onion farming

कांदा पिकाची लागवडी पासून काढणी पर्यंत A टू Z माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण कांदा पिकाची लागवड onion farming ते काढणी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये कांद्यासाठी आवश्यक जमीन, हवामान, पूर्वमशागत, कांदा लागवड हंगाम, कांद्याच्या जाती वाण, दर एकरी प्रमाण किती वापरायचे, लागवड कशी करायची, खत आणि पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत रोग व कीड व्यवस्थापन, उपाय, काढणीपश्‍चात व्यवस्थापन इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखांमध्ये आज मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्णपणे नक्की वाचा.


जमीन | Soil for onion farming -

पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी. जमिनीच्या सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा. भारी चिकणमाती असलेल्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या तसेच चोपण किंवा खारवट जमिनीत रोपांची वाढ खुंटते, पीक चांगले पोसत नाहीत, अशा जमिनीत लागवड करू नये.


हवामान | Climate - 

कांदा हिवाळी हंगामामध्ये पीक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची दोन ते तीन पिके घेतली जातात. कांदा लागवड पासून एक-दोन महिन्यांमध्ये हवामान थंड असणे गरजेचे आहे. कांदा मोठा व्हायला लागला की, तापमानातील वाढ कांद्यासाठी उपयुक्त ठरते.


पूर्वमशागत | Land preparation - 

कांदा पिकाच्या लागवडीसाठी onion farming जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी. आणि कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीतील ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये एकरी 10 ते 15 टन शेणखत मिसळावे. शेणखत मिसळताना त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश जिवाणू - 1 लिटर आणि ट्रायकोडर्मा 1 लिटर मिसळावे. 

 

कांदा लागवड हंगाम। kanda lagwad hangam - 

कांद्याची लागवड onion farming खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करतात.

 

सुधारीत वाण | Onion best variety - 

👉खरीप : फुले समर्थ, बसवंत 780, अ‍ॅग्रीफाऊंड डार्क रेड 

👉रांगडा : बसवंत 780, फुले समर्थ, एन-2-4-1 

👉उन्हाळी : एन.-2-4-1, ॲग्रीफाऊंड लाईट रेड, अर्का निकेतन


बियाणे प्रति एकरी | Onion seed rate - 

ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार केली तर एकरी 2 किलो बियाणे पुरते. नेहमीच्या पद्धतीमध्ये 3.5 किलो बी लागते.  


कांदा नर्सरी व्यवस्थापन | Onion nursery management - 

1. एक एकर कांदा लागवड साठी 5 गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते.

2. 4 X 1 मीटर लांब आणि 10-15 कमी उंचीचे बेड तयार करावेत. 5 गुंठा नर्सरी साठी 5 बेड तयार करावेत. 

3. दोन  बेडच्या मध्ये 60-70 सेमी अंतर ठेवावे. 

4. बेडचा पृष्ठभाग लेवल केलेला असावा. 

5. लागवडीपूर्वी बेड वर बाविस्टीन ची 1.5  ग्राम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.

6. प्रति 5 गुंठयासाठी 2 किलो युरिया + 7 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 1.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत द्यावे. 20 दिवसांनी पुन्हा 3 किलो युरिया द्यावा.  

7. बीज प्रक्रिया- लागवडीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा व्हीरीडे 5 मिली किंवा बाविस्टीन 2 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणे चोळावे. 

8. पेरणी- बियाणे 2-3 सेमी खोल खोचावे व मातीने झाकावे. बियाणे पेरणीनंतर लगेच तणनाशक पेंडीमिथॅलीन 1.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी व लगेच पाणी द्यावे. 

9. रोपं 6 ते 7 आठवड्यात काढायला तयार होतील.


पुनर्लागवडीसाठी रानबांधणी | Land preparation for onion transplanting - 

वाफ्याची लांबी-रुंदी जमिनीच्या उतारावर अवलंबून असते.1.5 ते 2 मीटर रुंद आणि 4 ते 6 मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करावेत. वाफ्याची लांबी जमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने असावी. जमीन जास्त चढ-उताराची असल्यास 1.5 बाय 3 मीटर आकाराचे लहान वाफे तयार करावेत. ठिबक व तुषार सिंचन या पद्धतीने पाणी देण्यासाठी रान बांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते. 120 सें.मी. रुंद, 40 ते 61 मीटर लांब आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत.


रोपांवर बुरशीनाशक आणि कीडनाशकाची प्रक्रिया | Onion seedling treatment - 

बाविस्टीन 1 ग्रॅम + कॉन्फिडोर 0.5 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे 15 मिनिटे बुडवावीत. यामुळे लागवडीनंतर 20 ते 25 दिवस किडींपासून संरक्षण होते.


पुनर्लागवड | Onion transplanting - 

खरीप हंगामात 10 सें.मी. बाय 15 सें.मी. आणि रब्बी हंगामात 10 सें.मी. बाय 10 सें.मी. किंवा 10 सें.मी. बाय 15 सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी. रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबू नयेत, यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो. ठिबक किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच रोप लागवडीअगोदर सुरू करावा.  सरासरी चार सें.मी. खोलीपर्यंत ओल राहील इतपत पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफ्यावर लागवड करून त्यानंतर पाणी द्यावे.


रासायनिक खते | Onion fertilizer management - 

शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत एकरी 40 किलो नत्र, 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश पैकी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मातीमध्ये मिसळून द्यावे. राहिलेले  नत्र 30 व 45 दिवसांनी एक खुरपणी करून द्यावे. या खतांसोबतच मायक्रोनुट्रीएंट 10 किलो आणि सल्फर 8 किलो प्रति एकरी वापर करावा. साठ दिवसांनंतर कांदा पिकास कोणतेही वर खत देऊ नये.


तण नियंत्रण | Onion weed control - 

कांदा रोपलागवडीनंतर 25 दिवसांनी धानुका वनकिल (क्विज़ालोफॉप एथिल ४% + ऑक्सीफ्लोरफेन ६% ईसी) 40 मिली + चिलेटेड झिंक 15 प्रतेि 15 लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करावी.  त्यानंतर 45 दिवसांनी एक खुरपणी करावी.


पाणी व्यवस्थापन | Onion water management - 

कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. काढणीपूर्वी 3 आठवडयां अगोदर पाणी बंद करावे म्‍हणजे पानातील रस कांद्यामध्‍ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होतो.


रोग कीड व्यवस्थापन | Onion pest & disease management - 

1. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी -

👉एम-45 (मैनकोजेब 75 % डब्ल्यूपी) - 30 ग्राम 

👉साफ (कार्बेन्डाजिम 12% + मॅंकोझेब 63% डब्ल्यूपी) - 30 ग्राम 

👉अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68% डब्ल्यूपी) - 30 ग्राम 

👉गोडिवा सुपर (एज़ोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनेकोनाज़ोल 11.4% एससी) - 15 मिली 

👉या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.


2. थ्रिप्स आणि रसशोषक किडींसाठी -

👉अरेवा (थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी) - 8 ग्राम 

👉जैपैक थियामेथोक्सम 12.6% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 9.5% झेड.सी.) - 8 मिली 

👉कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल) - 8 मिली 

👉फैक्स (फिप्रोनिल 5% एससी) - 30 मिली 

👉या पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.


काढणी आणि उत्पादन | Onion harvesting & yield - 

1. कांदयाचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्‍यात काढणीस तयार होते.
2. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते.
3. यालाच मान मोडणे असे म्‍हणतात. 60 ते 75 टक्‍के माना मोडल्‍यावर कांदा काढणीस पक्‍व झाला असे समजावे.
4. कुदळीच्‍या साहाय्याने आजूबाजूची जमिनी सैल करून कांदे उपटून काढावेत. काढणीनंतर 4,5 दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगाऱ्याच्‍या रूपाने ठेवावा.
5. नंतर कांद्याची पात व मुळे कापावे. पात कापताना 3 ते 4 सेमी लांबीचा देठ ठेवून पात कापावी.
6. यानंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत सुकवावा. एकरी उत्‍पादन 150 ते 200 क्विंटल मिळते.


सारांश | Conclusion - 

कांदा पिकामध्ये रोपवाटिकेपासून ते काढणी पर्यंत योग्य पद्धतीने खत-पाणी नियोजन, कीड रोग व्यवस्थापन करताना थ्रिप्स आणि करपा या रोगाचे नियंत्रण योग्य पद्धतीने झाल्यास कांदा पिकाची आवश्यक वाढ होऊन 200 क्विंटल पर्यंत उप्तादन मिळते. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. कांदा लागवडीसाठी जमीन  कशी असावी?

उत्तर - पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी. जमिनीच्या सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा. 

2. कांदा पिकाची लागवड कधी करावी?

उत्तर  -  कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करावी. 

3. कांदा लागवडीसाठी एकरी किती बियाणे वापरावे?

उत्तर - ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार केली तर एकरी 2 किलो बियाणे पुरते. नेहमीच्या पद्धतीमध्ये 3.5 किलो बी लागते.  

4. कांद्याची रोपे लागवड करण्याआधी कोणत्या औषधाची प्रक्रिया करावी ?

उत्तर - बाविस्टीन 1 ग्रॅम + कॉन्फिडोर 0.5 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे 15 मिनिटे बुडवावीत. 

5. कांदा पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे?

उत्तर - कांदा रोपलागवडीनंतर 25 दिवसांनी धानुका वनकिल (क्विज़ालोफॉप एथिल ४% + ऑक्सीफ्लोरफेन ६% ईसी) 40 मिली + चिलेटेड झिंक 15 प्रतेि 15 लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करावी.   


People also read | हे देखील वाचा - 

1. कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस

2. कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदेलेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी