शेतकरी मित्रानो, भारत ॲग्रीच्या ह्या लेखामध्ये आपण पिकावर येणार कोळी कश्या पद्धतीने नियंत्रित करावा ह्या बद्दल माहिती घेणार आहोत. कोळी किटकांच्या ४००० - ५००० विविध प्रकारच्या प्रजाती आहेत. ह्या प्रजाती पैकी ईरियोफायोडिया आणि टेट्रानिकोडिया या परिवारातील कोळी पिकांवर हल्ला करतात. आपल्याला माहितीच आहे कि लाल कोळी ही कीड द्राक्ष, गुलाब, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी व इतर भाजीपाला पिकांवर येते. हि किड पानांच्या खालिल बाजुस ,फळांवर, कळ्यांवर तसेच फांदीवरिल डोळ्यांवर दिसून येते. चला जाणून घेऊयात ह्या किडी बद्दल सर्व काही.
कोळी किडीसाठी पोषक हवामान :
किडीचा हंगामानुसार प्रादुर्भाव डिसेंबर महिन्यात सुरू होतो. पुढे तापमान वाढत असताना, आर्द्रता कमी होत गेल्यास एप्रिल, मे महिन्यामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव होतो. ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसला आहे त्या ठिकाणी झाडे किडीस लवकर बळी पडतात. दिवसाचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस, रात्रीचे तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस, आर्द्रता ४० ते ५० % असताना त्यांची वेगाने वाढ होते.
लाला कोळीचा जीवन क्रम :
लाला कोळीचा जीवन क्रम हा ४ अवस्थेत पूर्ण होतो.
- अंडी : किडीची अंडी लहान, गोलाकार, चमकदार पांढऱ्या रंगाची असतात. अंडी देण्याचा कालावधी चार ते सहा दिवसांचा असतो.
- अळी (larva) : सहा पाय, रंगहीन, अंड्यापेक्षा किंचित मोठी असते. ते थोडे थोडे अन्न खाऊ लागतात.
- बाल्यावस्था (Nymph) : आठ पाय, प्रौढांसारखीच पण आकाराने लहान, लैंगिकदृष्ट्या प्रौढ नसते. याच्या प्रोटो निम्फ आणि डियुटोनिम्फ अशा दोन अवस्था.
- प्रौढ अवस्था : प्रौढ मादीचे पोट गोल, आठ पाय आणि आकार १ मिमीपेक्षा कमी असतो. प्रौढ नराचे पोट शंकूसारखे, लहान असून, ८ पाय असतात. रंग फिकट पिवळसर ते हिरवा ते नारिंगी ते तपकिरी असा होत जातो. वरून पाहताना त्यावर २ डाग दिसतात. मादी संपूर्ण आयुष्यात ५० ते ८० अंडी घालते. फलित अंडी मादीमध्ये विकसित होतात.
नुकसानीचा प्रकार :
- लाल कोळी हे लहान कीटक आहेत जे पानांच्या खालच्या बाजूला समूहांमध्ये राहतात.
- पानांचा रस शोषतो. त्यामुळे झाडांमध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
- पाने आणि कळ्यांमधील प्रकाशसंश्लेषण कमी होते. जास्त प्रादुर्भावग्रस्त पानातील हरितद्रव्ये ७० टक्क्यांपर्यंत कमी होतात. त्यामुळे पाने कोमेजून झाडाची वाढ खुंटते. पाने तपकिरी होऊन वाळतात.
- प्रादुर्भावामुळे फळे कमी पिकतात किंवा कच्ची पडतात.
- जास्त संसर्ग होतो तेव्हा झाडांमध्ये जाळी दिसते.
कोळीचे प्रभावी नियंत्रण करणारे कीडनाशक- ओबेरोन oberon pesticide ( Spiromesifen 22.9 SC )
ओबेरॉन हे केटोएनॉल्सच्या रासायनिक वर्गाशी संबंधित फवारणीच्या माध्यमातून देण्यात येणारे एक नाविन्यपूर्ण कीटकनाशक / ऍकेरिसाइड आहे. भाज्या, फळे, कापूस आणि चहावरील कोळी ( माइट्स ) आणि पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी ओबेरॉन जगभरात विकसित केले गेले आहे. हे उत्पादन कोळी आणि पांढरी माशीच्या विकासाच्या सर्व अवस्थांवर प्रभावीपणे काम करते ज्यामुळे दीर्घकाळ नियंत्रण मिळते. ओबेरॉन फायदेशीर कीटकांवर सुरक्षित आहे आणि त्याच्या नवीन पद्धतीमुळे प्रतिरोधक पांढऱ्या माशी आणि माइट्सचे उत्कृष्ट व्यवस्थापन प्रदान करते.
फायदे:
- कोळी आणि पांढरी माशी या दोन्ही किडीच्या व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे हे एकमेव कीडनाशक आहे.
- कोळी आणि पांढरी माशीच्या विकासाच्या सर्व अवस्थांवर ( विशेषत: अंडी आणि बाल्यावस्था ) नियंत्रण मिळवणारे एकमेव कीडनाशक.
- मादीची अंडी देण्याची उत्पादकता कमी करते तसेच तयार होणारी अंडी अफलित निघतात म्हणजेच अंड्यामधून कीड बाहेर येत नाही.
- मधमाशी सारख्या मित्र किडीना हानिकारक नाही.
- पर्यावरणासाठी तुलनेने सुरक्षित - IPM प्रोग्राममध्ये सर्वोत्तम.
- Oberon SC इतर अनेक कीटकनाशके, वनस्पती वाढ नियंत्रक आणि सूक्ष्म पोषक घटकांशी सुसंगत आहे.
प्रोडक्ट |
|
कंपनी |
बायर |
घटक |
स्पिरोमेसीफेन २२.९ % एस.सी. |
कीड नियंत्रण oberon insecticide uses |
लाल कोळी, पिवळा कोळी, पांढरी माशी |
प्रमाण oberon insecticide dose |
१५ मिली प्रति १५ लिटर पंप |
पिके |
वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, कापूस, काकडी, कलिंगड, बटाटा |
कार्य |
स्पर्शजन्य आणि अंतरप्रवाही कीडनाशक |
किंमत oberon insecticide price |
२०० मिली - १३०० रुपये |
शेतकरी मित्रानो इतर कृषी रसायने जसे कि विद्राव्य खते, कीडनाशके, बुरशीनाशके, तणनाशक, ग्रोथ प्रमोटर ( वाढ वर्धक ) औषधे भरगोस डिस्काउंट सहित खरेदी करण्यासाठी भारत ॲग्रीचे अँप्लिकेशन डाउनलोड करा.