नमस्कार शेतकरी मित्रानो, आपण या लेखामध्ये सोयाबीन सुधारित जाती (best soybean variety) तसेच सुधारित लागवड पद्धत यांची माहिती घेणार आहोत. सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असते. जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची निवड करतात.
सोयाबीन पेरणी करत असताना बीजप्रक्रिया करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रति किलो बियाण्यास आदाम कंपनीचे तालिहा कीटनाशक 3 मिली + बाविस्टीन बुरशीनाशक 2.5 ग्रॅम + पाणी 3-5 मिली मिक्स करून हलक्या हाताने बीजप्रक्रिया करावी आणि नंतर नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची 5 मिली प्रति किलो बियाण्यास चोळून प्रक्रिया करावी. बीजप्रकिया केल्यानंतर बियाणे सावलीमध्ये 1 तास सुकवून मगच लागवडी साठी वापरावे.
सोयाबीनचे सुधारित वाण :
वाण soybean top variety |
परिपक्वता कालावधी (दिवस) |
वैशिष्ट्ये |
केडीएस - 992 (फुले दुर्वा) |
100 ते 105 दिवस |
1. तांबेरा रोग, जांभळे दाणे, जिवाणूजन्य ठिपके मध्यम प्रतिकारक्षम 3. हार्वेस्टर ने काढता येण्यासारखे वाण |
सोयाबीन गोल्ड - 3344 |
100 ते 105 दिवस |
1. पानांचा पसारा कमी व निमुळते पान 2. शेतात दाटोळा न झाल्यामुळे बुढापासून शेंड्या पर्यंत शेंगाच शेंगा 4. कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या. |
फुले संगम (के डी एस 726 |
100 ते 105 दिवस |
1. तांबेरा रोगास कमी बळी पडणारा 2. खोडमाशी किडीस, मूळकूज आणि खोडकूज रोगास माध्यम प्रतिकारक 3. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा 4. खूप फांद्या व गोल आकाराचे पान 5. परिपक्वता कालावधी तेलाचा उतारा 18.42 टक्के एवढा आहे |
फुले किमया (के डी एस 753) |
95 ते 100 दिवस |
1. तांबेरा व मूळकूज रोगास कमी बळी पडतो 2. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा 3. तेलाचा उतारा 18.25 % |
जेएस 335 |
95 ते 110 दिवस |
1. तांबेरा रोगास आणि चक्रीभुंगा व खोड किडीस प्रतिकारक 2. कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या. 3. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा 4. तेलाचा उतारा 17-19 % |
MAUS 612 |
93 ते 98 दिवस |
1. विविध हवामानात तग धरणारा वाण 2. परिपक्वतेनंतर 10-12 दिवस शेंगा तडकण्यास सहनशील 3. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा |
MAUS 162 |
100 ते 105 दिवस |
1. सिंचनाची उपलब्धता असल्यास या वाणाची नोवाद करावी 2. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा 3. परिपक्वतेनंतर 12-15 दिवस शेंगा तडकण्यास सहनशील 4. मूळकूज आणि खोडकूज रोगास प्रतिकारक 5. मशीन द्वारे कंपनीस योग्य |
लागवड पद्धती :
1. भारी जमिन: दोन ओळीत अंत 45 से.मी. आणि दोन रोपांतील अंतर 5 सें.मी.
2. मध्यम जमिन: दोन ओळीत अंतर 30 से.मी. आणि दोन रोपांतील अंतर 10 सें.मी.
3. टोकन पद्धत: 3 फुटी सरी काढून वरंब्याच्या दोन्ही बाजूस टोकन करावी व दोन रोपातील अंतर 1 फूट ठेवावे.
बियाणे दर :
1. सलग पेरणी साठी: 30-35 किलो प्रती एकरी बीज वापरावे.
2. टोकन पेरणी साठी: 18-20 किलो प्रती एकरी बीज वापरावे.
सारांश :
शेतकरी मित्रांनो तुम्हाला भारतअॅग्रीचा सोयाबीन सुधारित वाण (best variety of soybean) हा लेख कसा वाटला हे आम्हाला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हा लेख तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
1. सोयाबीन पीक किती दिवसात येते?
उत्तर - सोयाबीनचे पीक साधारण 3 ते 3.5 महिन्यात तयार होते.
2. सोयाबीनची लागवड कधी करावी?
उत्तर - सोयाबीनची लागवड 15 जून ते 15 जुलै पर्यंत करावी.
3. सोयाबीन सुधारित वाण कोणते आहेत?
उत्तर द्या - kds 726, kds -753, kds- 344, AMS- 1001, AMS- 100-39 इत्यादि आहे.
4. सोयाबीन पेरणी साठी किती बियाणे लागते?
उत्तर - 30-35 किग्रॅ/ एकर बियाणे लागते.
5. new soybean variety ला बीज प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते का?
उत्तर - हो, व्हरायटी नवीन असो किंवा जुनी बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
हे पण एकदा वाचा :
1. असे करा कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक नियंत्रण
2. बुरशीजन्य रोगांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय बुरशीनाशक
3. हळद आणि आले पिकांमधील करपा रोगाचे एकात्मिक नियंत्रण
4. दोडका आणि कारले पिकातील फळमाशी नियंत्रण
5. chilli variety: मार्केट मधील टॉप 10 मिरची पिकाच्या जाती
लेखक
भारतअग्रि कृषि एक्सपर्ट