🌱फ्लॉवर आणि कोबीमध्ये कीड व रोगांना 100% नियंत्रित करणाऱ्या फवारण्या👍

🌱फ्लॉवर आणि कोबीमध्ये कीड व रोगांना 100% नियंत्रित करणाऱ्या फवारण्या👍

 

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱फ्लॉवर आणि कोबीमध्ये कीड व रोगांना 100% नियंत्रित करणाऱ्या फवारण्या👍

कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते.ह्या दोन्ही पिकाच्या उत्पादनाकरिता त्यावर प्रामुख्याने येणा-या कीड व रोग व त्यांच्या नियंत्रणासाठी करावयाचे उपाय याबद्दल माहिती घेऊयात.

✅कोबी आणि फुलकोबी मधील प्रमुख किडी -

1. कटवर्म -
👉अळी लागवड केलेल्या रोपांना खालून कट करते यामुळे अधिक उत्पादन काढण्यासाठी लागणारी प्रति एकर रोपांची संख्या राखता येत नाही .
👉प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पेरणीपूर्वी कार्बोफुरोन 3% सीजी हे दाणेदार कीडनाशक 7 किलो/एकर जमिनीत मिसळावे.

2. तंबाखू अळी (स्पोडोप्टेरा लिटूरा) -
👉स्पोडोप्टेरा लिटूरा ही अळी तपकिरी ते गडद हिरव्या रंगाची असते आणि त्यांच्या शरीराच्या बाजूंना पट्टे असतात.
👉अळी पिकाची कोवळी पाने खाते, ज्यामुळे पाने पांढरी होतात. ह्या किडिंमुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते आणि परिणामी उत्पादनात घट येते.
👉तंबाखू अळीच्या (स्पोडोप्टेरा लिटूरा) नियंत्रणासाठी
इमामेक्टिन बेन्झोएट 5 % SG - 8 ग्राम
फ्लूबेंडामाइड 48% SC - ४ मिली
बेल्ट एक्स्पर्ट - ८ मिली
👉या कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

3. डायमंड बैक मोथ -
👉कोबी पिकातील गंभीर कीड. ते पृष्ठभागाच्या पानांच्या खाली अंडी घालतात. शरीरावर केस असलेल्या हिरव्या रंगाच्या अळ्या पाने खातात आणि छिद्र करतात. योग्य नियंत्रण उपायांचा अभाव असल्यास, यामुळे 80-90% पर्यंत नुकसान होते.
👉किडीच्या नियंत्रणासाठी 5 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.
ट्रेसर - 6 मिली
किफन 15 मिली
कोराजन - 5 मिली
👉या कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

4. मावा -
👉पानांचा रस शोषून घेतात परिणामी पाने पिवळी पडतात उत्पादनात घट येते.
👉पिवळे व निळे चिकट सापळे 25 प्रति एकरी लावावेत.
👉नियंत्रणासाठी -
अरेवा - ८ ग्राम
कॉन्फिडोर - ८ मिली
सुपर डी - ३० मिली
👉या कोणत्याही एका कीडनाशकाची प्रधुरभावानुसार प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

✅कोबी आणि फुलकोबी मधील प्रमुख रोग -

1. पानांवर येणारे ठिपके / करपा -
👉पानांवर लहान आकाराचे ठिपके येतात. हे ठिपके सुरुवातीला पिवळसर करड्या रंगाचे असतात. असे ठिपके 👉हळूहळू मोठे होत जातात व नंतर त्यांचा रंग काळपट पडतो.
👉नियंत्रणासाठी -
धानुस्टीन - 20 ग्राम
एम - 45 - 30 ग्राम
टाटा रैलिस मास्टर - 30 ग्राम
👉या कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

2. ब्लॅक रॉट / घाण्या रोग -
👉कोबीवर्गीय पिकांमधील हा एक घातक रोग आहे. रोपाच्या पानांच्या कडांवर इंग्रजीतील V आकाराचे ठिपके आलेले दिसतात. नंतर पान पिवळे पडण्यास सुरुवात होते व हळूहळू हे ठिपके झाडांवर इतरत्र पसरू लागतात.
👉रोपाच्या अन्नद्रव्य वाहिन्यांमध्ये या जिवाणूंची वाढ झाल्याने रोपाची पाने, खोड व मुळे काळी पडतात व रोगग्रस्त झाड सडून जाते.
👉नियंत्रणासाठी -
धानुकोप 30 ग्राम + स्ट्रेप्टोसाक्लीन 2 ग्राम
धानुकोप 30 ग्राम + कासू बी 30 मिली
👉या कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

3. डावनी मिल्ड्यू -
👉पानांच्या खालच्या बाजूस जांभळे-तपकिरी ठिपके आणि राखाडी पांढरा थर दिसून येतो.
👉नियंत्रणासाठी -
सिक्सर - 30 ग्राम
अवतार - 30 ग्राम
टाटा रैलिस मास्टर - 30 ग्राम
👉या कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी