millipede insect

वाणी/पैसा कीड (millipede insect) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे.  या लेखामध आपण पैसा कीड नियंत्रण कसे करावे या बद्दल जाणून घेणार आहोत.  खरिफ हंगामाची सुरुवात झाल्यानंतर गोगलगाई आणि पैसा कीडचा millipede insect प्रधुरभाव होतो. पैसा किडीलाच वाणी wani kida  किंवा  तेलंगी अळी अशा विविध नावांनी ओळखलं जात. हि कीड शेतीमधील कापूस, सोयाबीन, उडीद, तूर, मूग या पिकाचे नुकसान करते. कापूस तसेच सोयाबीन पिकाची पेरणी झाली कि ह्या किडीचा प्रधुरभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. 


किडीची ओळख : -

कीड दंडगोलाकार व लांबोळकी असून तिला 36 ते 400 पाय असतात. तिचा रंग काळपट black millipede लालसर red millipede असून तोंडावर दोन स्पर्शिका असतात. या किडीची मादी एका वेळेस 10 ते 300 अंडी ओलसर जागेवर घालते. वाणी कीड बहुभक्षी तसेच समूहाने आढळणारी कीड आहे.


नुकसानीचा प्रकार : -

पेरणीनंतर तुरळक जसे 200 ते 250 मिमी पेक्षा कमी पाऊस, रोपावस्थेत पावसाची दीर्घ काळ उघडीप व जमिनीला भेगा पडल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. हि कीड निशाचर असुन सामान्यतः सडणारी पाने, कुजलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती खातात. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारी आहे. परंतु जेव्हा ते असंख्य होतात तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे जसे कापूस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापून टाकतात कालांतराने रोपावर जाउन पाने कुरतडतात.


पैसा / तेलंगी अळी / वाणी कीड नियंत्रण  । wani kida । millipede insect 

1. चांगला पाऊस झाल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते.

2. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी दिर्घ मुदतीचा उपाय म्हणजे शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करुन बांधावरिल गवत, दगड, जमिनीवर ठेवलेल्या वस्तू काढाव्यात.

3. शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले पदार्थ गोळा करुन नष्ट करावेत.

ब-याचदा आर्द्र, घनदाट पिकात जास्त पाणी दिल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास

4. किडीचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे पिकात पाणी साचू देऊ नये. 

5. रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली एकत्र आलेल्या पैसे किडी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत.

6. जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच किडी मरतात.

7. शेतक-यांनी पेरणीपुर्वी बियाण्याला बिजप्रक्रीया केली आहे तेथे प्रादुर्भाव कमी आढळतो. 

8. पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी उघडया पडून नष्ट होतील.


रासायनिक नियंत्रण : -

1. किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के एसपी) 2 मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. 

2. कार्बोफुरोन  (3 टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (0.6 टक्के) 4 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरावे. 

3. आमिष सापळ्यांचा वापर करावा त्यामध्ये गहू पीठ दिड कप + मध दोन चमचे + कार्बोसल्फान 50 मिली + पाणी अर्धा कप प्रमाणात मिश्रण करावे. मिश्रणाच्या गोळ्या करून पोत्याच्या तुकड्यामध्ये बांधून जमिनीत 15 ते 20 ठिकाणी 4 ते 6 इंच खोल गाडाव्यात.

4. फेनवलरेट किंवा क्लोरोपायरीफॉस डस्ट ची 10 किलो प्रति एकर याप्रमाणे धुरळणी करावी. 

5. थायोडिकार्ब 75% WP घटक असणारे लार्वीन कीटकनाशक 250 ग्रॅम प्रति एकर अधिक 2 ते 3 किलो धान्याचा कोंडा/ लाकडाचा भुसा/कोरडे शेणखत/लाह्या/ मुरमुरे यामध्ये मिसळून प्रादुर्भावग्रस्त प्लॉट मध्ये पसरून द्याव्यात. 

6. वरील पैकी कोणतीही एक उपाययोजना करून वाणी किडीपासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मदत होईल. 


Conclusion | सारांश -

खरिफ हंगामध्ये सोयाबीन, कापूस इ पिके उगवून आल्यानंतर त्याचे पैसा / वाणी कीड नुकसान करते. कि कीड मोठ्या झाडांना नुकसान करत नाही. दाणेदार कीडनाशक खतासोबत किंवा शेणखतासोबत देऊन किडीचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करू शकतो. आशा करतो की Bharatagri krsuhi Dukan वेबसाइट वरील आमचा आजचा “वाणी / पैसा कीड उपाययोजना आणि नियंत्रण ( wani kida )” हा लेख तुम्हाला आवडला असेल तर याला तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.


FAQ । सतत विचारले जाणारे प्रश्न -


1. पैसा किंवा वाणी कीड कशी ओळखावी ?

उत्तर - कीड दंडगोलाकार व लांबोळकी असून तिला 36 ते 400 पाय असतात. तिचा रंग काळपट लालसर असून तोंडावर दोन स्पर्शिका असतात. तिला हात लावल्यास त्या गोलाकार होतात. 

2. कीड पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये नुकसान करते ?

उत्तर - पिकाच्या रोप अवस्थेमध्ये हि कीड नुकसान करते. 

3. कीड कोणत्या पिकाचे जास्त नुकसान करते ?

उत्तर - कीड शेतीमधील कापूस, सोयाबीन, उडीद, तूर, मूग या पिकाचे नुकसान करते. 

4. किडीचे प्रतिबंधात्मक नियंत्रण कसे करावे ?

कार्बोफुरोन  (3 टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (0.6 टक्के) 4 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरावे. 

5. कीड विषारी आहे का ?

उत्तर - कीड विषारी नाही. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारी आहे. 



लेखक

भारतअ‍ॅग्री कृषि एक्स्पर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी