control white grub in sugarcane

ऊस पिकातील हुमणी नियंत्रण | white grub control

शेतकरी मित्रानो, जमिनीमध्ये राहून पिकाची मुळी खाऊन आर्थिक नुकसान करणारी कीड म्हणजे हुमणी. या किडीमुळे प्रामुख्यने ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ह्या किडीचे लवकर नियंत्रण न झाल्यास ३० -७० % नुकसान होऊ शकते. म्हणूनच आपल्याला ह्या किडीचा जीवनक्रम समजून एकात्मिक नियंत्रण करणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात हुमणी white grub in sugarcane या किडी बद्दल.

✅ हुमणीची ओळख : white grub insect

👉 प्रथम अवस्था पांढरीशुभ्र, पिवळे डोके, 7 मी.मी. लांबी. छातीवर पायांच्या तीन जोड्या.

👉 पूर्ण विकसित अळ्या पिवळट-पांढऱ्या, डोक्‍याचा रंग बदामी व अर्धगोलाकार, अळीची लांबी सुमारे 35 ते 45 मि.मी.

👉 प्रौढ भुंगेरा तपकिरी किंवा बदामी रंगाचे व 17 ते 20 मि.मी. लांब व 8 मि.मी.पर्यंत जाड असतात. 

👉 पंखाची प्रथम जोडी ढाली प्रमाणे मजबूत. 

👉 पंखाची दुसरी जोडी पातळ व घडी करण्यासाठी लवचिक असून, पहिल्या जोडीखाली सुरक्षित व पंख उघडताना मदत करते.

✅ हुमणी किडीची जीवनसाखळी 

👉 पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात.

👉 कडूलिंब, बाभूळ, बोर यासारख्या वृक्षावर मादीसोबत मिलनासाठी जमतात.

👉 त्यानंतर सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत परत जातात.

शेतकरी मित्रानो, वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर रात्रीच्या वेळी प्रकाश सापळे लावून त्यांना आकर्षित करावे. संध्याकाळी व रात्री या झाडांच्या फांद्या जोरात हलवून प्रौढ खाली पाडावेत. ते गोळा करून केरोसीन वा कीटकनाशकमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. हे काम सामुदायिकरीत्या केल्यास  किडीचे नियंत्रण होण्यास मदत होते.

✅ जीवनक्रम : white grub life cycle

👉 अंडी घालण्याचा कालावधी जून-जुलै महिन्यात पूर्ण होतो.

👉 जमिनीत साधारणपणे 8 ते 10 सें.मी. खोलपर्यंत साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी घालतात.

👉 एक मादी तिच्या जीवनकाळात 60 ते 70 अंडी देते.

👉 अंड्यातून 9 ते 10 दिवसांत अळी बाहेर येते.

👉 अळी अवस्था- 5 ते 7 महिन्यांची असते.

👉 जमिनीत 10 ते 15 सें.मी. खोल अर्धगोलाकार पडून राहते.

👉 ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अळी जमिनीत खोलवर कोषावस्थेत जाते.

👉 कोषावस्था 20 ते 25 दिवस असून कोष तांबूस तपकिरी रंगाचा व टणक असतो.

👉 कोषातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात.

अशा प्रकारे हुमणीची एका वर्षात एक पिढी पूर्ण होते.

✅ नुकसान

प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.

उस पिकातील हुमणी नियंत्रण   insecticide for white grub control 

👉 उन्हाळ्यात खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडीच्या सुप्तावस्था नाश पावते.

👉 यजमान झाडांवर सुपर डी ( क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रीन ) 30 मिली फवारणी- ( प्रति 15 लिटर )

👉 पीक लागवडीपूर्वी- कार्बोफुरोन दाणेदार - 7 किलो प्रति एकरी प्रमाणे खतासोबत मिसळून द्यावे.

👉 परोपजीवी बुरशी डॉ. बैक्टोज़ ब्रेव - ब्यूवेरिया बेसियाना Beauveria bassiana किंवा डॉ. बैक्टोज़ मेटा मेटारायझियम ऍनिसोपली metarhizium anisopliae १ ते २ लिटर प्रति एकरी ड्रीप मधून किंवा पाटपाण्याने द्यावे.

👉 उभ्या पिकातउपद्रव आढळल्यास ड्रीप मधून किंवा पाटपाण्याने सुपर डी ( क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रीन ) Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC १ लिटर किंवा लेसेंटा ( फिप्रोनील + इमिडाक्लोप्रिड ) Fipronil 40%+ Imidacloprid 40% WG १७५ ग्राम प्रति एकरी द्यावे.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी