंत्रण

हळद आणि आदरक पिकातील करपा🍃रोगाचे संपूर्ण नियंत्रण

कापूस पिकातील 🌱 रसशोषक किडीवरील रामबाण उपाय 🦟



लेखक | Author

BharatAgri Krushi Doctor

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी