know about Onion Chaal

कांदा चाळ कशी बनवावी | kanda chal structure

शेतकरी मित्रानो, महाराष्ट्रामध्ये कांद्याचे उत्पादन नाशिक,पुणे, अहमदनगर, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर काही जिल्यांमध्ये होते. एकूण कांदा उत्पादनापैकी खरीप मध्ये ६० % व रब्बी आणि उन्हाळी मध्ये ४० % उत्पादन होते. कांद्याचे जास्त उत्पादन झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याच्या सोई नसल्यामुळे असेल त्या भावात कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय नसतो. ह्या समस्येवर एकाच उपाय म्हणजेच कांदा चाळ

कांद्याची साठवणूक का गरजेची आहे. 

 काद्याची साठवण योग्य प्रकारे न केल्यास 45-60 टक्क्यांपर्यंत त्याचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान वजनातील घट, कांद्याची सड होणे व कोंब येणे इ. कांद्याची आधुनिक पध्दतीने साठवण केल्यास पूर्णपणे नुकसान टळेल असे नाही पण 15 ते 20 टक्क्यांपर्यंत नुकसान टाळू शकते. कारण कांदाचाळीत 4-5 महिन्यापर्यंत कांदा सुस्थितीत राहू शकतो. जेव्हा पावसाळ्यात कांदा पिकास जास्त भाव असतो तेव्हा कांदा विकून जास्तीत जास्त नफा आपण मिळवू शकतो. 

आधुनिक पद्धतीने कांदा चाळ जर तुम्हाला बनवायची असेल तर राज्याच्या कृषी विभागाकडून त्यासाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्याला कृषी विभागाकडे रीतसर अर्ज करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊयात कांदा चाळ कशी बनवावी

पूर्वनियोजन 

  1. कांदा चाळीसाठी उंचावरील किंवा जेथे पाणी साठणार नाही अशीच जागा निवडावी. 
  2. चाळीची लांबी ही नेहमी दक्षिणोत्तरच असावी.
  3. कांदा चाळीच्या वर-खाली तसेच दोन्ही बाजूंनी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
  4. कांदा चाळीच्या आजूबाजूला वारा अडवणारे कोणतेही बांधकाम नसावे.
  5. थंड तापमानात कांद्याचा साठवण काळ वाढतो, यासाठी झाडांची सावली असेल तर फायद्याचे ठरते.

चाळ बांधणी । kanda chal structure । कांदा चाळ आराखडा

  1. कांदा चाळीचा पाया हा जमिनीपासून १.५ ते २ फूट उंच ठेवावा. यासाठी सिमेंटचे किंवा लोखंडाचे १.५ ते २ फूट उंचीचे कांदा चाळीचा भार पेलू शकणारे खांब समान अंतरावर उभारावेत, त्यावर कांदाचाळ बांधावी.
  2. पंचवीस मे. टन क्षमतेसाठी १२ मीटर लांब व ३.६० मीटर रुंद या आकाराची चाळ असावी.
  3. कांदा चाळीचे ३.६० मीटर रुंदीचे १.२० मीटरचे तीन समान भाग करावेत. कडेच्या दोन्ही भागांमध्ये कांद्याची साठवण करावी व मधला भाग हवा खेळती राहण्यासाठी रिकामाच ठेवावा.
  4. चार समान कप्पे - १२ मीटर लांबीचे ३ मीटरचे करावे. म्हणजेच दोन्ही बाजूंचे प्रत्येकी चार असे एकूण आठ कप्पे होतील, यामध्ये कांदे साठवावेत. 
  5. सिमेंट किंवा लोखंडी खांब किंवा लाकडी बांबू समान अंतरावर रोवावेत जेणेकरून छपराला आधार होईल 
  6. पायापासून १.८ मीटर एवढी चाळीची उंची असावी. त्यावर दोन्ही बाजूंना ०.८० - १.० मीटरचा उतार निघेल अशा प्रकारचे छप्पर टाकावे.
  7. छपरासाठी कौले सर्वांत उत्तम पण सिमेंटचे पत्रेहि  वापरू शकता.
  8. कडेच्या भिंती या बांबूच्या असाव्यात. भिंतीसाठी लोखंडाच्या जाळीचाही पर्याय होऊ शकतो.
  9. चाळीच्या दोन्ही भिंतीपासून एक मीटर बाहेरपर्यंत येईल एवढ्या रुंदीचे छप्पर असावे.
  10. उष्णतारोधक पदार्थ की उसाचे पाचट गव्हाचा कोंडा किंवा वाळलेले गवत यांचा छपरावर थर द्यावा.

महत्त्वाच्या सूचना -

  1. कांदा काढणी अगोदर जर पाऊस आला असेल तर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काढणी अगोदर बाविस्टीन ( कार्बेन्डाझिम ५०% WP)  हे २० ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 
  2. कांदा काढणीनंतर सावलीमध्ये व्यवस्थित वाळवावा आणि मगच चाळीत साठवण करावी.
  3. कांदा चाळीमध्ये साठवण करावयाच्या कांद्याची काढणी कांदापात पूर्ण पडल्यानंतर म्हणजे कांदा पूर्णपणे तयार झाल्यानंतरच करावी.
  4. प्रतवारीकरून कांदा चाळीत भरावा.
  5.  नैसर्गिकपणे हवा खेळती राहण्यासाठी चाळीची रुंदी प्रमाणातच असावी.
  6. पावसामध्ये वाऱ्याच्या दिशेकडील बाजू झाकण्याची व्यवस्था करावी.

अशाप्रकारे 25 टन क्षमतेची कांदा चाळ बांधण्यासाठी सर्वसाधारणपणे सव्वा लाख रुपये खर्च येतो, परंतु घरगुती पर्यायी वस्तू वापरून हा खर्च निम्म्यावर आणता येतो.

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी