chilli variety in maharashtra

chilli variety: मार्केट मधील टॉप 10 मिरची पिकाच्या जाती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण शेतकऱ्यांच्या पसंतीचे आणि मार्केट मधील टॉप 10 मिरची पिकाच्या जाती chilli variety या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. बाजारात हिरव्या मिरच्यांची (chili varieties) वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशामधून देखील चांगली मागणी आहे. महाराष्ट्र राज्यात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची (types of chillies) होत असते. महाराष्ट्रातील मिरची (best variety of chilli in maharashtra) खालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, जळगाव, सोलापुर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. 

 

1. बीएएसएफ नुनहेम्स आर्मर मिरची बियाणे (chilli seed variety) -

वैशिष्ट्ये

परिपक्वतेच्या वेळी हिरवा रंग ते गर्द लाल रंग, उत्कृष्ट लाल रंग, अधिक उत्पन्न देणारे वाण, जास्त तिखटपणा, सुक्या लाल मिरची प्रक्रियेसाठी योग्य आणि लीफ कर्ल / चुरडा मुरडा विषाणूसाठी प्रतिकारक.

पेरणीचा हंगाम

सर्व हंगाम

मिरचीची लांबी

9-10 सेमी

पहिली तोडणी 

45-50 दिवस.

 

2. वीएनआर सहिबा मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

वीएनआर एफ1 सहिबा मिरची हायब्रिड : चमकदार हिरवी मिरची, ताजे हिरव्या आणि लाल चिल्लीसाठी उत्तम, अत्यंत तिखट मिरची.

पेरणीचा हंगाम

रब्बी आणि उन्हाळी (best chilli variety for summer season)

मिरचीची लांबी

13-16 सेमी

पहिली तोडणी 

45-50 दिवस.

 

3. एडवांटा गोल्डन एके 47 मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

गर्द हिरवा आणि परिपकवतेच्या वेळी लाला रंग, एके 47 हिरव्या आणि लाल मिरची अशा दुहेरी उपयोगासाठी यौग्य वाण, लीफ कर्ल व्हायरस रोगास सहनशील, 

पेरणीचा हंगाम

उन्हाळी आणि पावसाळी  (best chilli variety for summer season)

मिरचीची लांबी

6-8 सेमी

पहिली तोडणी 

60-65 दिवस.

 

4. सेमिनीस सितारा गोल्ड मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

फिकट हिरवा रंग, झुडपा सारखी आणि मध्यम उंची असणारी वाढ, चांगली पुनरुत्पादन क्षमता यौग्य वाण, रस शोषक किडीस माध्यम प्रतिकारक, जास्त उत्पादन देणारे वाण 

पेरणीचा हंगाम

पावसाळी आणि हिवाळी 

मिरचीची लांबी

13-14 सेमी

पहिली तोडणी 

65-70 दिवस.

 

5. व्ही एन आर राणी ३३२ मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

फिकट हिरवा रंग, जास्त तिखट, आकर्षक चमकदार मिरची असल्याने बाजारभाव चांगला मिळतो, लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी योग्य, जास्त उत्पादन देणारे वाण 

पेरणीचा हंगाम

उन्हाळी आणि हिवाळी (best chilli variety for summer season)

मिरचीची लांबी

13-14 सेमी

पहिली तोडणी 

40-45 दिवस.

 

6. बीएएसएफ नुनहेम्स नंदिता मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

फिकट हिरवा रंग, परिपक्व्ते वेळी गर्द लाल रंग, जास्त तिखट, सरळ वाढणारे रोप, आकर्षक, चमकदार, टिकाऊ मिरची, पावडरी मिल्ड्यू रोगास मध्यम प्रतिकारक एक्सपोर्टसाठी चांगले आणि जास्त उत्पादन देणारे वाण 

पेरणीचा हंगाम

उन्हाळी आणि हिवाळी 

मिरचीची लांबी

12-13 सेमी

पहिली तोडणी 

40-45 दिवस.

 

7. सरपन महालक्ष्मी मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

सरपण महालक्ष्मी मिरची ही जात हिरव्या आणि लाल मिरचीसाठी उत्तम आहे, मिरची पातळ, लांब, चमकदार आणि जास्त तिखट. वाण कीड आणि रोगांना अत्यंत प्रतिरोधक आहे.  

पेरणीचा हंगाम

सर्व हंगाम 

मिरचीची लांबी

10-12 सेमी

पहिली तोडणी 

60-70 दिवस.

 

8. म्हयको तेजा ४ मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

दुहेरी उपयुक्तता - गडद हिरवा आणि चमकदार लाल मिरची, जास्त तिखट. जास्त उत्पादन देणारी ही जात रोग आणि किडींना सहनशील आहे.

पेरणीचा हंगाम

उन्हाळी आणि पावसाळी 

मिरचीची लांबी

8-10 सेमी

पहिली तोडणी 

55-60 दिवस.

 

9. रासी अशियन हायवेज प्राईड मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

दाट पर्णसंभार असलेली, अर्ध पसरणारे रोप. उत्कृष्ट फळ सेटिंग, आकर्षक गडद हिरवी आणि चमकदार फळे. अत्यंत तिखट आणि जास्त उत्पन्न देणारे वाण. उत्तम फळांची गुणवत्ता, लीफ कर्ल व्हायरस आणि पावडरी मिल्ड्यू रोगास मध्यस्थ प्रतिकार.

पेरणीचा हंगाम

सर्व हंगाम 

मिरचीची लांबी

9-10 सेमी

पहिली तोडणी 

60-65 दिवस.

 

10. टीम सीड शक्ति मिरची बियाणे -

वैशिष्ट्ये

आकर्षक गडद हिरवी आणि चमकदार फळे. मध्यम तिखट आणि जास्त उत्पन्न देणारे वाण. 

पेरणीचा हंगाम

सर्व हंगाम 

मिरचीची लांबी

14-15 सेमी

पहिली तोडणी 

55-60 दिवस.

 

Conclusions | सारांश -

मिरची लागवड करताना सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मिरची जाती (chilli variety name). आपण कोणत्या उद्देशासाठी मिरची व्हरायटी लावणार आहोत म्हणजेच हिरवी मिरची थेट मार्केट मध्ये विकण्यासाठी कि मसाल्याची लाल मिरची, तसेच हंगामानुसार वाणाची निवड, जास्त उत्पादन देणारे वाण, लीफ कर्ल व्हायरस तसेच पावडरी मिल्ड्यू रोगास साहशील मिरची सुधारित जाती लागवड करावी.  

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

 

1. शेतकऱ्यांचे सर्वात पसंतीचे कोणते मिरची वाण आहे?

उत्तर - शेतकऱ्यांचे सर्वात पसंतीचे एडवांटा गोल्डन कंपनीचे एके 47 मिरची हे वाण आहे. 

2. सर्व हंगामामध्ये चालणारे मिरचीचे कोणते वाण आहे?

उत्तर - नन्हेम्स आर्मर, सरपण महालक्ष्मी, रासी अशियन हायवेज प्राईड, टीम सीड शक्ति हे वाण सर्व हंगामामध्ये चालते. 

3. जास्त लांबी आणि जास्त उत्पादन देणारे मिरचीचे कोणते वाण आहे?

उत्तर - वीएनआर साहिबा, सेमिनीस सितारा गोल्ड, व्ही एन आर राणी ३३२, बीएएसएफ नुनहेम्स नंदिता, टीम सीड शक्ति ह्या मिरचीची लागवड करू शकता. 

 

People also read | हे देखील वाचा - 

 

1. भाजीपाला पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण

2. ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन

3. स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. कुसुम सोलर पंप योजना 2024 ची संपूर्ण माहिती

 

 

लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी