Control downy mildew on mango crops with sixer fungicide

आंबा पिकावरील भुरी नियंत्रण करा sixer fungicide च्या एका फवारणीत

शेतकरी मित्रानो, आंबा पिकामध्ये मोहोर संरक्षण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण मोहोर येते वेळी ओइडियम मँजिफेरी कवकामुळे भुरी रोग आल्यास मोहरांची गळ होते. यामुळे एकूण उत्पदनामध्ये ६० ते ८० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. म्हणून भुरी रोगाचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. 

चला तर जाणून घेऊयात आंबा पिकांमधील भुरी रोगाबद्दल : 

भुरी रोगा ( Powdery mildew on mango ) 

 1. आंब्यावरील बुरशीजन्य रोगांपैकी पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी हा सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.
 2. हा रोग पीक फुलोरा अवस्था म्हणजेच मोहोर लागते वेळी जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. 
 3. मोहरावर बुरशीची पुर्ण वाढ झाल्यावर पांढऱ्या रंगाची असंख्य बीजे तयार होतात व पान तसेच मोहरावर पांढरी भुकटी दिसून येते.
 4. थंड व दमट हवामान रोगवाढीस पोषक असल्याने हा रोग येतो. हवामानानुसार भुरी त्यांची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात दिसून येते.
 5. रात्रीचे तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत असल्यास आणि ८०% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता, जोडीला ढगाळ वातावरण असल्यास असे वातावरण भुरी (Powdery Mildew) रोगाच्या वाढीसाठी पोषक असते.
 6. आंब्याचा मोहोर, कोवळ्या पालवीवर बुरशींची तंतूमय वाढ त्यावर तयार होणारी असंख्य बीजे वाऱ्यामार्फत पसरतात.
 7. बुरशीच्या वाढीस व आंब्याला मोहोर येण्यासाठी लागणारे तापमान यामध्ये साम्य असल्यामुळे मोहरापाठोपाठ भुरी रोग दरवर्षी येतोच. अशा प्रकारचे वातावरण डिसेंबर ते जाने वारी महिन्यात असते. त्यावेळेस आंब्याला भरपूर मोहोर व पाठोपाठ भूरी रोगाचा प्रादुर्भाव होतो.

नुकसानीचा प्रकार:-

 • बुरशीच्या वाढीमुळे पेशीवरील अन्नरस शोषला जातो, प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते व मोहर करपतो.
 • रोगाची तीव्रता अधिक असल्यास ६० ते ८० टक्क्यापर्यंत नुकसान होते.
 • कोवळया पालवीवर रोग असल्यास पाने तांबुस व पांढरी होऊन वाळतात व गळून पडतात.
 • फळधारणेनंतर रोग उद्‌भवल्यास फळांची गळ होते

शेतकरी मित्रानो, चला जाणून घेऊयात आंबा पिकातील भुरी नियंत्रित करणाऱ्या सिक्सर sixer fungicide in marathi  या बुरशीनाशकाबद्दल : 

सिक्सर dhanuka sixer fungicide हे मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी जे डायथिओकार्बमेट गटाचे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे आणि कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी आहे जे बेंझिमिडाझोल कार्बामेट गटाचे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. याची संरक्षणात्मक आणि उपचारात्मक क्रिया बुरशीचे बीजाणू उगवण प्रतिबंधित करते आणि आतून आणि बाहेरून दुहेरी संरक्षण सुनिश्चित करते.

वैशिष्ट्ये आणि फायदे sixer fungicide uses 

 1. सिक्सर त्याच्या आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य कृतीद्वारे बुरशीजन्य रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते. 
 2. सिक्सर शेतातील पिके आणि भाजीपाल्याचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. 
 3. एकात्मिक रोग व्यवस्थापन साठी सिक्सर हे योग्य बुरशीनाशक आहे.
 4. सिक्सर सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशके आणि बुरशीनाशकांशी सुसंगत आहे.

प्रोडक्ट 

सिक्सर 

कंपनी 

धानुका 

घटक 

मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी

रोग नियंत्रण sixer fungicide uses

करपा, भुरी, डावानी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज,  पानावरील ठिपके

प्रमाण sixer fungicide dose

३० ग्राम  प्रति १५ लिटर पंप 

पिके 

भात, भुईमूग, बटाटा, द्राक्ष आणि आंबा 

कार्य

स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही  बुरशीनाशक 

किंमत sixer fungicide price

५०० ग्राम - ३७०  ते ४०० रुपये

 


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी