best chilli variety in maharashtra

best chilli variety in maharashtra: पावसाळी हंगामासाठी मिरची पिकाच्या टॉप 10 व्हरायटी

शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे. मिरची ही भारतीय खाद्य संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण घटक आहे, विशेषतः महाराष्ट्रात. महाराष्ट्रात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. येथे, मिरचीचे विविध प्रकार उगवले जातात ज्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे मसाल्याचे पिक महत्त्वाचे स्थान प्राप्त करते. या लेखामध्ये, best chilli variety in maharashtra याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मिरचीखालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र नांदेड, जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आहे. मिरचीमध्ये अ. आणि क. जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलित आहारात समावेश होतो. तिखटपणा आणि स्वाद यामुळे मिरची हे महत्त्वाचे मसाल्याचे पिक आहे. याशिवाय, मिरचीचा औषधी उपयोगसुद्धा होतो.


मिरची बियाणे बद्दल माहिती - 

खालील चार्टमध्ये टॉप 10  best chilli variety in maharashtra बद्दल संपूर्ण वैशिष्ट्ये दिली आहेत.

नं 

व्हारायटी/वाणाचे नाव 

कंपनी 

वैशिष्ट्ये

1

६१० एफ १ हायब्रीड शाइन सीड्स

1.प्रकार - जास्त तिखट आणि मऊ साल असलेली

2. रंग - हिरवे मिरची बियाणे

3.आकार - 10 ते 13 सेमी लांब.

4. पहिली काढणी - ५५ ते ६० दिवस

2.

तेजा 4 

महिको  सीड्स

1.प्रकार - जास्त तिखट 

2.रंग - गर्द हिरवा 

3.आकार - ८ ते १० सेमी लांब.

4.पहिली काढणी - 60 ते 65 दिवस

3

820  एफ 1  हायब्रीड 

शाइन सीड्स 

1.प्रकार - जास्त तिखट 

2.रंग - फिकट हिरवा 

3.आकार - 10 ते 12 सेमी लांब.

4.पहिली काढणी - 60 ते 65 दिवस

4

तलवार 

(KSP 1467) 

कलश सीड्स 

1.प्रकार - अति तिखट 

2.रंग - आकर्षक हिरवा रंग

3.आकार -7 - 8 सेमी लांब 

4.पहिली काढणी - लागवडीनंतर 70-75 दिवसांनी 

5. उपयोग - हिरवी आणि लाल दोन्ही फायदे. 

एके 47 

अडवंटा 

1.प्रकार -अति तिखट 

2.रंग -गडद हिरव्या आणि गडद लाल

3.आकार -लांबी -8 सेमी व्यास - 1-1.5 सेमी

4.पहिली काढणी -लावणीनंतर 60 ते 65 दिवसांनी

5. उपयोग - हिरवी आणि लाल दोन्ही फायदे. 

6. लागवडीसाठी अतिशय best mirchi variety 

6

नवतेज 

MHCP(319)

महिको 

1.प्रकार - जास्त तिखट मिरची व्हरायटी 

2.रंग -फळ गडद हिरवे, पिकल्यास लाल चमकदार 

3.आकार --लांबी:8-10 सेमी व्यास: 0.8-0.9 सेमी

4.पहिली काढणी -60 ते 65 दिवस

5.उपयोग - हिरवी आणि लाल दोन्ही फायदे. 

6. best hybrid chilli seeds maharashtra

प्राइड 

(151)

हाइवेज

1.प्रकार -अधिक तिखट 

2.रंग -आकर्षक हिरवा रंग

3.आकार -लांबी: 10.5 सेमी; व्यास: 1 सेमी

4.पहिली काढणी -लावणीनंतर 55 ते 60 दिवसांनी

5..उपयोग - हिरवी आणि लाल दोन्ही फायदे. 

HPH 5531 

सिंजेन्टा

1.प्रकार -मध्यम तिखट 

2.रंग - हिरवी आणि डार्क  लाल मिरची. 

3.आकार - 15 सेमी लंबा. 

4.पहिली काढणी - लावणीनंतर 60 ते 70 दिवसांनी

5. उपयोग - हिरवी आणि लाल दोन्ही फायदे

9

NCH 3240 

(Girisha)

नोवेल 

1.प्रकार - तिखट 

2.रंग - आकर्षक हिरवा रंग

3.आकार - लांबी:6-8 सेमी

4.पहिली काढणी -60 ते 65 दिवस

5.उपयोग - हिरवी आणि लाल दोन्ही फायदे 

10 

काश्मिरी मिर्च

सरपण 

1.प्रकार -मध्यम तिखट 

2.रंग - हिरवी आणि डार्क  लाल मिरची. 

3.आकार - 16-18 सेमी 

4.पहिली काढणी - 60 ते 70 दिवसांनी 

5.उपयोग - हिरवी आणि लाल दोन्ही फायदे


(सूचना - मिरची मध्ये फुलगळ समस्या असेल तर तुम्ही Bayer planofix - 4.5 मिली + chelated calcium boron - 15 ग्रॅम @ 15 लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता.) 


सारांश | Conclusion - 

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा मिरचीच्या टॉप 10 व्हारायटींचा लेख कसा वाटला? कृपया तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही माहिती आवडल्यास, ती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. शेतीविषयक अधिक माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतॲग्री कृषी दुकान वेबसाईटला भेट द्या. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह. धन्यवाद!


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न |  People also ask -


1. मिरची बियाणे  उगवायला किती दिवस लागतात?

उत्तर - मिरची बियाणे उगवायला 8 ते 10 दिवस लागतात. 

2. मिरचीला फळ येण्यासाठी किती वेळ लागतो? 

उत्तर - मिरचीला फळ येण्यासाठी कमीत कमीत 70 दिवस लागतात. 

3. एक एकरसाठी मिरची बियाणे किमत किती येते? 

उत्तर -अंदाजे  2500 ते 3000 रुपयाचे बियाणे एकरी लागते. 

4. कोणत्या chilli top variety in maharashtra आहेत? 

उत्तर - एके 47, teja - 4, नवतेज, HPH 5531, काश्मिरी मिर्च, 820  एफ 1  हायब्रीड इत्यादि. 

5. मध्यम तिखट mirchi biyane कोणते आहे?

उत्तर - काश्मिरी मिर्च, HPH 5531  मध्यम तिखट बियाणे आहे. 


हे पण एकदा वाचा | People also read - 

1. मिरची पिकातील फळसड नियंत्रण

2. डाळिंब पिकातील आंबे बहार व्यवस्थापन

3. भुरी आणि डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण करा आता taqat fungicide च्या मदतीने

4. ऊस पिकातील हुमणी नियंत्रण | white grub control

5. जाणून घ्या humic acid बद्दल सर्वकाहीलेखक | Author

BharatAgri Krushi Doctor


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी