control major diseases in sugarcane crops with tata metri

ऊस पिकातील तन नियंत्रनाचा नंबर 1 फॉर्म्युला - tata metri

 शेतकरी मित्रानो, तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानी एवढेच आहे. ऊस वाढीच्या अवस्थेत ताणाचा बंदोबस्त न झाल्यास उत्पादनामध्ये १० - २० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. उसामध्ये सर्वसाधारणपणे sugarcane weed हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची (एकदल) गतवर्गीय तणे आणि घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची (द्विदल) गवतवर्गीय तणे आढळतात.

प्रतिबंधात्मक उपाय : 

1) जमिनीची पूर्वमशागत म्हणजेच नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत. 

2) पूर्वीचे पीक निघाल्यानंतर राहिलेली तणे, धसकटे वेचून जाळून नष्ट करावी. 

3) खतांची मात्र शिफारसी प्रमाणे वापरावी. . 

4) गाजरगवत / काँग्रेस  सारखी तणे बी येण्यापूर्वीच उपटून टाकावीत.

शेतकरी मित्रानो, ऊस पिकामध्ये तण नियंत्रणासाठी टाटा मेट्री tata metri म्हणजेच मेट्रीब्युझीन ७०% डब्ल्यू.पी.( Metribuzin 70% WP ) या तणनाशकाची शिफारस केली आहे. हे तणनाशक ऊस पिकाच्या सर्व जातीं मध्ये तणनियंत्रणासाठी वापरता येते. चला जाणून घेऊयात टाटा मेट्री या तणनाशकाबद्दल.  

टाटा मेट्री ( मेट्रीब्युझीन ७०% डब्ल्यू.पी. ) tata metri herbicide | Sugarcane herbicide 

  1. टाटा मेट्री हे एक सिलेक्टिव स्पर्शजन्य व आंतरप्रवाही पद्धतीने काम करणारे ट्रियाझिनॉन वर्गातील तणनाशक आहे. 
  2. तणांची मुळे आणि पानांद्वारे शोषले जाऊन झायलेम द्वारे पसरले जाते म्हणून हे उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर लांब व रुंद पानाच्या तणांवर वापरले जाते.
  3. Broad spectrum तणनाशक आणि एकरी कमी डोस असल्यामुळे हे किफायतशीर आहे.
  4. पुढील पिकांवर कोणताही वाईट / अनिष्ट परिणाम होत नाही.

प्रोडक्ट 

टाटा मेट्री 

कंपनी 

टाटा रॅलीस 

घटक 

मेट्रीब्युझीन ७०% डब्ल्यू.पी.

तण नियंत्रण 

अरुंद आणि रुंद पानांचे तण नियंत्रित करते.

प्रमाण

ऊस-उगवणीपूर्वी (400-500 ग्रॅम/एकर) उगवणीनंतर (300 ग्रॅम/एकर)

पिके 

ऊस, बटाटा, टोमॅटो, सोयाबिन आणि गहू.

कार्य

स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक 

किंमत tata metri price

५०० ग्राम - १०००  ते ११०० रुपये


तणनाशके फवारताना खालील गोष्टीं कडे लक्ष द्या : 

  1. तणनाशकाचा वापर करताना शिफारशीनुसार व वेळेवर वापर करावा. 
  2. तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे. संपूर्ण क्षेत्रावर तणनाशक एकसारखे फवारावे..
  3. तणनाशकाची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी. 
  4. तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये. 

 


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी